प्रकटन

वह्या पुस्तके

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
19 Jul 2022 - 5:37 pm

जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते.

भाषासमाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवविरंगुळा

अलक

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
18 Jul 2022 - 9:35 pm

अलक 1
"करावं तसं भरावं", या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेलं वाक्य. सहजच बसस्टॉपवर पुस्तकं विकणार्या मुलाकडून चार पुस्तकं घेतली. माझ्या घरी मी एकटाच. कामवाल्या मावशीच्या मुलांना देऊन टाकली. दोन दिवसांनी त्याच्याकडून फुगे घेतले,ऑफिसमधल्या मैत्रिणीला दिले. अशीच ओळख वाढत राहिली. काही विशेष करत नव्हतो मी. दोन दिवस ताप आला. कामवाल्या मावशी कपडे भांडीच काय दोन वेळचं जेवण पण करून गेल्या. ऑफिसलातली मैत्रिण येऊन डाॅक्टरकडे घेऊन गेली. आणि तोच बसस्टॉपवरचा मुलगा, घर शोधत आला. आज तो फुलं विकत होता. चौकशी करून जाताना चार फुलं टेबलावर ठेऊन गेला. मी करत गेलो, ते माझी ओंजळ भरत गेले.

कथाप्रकटन

आपण सगळेच अश्वत्थामे

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
14 Jul 2022 - 11:43 am

लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे.

युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्‍यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव.

मुक्तकप्रकटनविचारलेखविरंगुळा

सुंदर ते ध्यान

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
7 Jul 2022 - 11:06 pm

ध्यास सावळ्या विठूचा मनी
वाट पंढरीची चालावी चालावी...

समस्त संतांना ज्या रूपाने भक्तीची दीक्षा दिली,त्याच विठूच्या रूपाचा ध्यास घेत आजही भक्तीमय वारकरी पंढरीकडे मार्गस्थ करीत राहतो. विठूचे ते कमरेवारचे दोन हात अत्ठ्ठावीस युगांपासून ठेवलेले आहेत.पण आताच लेकराला आवडत्या कामाला लावून एखादी माउली दोन क्षण कमरेवर हात ठेऊन निश्चिंत उभी आहे असा भास होतो.सार्या जगाचा कारभार हाकणारे हात क्षणभर विठूने कमरेवर ठेवले आहेत.
त्या विटेची ती काय समाधी अवस्था घट्ट रोवलेल्या संकल्पांची ध्योताकच आहे.

मुक्तकप्रकटन

महाराज की जय..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
4 Jul 2022 - 9:38 am

माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी एका गावी राहात होते. माझ्या कडे एक १५/१६ वर्षांची मुलगी कामाला होती. वरकाम करायची. मी तिला शाळेतही घातलेली होती. तिच्या शिक्षणाचा खर्च मीच करायची. तिची आई माझ्याकडे काही जास्तीचं काम निघालं तर ते करायला यायची. तिचा नवरा दारुड्या होता. काबाडकष्ट करून मुलीचं,नवऱ्याचं आणि स्वतःचं पोट भरत होती. नेहमीचं चित्र.

एके दिवशी मी तिला विचारले,"उद्या माळा झाडायचाय. येशील का?" तर ती म्हणाली,"मला हजार रुपये उसने द्या. मला भगताकडं जायचंय."मी म्हटलं "का ग?भगताकडं का? तुला काही होतंय का?"

तिनं उत्तर दिले,"मला बाया आल्याती. उतरवायच्या आहेत."

समाजजीवनमानप्रकटनविचार

आठवणींच्या जंगलात

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
2 Jul 2022 - 3:15 pm

पूर्वरंग

त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे. उद्देश तेंव्हा आणी आता याची सांगड घालत मनोरंजनाचा प्रयत्न.अंतर खुप मोठे आहे लेखनात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गाभा

३० जुन,"महा"वादळ थांबले होते, धुळ,पाला-पाचोळा खाली बसत होता.नऊ दिवस अथक वादळाच्या बातम्या देणाऱ्या पत्रकार आणी टि व्ही चॅनेल्सनी एक खोलवर श्वास घेतला.

मुक्तकप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

विनिपेग डायरीज-३

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
10 Jun 2022 - 3:49 pm

क्रिसकडे रहायची सोय झाल्यामुळे एक मोठा प्रश्न सुटला होता. आता ऑफिसमध्ये कामाकडे लक्ष देणे भाग होते. खरेतर मला घाईने विनिपेगहुन इथे बोलावण्याचे कारणच ते होते. रेव्हेन्युच्या हिशोबाने आमच्या प्रोजेक्ट्चा एक पंचमांश हिस्सा असलेला टेल्को म्हणजे टेलिफोनी किंवा व्हॉइसचा जो भाग होता त्याचा क्लायंटच्या टीमकडून हॅन्ड ओव्हर घ्यायचा होता. आणि त्याची कोणालाच नीट कल्पना नव्हती. खरेतर मलासुद्धा....

मांडणीप्रकटन

का ? का? का?

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
9 Jun 2022 - 1:30 pm

मध्यमवर्गीय कुटुंबात मिळणाऱ्या थोड्या फार रिकाम्या वेळात स्त्रीवर्ग काहीशा नाईलाजाने किंवा काहीवेळा आवडीने टीव्ही वरच्या कौटुंबिक मराठी मालिका बघतो. त्यांनाही त्यातील काही गोष्टी खटकतात. पण त्या जाने दो म्हणून सोडून देतात. मीही वृद्धावस्थेत रिकामटेकडी झाल्याने ह्या मालिका बघते. मलाही काही गोष्टी खटकतात त्या अशा-

१) प्रत्येक मालिकेत एक रडकी नायिका असतेच. ती सारखी रडतच असते. तिला कुणीतरी छळत असतं. काही वेळा अनेक जण तिला (फारसं महत्त्वाचं कारण नसताना)छळत असतात.

२) कुठलीतरी एक सत्य गोष्ट कुणीतरी,कुणापासून तरी लपवत असतं आणि त्यावर एक वर्षभर मालिका चालते.

समाजजीवनमानप्रकटनविचार