तुम्ही कोर्पोरेट शोशल रिस्पॉन्सिबिलीटी ही टर्म ऐकली आहे का ? म्हणजे कसं की कॉर्पोरेट कंपन्या कर भरतातच मात्र सामाजिक जाणीव म्हणुन त्यांनी त्यांच्या प्रोऑफिटचे २% सामाजिक कामावर खर्च केले च पाहिजेत असा कायदा आहे. ह्याही पुढे जाऊन त्यात काम करणार्या लोकांनी सामाजिक भान राखुन , आपण ह्या समाजाचे काही देणे लागतो , आपण समाजा साठी काही तरी करायला हवे ह्या वृतीने रहायला हवे अशी काही लोकांची अपेक्षा असते !!
असो.
आज आर.टी.ओ ने गाडी उचलली , काहीही कारण नाही, नो पार्किन्गच्या बोर्ड पासुन किती तरी लांब असुनही उचलली. मला व्हिडीओ आणि फोटो दाखवत होते , त्यात सरळ सरळ दिसतंय की आजुबाजुलाही गाड्या आहे पण त्यातली एकही टोईंग व्हअॅन मध्ये उचललेली दिसत नाही , केवळ आपली अॅक्क्सेस्स आहे , उचलायला सोप्पी आहे म्हणुन उचलली बस्स. मी समजाऊन सांगतोय त्यांना तर ऐकाय्लाच तयार नाहीत . म्हणाले तुमच्यावर २००० अजुन दंड पेंडींग आहे , म्हणलं सगळी डॉक्युमेंट क्लीयर आहेत आपले , भेदरट वृत्ती असल्याने आयुष्यत कधी सिग्नल मोडला नाही की लेन क्रॉसिंग केले नाही कसला दंड आहे सांगा आता लगेच भरतो . तर नाय नाय काही नाहीये दाखवत सिस्टिम पण आता पावती फाडा म्हणाले .
आणि गाडी टोईंग मध्ये उचलेली असल्याने सगळी पॉवर त्यांच्या हातात आहे , आपल्याला झक मारत पावती फाडणे भाग आहे . पावती फाडली तीही आर्टीओ ची नाही , महानगर्पालिकेची !
आणि हा काही पहिला प्रसंग नव्हे , हे आधीही झाले आहे . कोव्हिडमध्ये अख्खे शहर मास्क बिस्क काहीही न लावता फिरत होते , पण पोलिसांनी फक्त मला अडवले आणि ५०० रुपायांची पावती फाडायला लावली. पावतीवर कारण का य दिले आहे तर - "विनाकारण फिरणे" . अजुनही पावती जपुन ठेवली आहे मी ती ! आणि हो त्या पोलिसांनी वर्दि घातलेली नव्हती अन त्यांच्या सुपर वायझर ने ही मास्क लावलेला नव्हता !!
मुंबईत एकदा आर.टी.ओ ने फक्त गळ्यातील आयकार्ड पाहुन गाडी बाजुला घ्यायला लावली अन सगळी कागदपत्रे क्लीयर आहेत, रीतसर पावती फाटायला काहीच कारण नाही असे दिसल्यावर "नंबर प्लेट वरील फॉन्ट छोटा मोठ्ठा आहे " असे सांगुन २०० रुपये घेतली. गाडीची किल्ली काढुन घेतली असल्याने देने आपल्याला भाग होते. पावती दिली नाहीच ऑफकोर्स.
सो आहे हे असं आहे . हा काही माझ्या एक्ट्याचा अनुभव नाही. असा अनुभव सर्वांना कधीना कधी कुठे ना कुठे आयुष्यात आलेला असेलच !
पॉवर आहे म्हणुन वाट्टेल ते करु. एअरव्ही ही लोकं वैयक्तिक आयुष्यात कदाचित चांगली असतीलही पण इथे मात्र केवळ पॉवर गेम .
तुम्ही स्ट्नफर्ड प्रिझन एक्स्पेरिंएंट विषयी ऐकले आहे का ? त्यात दिसुनच आलं आहे की खुप चांगल्या माणासांना देखील हातात पॉवर मिळाकी की तेही वाईटच वागायला लागतात. ही वस्तुस्थिती आहे , निसर्गाचा नियम आहे , त्याला आपण काहीही करु शकत नाही . आपण फक्त हे अलिप्तपणे पाहु शकतो बस्स .
हां तर , कमिंग बॅक टू कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी . आपण कॉर्पोरेट मध्ये आहोत . आपल्याकडे कसली शष्प पॉवर नाय . देशात ५-६% लोकं जे इन्कम टॅक्स भरतात त्यातले आपण असुन देखील आपल्या कॉन्ट्रिब्युशनला काडीची किंमत नाही. म्हणजे कसे की शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात कर्वे रानाडे आगरकरांच्या कामाचे जेवढे कौतुक आहे तेवढेच आपल्या योगदानाचे कौतुक आहे ह्या देशात =))))
तुम्ही तुमच्या कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी म्हणुन कीतीही काही केले तरीही आर.टी.ओ. तुमची पावती फाडणारच आहे !
मग आपण काय करु शकतो ? मुळातच बामणी संस्कार अन मुळमुळीत वृत्ती असल्याने काहीतरी अॅन्टी-सोशल करायचा आपल्या गाडींत दमच नाही . मग करायंचं तरी काय ?
हां , गॉट इट ! स्वामी विवेकानंद काय म्हणाले - Society does not go down because of the activities of criminals, But because of the inactivities of the good people.
आपल्याला संपुर्ण इनॅक्टिव्ह व्हायचं आहे , संपुर्ण , आणि पण तेवढेच पुरेसे नाही , अधिकस्य अधिकं फलं ! म्हणुन अजुन बरेच काही करायला लागेल .
१. आपण जाणीवपुर्वक हिंदीत बोलायला सुरुवात करु तेही घाणेरड्या . मराठी फक्त आपल्या कोअर ग्रुप मध्ये , मरथि लिहिल तरि जनिव्पुर्वक अशुध्द लिहय्च . संस्कृत ही तर डेड लँग्व्एज आहे , टूल ऑफ सोशल अॅट्रोसिटी आहे असा प्रचार करत राहु .
२. दारु सिगारेट वर सर्वात जास्त कर असतो ना, मग आपण दारु सिगारेट बंद करु , इतरांना मात्र देशभक्ती म्हणुन प्रमोट करु . पी तु . भर पेग . चीअर्स !
३. जमेल तिथे डेव्हिल्स अॅडव्होकसी करु . ग्लोबल वॉर्मिग कसे खरी रिस्क आहे , पेट्रोल , ऑईल कसे क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी आहे हे बोलत राहु. #जुस्ट्स्टॉप_ऑईल वगैरे कार्यकर्यांना प्रेओत्साहन देऊ.
४. वोक कल्चर , LGBTQIA+ , सेम सेक्स मॅरेज , जेंडर न्युट्रल प्रोनाऊन्स , बॉडी पॉसिटीव्हिटी , वगैरे गोष्टींचा जोमाने प्रचार प्रसार करु
५. संपुर्ण हिंदु संस्कृती कसे बामणाचे कसब आहे, कुटील कारस्थान आहे , त्यांचावर शेतकर्याने कसा आसूड उगारायला हवा , वगैरे विषयांवर जनजागृती करु.
६. कम्युनिस्ट अन सोशॅलिस्ट विचारधारा उचलुन धरु . सतत समाजात कायम शोषक आणि शोषित असे दोन वर्ग असतात अन त्यांच्यात कायम संघर्ष होतच रहाणार हे मार्क्सचे विचार जोमाने पसरवु .
७. इन शॉर्ट म्हणजे जे जे आपल्याला आजवर संस्कार म्हणुन चांगले म्हणुन शिकवण्यात आले आहे त्याचा धिक्कार करु अन जे जे वाईट म्हणुन दाखवण्यात आलेले आहे त्याचाच प्रचार करु .
डन . हीच आजपासुन आपली कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलीटी .
लाल सलाम कॉम्रेड्स !
प्रतिक्रिया
10 Jan 2023 - 8:09 pm | Trump
तुम्ही कोर्पोरेट शोशल रिस्पॉन्सिबिलीटी ही टर्म ऐकली आहे का ? म्हणजे कसं की कॉर्पोरेट कंपन्या कर भरतातच मात्र सामाजिक जाणीव म्हणुन त्यांनी त्यांच्या प्रोऑफिटचे २% सामाजिक कामावर खर्च केले च पाहिजेत असा कायदा आहे.
>> खरे तर हा कायदाच मुर्खपणा आहे. कंपन्यांनी योग्यपणे कायदापाळुन नफा कमवावा, विनाकारण समाजिक जाणिव ठेवा असे सरकारने का म्हणुन सांगायचे. सरकारने हे असले समाजिक जानिवांचे काम करायला हवे.
11 Jan 2023 - 9:09 pm | टर्मीनेटर
असं कसं म्हणता तुम्ही Trump साहेब?
अहो ज्यात एखाद्या व्यक्तिला आधी एम.सी.ए. (Ministry of Corporate Affairs) चा यशस्वीरित्या बट्ट्याबोळ करुन दाखवल्याचे बक्षीस म्हणुन थेट अर्थमंत्री केलं जातं त्या महान NDA सरकारच्या एका जुनाट कायद्यावर तुम्ही चक्क मुर्खपणाचा आरोप करताय?
हा एकच नाही तर ज्यांची जाळुन झालेली राख भस्म म्हणुन कपाळावर फासुन रोज ह्या लोकांनी संसदेत जावं असे अनेक कालबाह्य कायदे अद्याप आपल्या माथी मारले जात आहेत.
खुप अपेक्षा होत्या ह्या सरकारकडुन पण बहुतेक स्तरांवर अद्याप तरी "आनंदी आनंद गडे... जिकडे तिकडे चोहीकडे..." अशीच परिस्थीती दिसत आहे!
असो, धागाकर्त्याचे सगळे विचार मला खरंच निटसे समजले नाहीयेत त्यामुळे त्यावर भाष्य नं करता इथेच थांबतो!
12 Jan 2023 - 7:58 pm | सुबोध खरे
त्या महान NDA सरकारच्या एका जुनाट कायद्यावर
??
Corporate Social Responsibility Under Section 135 of Companies Act 2013
13 Jan 2023 - 3:34 am | साहना
हा कायदा कंपनी प्रोमोटर्स च्या खूप फायद्याचा आहे. कंपनीचा २% नफा खरे तर कंपनीच्या समभाग धारकांना जायला पाहिजे. पण आता हे पैसे कंपनीच्या संलग्न चॅरिटी ला जातात ह्याची प्रमुख प्रोमोटर ची बायको असते. प्रोमोटर चे भांडवल ५१% गृहीत धरले तरी त्याचा हक्क फक्त १.०२% नफ्यावर होता पण आता तिला ०.९८ इतर समभाग धारकांचे पैसे मिळाले. ह्या समभाग धारकांत कोण असतात ? साधारण मध्यमवर्गीय लोक ज्यांनी थेट किंवा इतर मार्गानी ह्या कंपनीत पैसे गुंतवले असतात. ह्यांच्या पैश्याच्या जोरदार प्रमोटर पत्नी पाणी बचाव आंदोलनाचा प्रसार पूल पार्टी करून करते आणि पद्मश्री वगैरे मिळविते.
एकूण काय तर चॅरिटी च्या नावाखाली नेहमी प्रमाणे सामान्य माणसाचे पैसे चोरून आपल्या चमच्याचे खिसे भरणे !
13 Jan 2023 - 12:23 pm | Trump
धन्यवाद श्री साहना, मला हा मुद्दा लक्षात आला नव्हता.
13 Jan 2023 - 7:30 pm | कॉमी
सगळेच्या सगळे २% प्रमोटरची बायको पगार म्हणून घेते असा काहीसा तुमचा समज आहे का ?
10 Jan 2023 - 8:57 pm | कॉमी
Unironically, ह्या सगळ्या गोष्टी कराच कसे.
10 Jan 2023 - 8:57 pm | कॉमी
Unironically, ह्या सगळ्या गोष्टी कराच कसे.
11 Jan 2023 - 12:31 pm | श्वेता व्यास
लेखातील विचारांशी सहमत.
जे जे आपल्याला आजवर संस्कार म्हणुन चांगले म्हणुन शिकवण्यात आले आहे त्याचा धिक्कार करु अन जे जे वाईट म्हणुन दाखवण्यात आलेले आहे त्याचाच प्रचार करु
बऱ्याच वर्षांपासून 'घरच्यांनी आपल्यावर बरोबर चुकीचे संस्कार का केले आहेत' असं वाटावं असे अनुभव येत आहेत.
11 Jan 2023 - 8:21 pm | कॉमी
संघ काय म्हणतोय बघा.
तुमचा सल्ला ऐकतायत का काय हो ?
12 Jan 2023 - 4:53 pm | Trump
तुमचा सल्ला ऐकतायत का काय हो ?
>> त्यात चुकीचे काय आहे ? असे झाले तर चांगलेच आहे.
सरोगरी २०२१ चा कायदा बघितला का ? भारतीय कायदे पक्षपाती आहेत. त्यात समलिंगी, एकल पुरुष, विषमलिंगी लोकांना मुर्खपणाच्या अटी टाकुन सगली अडचण करुन टाकली आहे.
12 Jan 2023 - 5:13 pm | कॉमी
आजिबात नाही, उलट ही भूमिका आवडलीच.
12 Jan 2023 - 5:07 pm | कंजूस
एका दुकानात मी काही घेत आहे. एवढ्यात बाहेर उचलगाडी आली आणि टु वीर्य उचलू लागले. दुकानदाराने सावध केले "कुणाची गाडी आहे का बाहेर?" दोन उचलल्या पण एक तशीच ठेवली आणि गेले.
"ती नाही उचलणार, ती केबलवाल्याची आहे. त्यांच्या घरचा टीवी बंद होईल ना."
12 Jan 2023 - 5:08 pm | कंजूस
टूवीलर वाचा.
12 Jan 2023 - 8:00 pm | सुबोध खरे
देशी ताप परि जसा वरिवरि येशी नभी भास्करा | अत्युच्ची पदि थोरही बिघडतो हा बोल आहे खरा
12 Jan 2023 - 9:37 pm | कॉमी
मार्कस राव, तुमचा व्यक्तिगत एटलास श्रग्ड रचतात काय ? :))
via GIPHY
असो, तुमच्या अँटी सोशल लिस्ट मधल्या काही गोष्टी सोडल्या तर बाकी चांगल्याच आहेत, तुम्ही ironically पसरवा आम्ही unironically पसरवतो:)))
13 Jan 2023 - 2:26 pm | Bhakti
:)
13 Jan 2023 - 2:24 pm | Bhakti
फारच दाहक :))
इन शॉर्ट म्हणजे जे जे आपल्याला आजवर संस्कार म्हणुन चांगले म्हणुन शिकवण्यात आले आहे त्याचा धिक्कार करु अन जे जे वाईट म्हणुन दाखवण्यात आलेले आहे त्याचाच प्रचार करु .
ही खोटी चामडी अनेकदा पांघरावी लागते,..पण हे समजायला जरा उशीरच झाला.असो!पण मुळं आपोआप जपलं जातंय ही मोठी जमेची बाजू :)
13 Jan 2023 - 6:54 pm | मूकवाचक
@मार्कस - लेख मार्मिक आहे. काही ठोसे (पंच) अगदी नेमके वर्मावर बसतील असे आहेत.
तळटीपः झोपलेल्याला जागे करणे सोपे आहे, सोंग घेतलेल्याला नाही हे आपल्याला माहित आहेच :)
16 Jan 2023 - 6:11 pm | चौथा कोनाडा
आर.टी.ओ ने गाडी उचलली , कोव्हिडमध्ये अपोलिसांनी फक्त मला अडवले आणि ५०० रुपायांची पावती फाडायला लावली, मुंबईत आर.टी.ओ "नंबर प्लेट वरील फॉन्ट छोटा मोठ्ठा आहे " असे सांगुन २०० रुपये घेतली.
याचं कारण एकच .... नशीब पांडू, तो क्या करेगा खंडू
मलाही असे अनुभव आलेत, येत असतात ... पण ते पैशे मी दानधर्माला गेले असं मनाला समजाऊन (मनस्ताप तर होतोच) विसरून जातो.
बाकी, सीएसाअर म्हणून इनॅक्टिव्ह होण्यासाठी वर्णन केलेला उपहास आवडला.
17 Jan 2023 - 7:54 pm | चंद्रसूर्यकुमार
एक गोष्ट समजत नाही. समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे काय? उद्योगधंदे काढणे, समाजाला ज्या गोष्टी/सेवांची गरज असते त्या पुरविणे आणि तसे करताना त्याच समाजातील लोकांना नोकर्या देणे हे समाजविघातक कृत्य असते का? मग समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे काय?
समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, गरीबांसाठी काहीतरी केले पाहिजे वगैरे गोष्टींनी इतका हैदोस घातला आहे की विचारायची सोय नाही. सरकारचा गरीबी निवारणासाठी अनंत योजनांवर हजारो कोटी रूपये खर्च होत असतो. मग तो पैसा कुठून उभा करायचा? तर करांचे दर वाढवून आणि मार्केटमधून पैसे कर्जाऊ घेऊन. सरकारने कर्ज घेतले की मग त्यामुळे व्याजाचे दर वाढतात. म्हणजे उद्योगांनी सरकारच्या या 'समाजासाठी काहीतरी केले पाहिजे' या खटल्यामुळे जास्त कर भरायचा, वाढीव व्याजाचे दराने कर्ज चुकते करायचे आणि वर परत 'समाजासाठी काहीतरी केले पाहिजे' हे उपदेश ऐकून घ्यायचे. म्हणजे होणार काय तर एखादी स्टील कंपनीचा एक्सपर्टाईझ आहे स्टील बनविण्यात. त्यांना सांगायचे तुम्ही गावात शाळा काढा किंवा संडास बांधा. शाळा चालविणे किंवा संडास बांधणे हा त्यांचा एक्सपर्टाईझ आहे का? मग उगीच त्यांना नको त्या गोष्टी का करायला सांगायच्या?
आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब म्हणाले होते- "there is one and only one social responsibility of business to use its resources and engage in activities designed to increase its profits so long as it stays in the rules of the game, which is to say, engages in open and free competition, without deception or fraud." हे मला पूर्ण पटते. उद्योगांनी ते जी गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकतात ती अधिकाधिक उत्तम प्रकारे करावी आणि तसे करताना कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये. असे करतानाच अधिकाधिक नोकर्या निर्माण होतात आणि समाजाचे भले होते. कॉर्पोरेटची इतर कोणतीही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अधिक महत्वाची नाही. पण हे सी.एस.आर चं खटलं भारतात आणणार्या मंडळींच्या अमेरिकेतील पूर्वसुरींनी फ्रीडमन साहेबांचे वाक्य आपल्या सोयीनी अर्धे तोडले आणि ते "there is one and only one social responsibility of business to increase its profits" असे म्हणाले असला अपप्रचार केला.
एकूणच नफा कमविणे हे एखादे महान पातक असल्याप्रमाणे या लोकांची मनोवृत्ती असते. सगळे उद्योग हे लोकांना लुबाडण्यासाठी आणि पिळण्यासाठीच बसलेले आहेत असला घातक दृष्टीकोन त्यांचा असतो. या मनोवृत्तीमुळे भारताचेच नाही तर इतर देशांचेही किती नुकसान झाले असेल याचे गणित कोण आणि कसे मांडणार? सी.एस.आर ही ब्याद जितक्या लवकर जाईल तितके चांगले.