बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)
वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे. पुन्हा.......... हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात. एकच अर्थ देतात..तो म्हणजे पुन्हा!!! ..खरं तर तिथे पुन्हा जाणं,ही घटना..म्हटली तर माझ्या हतातली,म्हटली तर नाही!