संस्कृती
नाते अग्निशी
शरीरावर माझ्या ज्वालांचे नर्तन चालले
ईथेच मी अग्निशी नाते प्रस्थापिले
माझ्याच देवाकडून मी देव्हाह्र्यात जाळले गेले
देवरूपातील दानव मी कैकवार पाहिले
शरीराचे अस्तित्व केवळ राखेतुन उरले
राखेतील धगधगते अंगारे प्रतिशोधास आतुरले
जनलोकांच्या आत्म्यामध्ये बंडाच्या अग्निरुपात प्रगट्ले
अखेरीस तुमच्यामधुन मी त्यास फासावर लट्कवले
शेवटक्षणी मात्र मी 'देवासाठी' गहिवरले
मज प्रियकरास मी चितेवर मिठित घेतले
गुढी उभारनी
गुढी उभारनी (कवियत्री बहिणाबाई चौधरी )
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा
.........उर्वरीत कविता: http://www.transliteral.org/pages/z70717225241/view
......... बहिणाबाईंची "गुढी उभारनी": एक आस्वाद - डॉ. सुधीर रा. देवरे: http://sudhirdeore29.blogspot.in/2014/05/blog-post.html
स्वयंपाक घरातील विठोबा (लोकसत्ता -वास्तुरंग मध्ये प्रकाशीत)
आजच्या लोकसत्ता-वास्तुरंग मध्ये मी लिहीलेला हा लेख प्रकाशीत झाला आहे.
http://www.loksatta.com/vasturang-news/the-most-important-kitchen-equipm...
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! पण मला माझ्या आवडत्या पाट्यावरवंट्याच्या बाबतीत एक म्हण तयार करावीशी वाटते - पाट्यावरवंट्यावर जिन्नसे रगडिता रूचिरस पाझरे'. हसू नका, पण बिचार्या पाट्यावरवंट्यावर मी कुठले गाणे ऐकले नाही, कुठली चांगली म्हण ऐकली नाही, म्हणून हा प्रयत्न.
चला..सप्तपदी करु या!
माझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार.
फुलांची सप्तपदी
============================
हम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का! वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य! या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो! (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना!? ;) ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही! तुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय?
डेटिंग गेम - डिनरडेट - हलकाफुलका धागा
अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते.
'साप्ताहिक प्राजक्त' २. शंका समाधान
मित्रांनो,
नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील शंका समाधान भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे.
१. शंका - जर सर्व चराचरात भगवंत भरलेला आहे तर मग जगताना मुंग्या, डास, ढेकूण, झुरळ, उंदीर इत्यादींना मारावे का नाही? मारले तर पाप लागते का?
समाधान - संपादकांचे थोडक्यात उत्तर - (कोणत्याही भूतमात्राला मारणे पापच आहे. पण या नियमाला अपवाद आहेत.)
परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा.
जेव्हा एखादा भारतीय प्रवासी आमेरीकेत जातो आणि आमेरीकेच्या संदर्भाने निरीक्षणे नोंदवतो त्यातून तो ज्या हितसंबंधांचे आणि पूर्वग्रहांचे प्रतिनिधीत्व करतो ते हितसंबंध आणि पूर्वग्रह असलेली निरीक्षणे अभ्यासून वगळल्यावर उरलेल्या निरीक्षणांचे आमेरीकेच्या अभ्यासात महत्व असते कारण हितसंबंध आणि पूर्वग्रह विरहीत त्रयस्थ पक्षाची निरीक्षणे तटस्थ म्हणून अधिक विश्वासार्ह असण्याची शक्यता असू शकते.
विवाह मुहुर्ताच्या निमिताने!
या विषयावर अंतरजालावर किती लेखन झालय हे मला अपरिचित आहे. मी स्वतः सुद्धा,मिपावर अश्या प्रकारचे लेखन कमीच केले आहे. पण पूर्वी हे असले लेखन तुरळकपणे का होइना..पुणे..पिंपरी चिंचवड अश्या एरियातल्या २/३ (लोकल) मासिकांमधुन केले होते. (माझी वहिनी..साप्ताहीक-गगनझेप..वगैरे) काही कारणानी ती लिंक ८ वर्षांपूर्वीच तुटली.पण लिहिण्याची भूक शाबूत होती. तो चान्स पंधरा एक दिवसांपूर्वीच मिळाला. चान्स असं म्हणतो... कारण की एकतर ते दिवस अठवले. आणि दुसरं म्हणजे यावेळी चक्क साप्ताहिक सकाळ मधून फोन आला..म्हणून!
पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......
प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का?
पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......
(आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.)
(पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल.