कान्हेरी लेणी, प्लॅस्टिक, ब्लफमास्टर वगैरे

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
15 Mar 2014 - 9:07 am

प्लॅस्टिकबाबत सूचना
.

सूचना फलकांवरची प्लॅस्टिकबाबत जागरुकता
.

मुबलक प्रमाणात प्लॅस्टिक मिळण्याची उद्यानातली अधिकृत जागा
.

प्लॅस्टिक इथे मिळेल घरून मात्र आणू नका
.

.

.

शाळेची सहल
.

.

.

लेण्यांखालच्या पाणी साठवण्याच्या पुरातन जागा... यात बिसलरीच्या बाटल्या तसेच कुरकुरे, लेजचे पुडे टाकावेत.
प्रदूषण करण्यासाठी प्लॅस्टिक कुठे मिळेल ते आपण मागेच पाहीले आहे
.

हे खड्डे, खुणा कसल्या
.

ओटी पडवी असलेलं आमचं छानसं घर
.

प्रशस्त हॉल
.

छोटासा बोगदा
.

नकाशा
.

प्रारंभ
.

बारीक बारीक तपशील भरलेली शिल्पे
.

फारसा चढ नसणारी चढण-- डोंगराची वरची बाजू
शम्मी कपूरच्या ब्लफ-मास्टरच्या शेवटच्या मारामारीचे शूटिंग इथे झाले आहे.
.

खूप दूरवरचा प्रदेश इथून दिसतो
.

माहिती
.

शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का
दोन मनांची उघडी दारे, आत खेळते वसंत वारे
.

स्तूप
.

ओह वाव...
.

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

15 Mar 2014 - 9:28 am | खटपट्या

छान फोटो

सुहास झेले's picture

15 Mar 2014 - 10:43 am | सुहास झेले

त्या दुकानाचं म्हणाल, तर तिथे तो मुलगा स्वतः बिस्किटं, वेफर्स प्लेटमध्ये काढून देत असे, कारण पुढे लेण्यांमध्ये कचरा नको म्हणून. त्याचे भरभरून कौतुक करायचो आम्ही. अगदी गेल्यावर्षीच गेलेलो जूनमध्ये. आता काय परिस्थिती आहे माहित नाही. तुम्ही त्याच्याकडून काही खरेदी केलीत का? आणि वेफर्स, बिस्लरी, बिअरच्या बाटल्या हे पर्यटक आधीच घेऊन येतात. तरी त्यातल्यात्यात इथे स्वच्छता बघायला मिळते. इतकी हालत वाईट नाही.

लेणी क्रमांक ३४ माझी आवडती... २००० वर्ष जुने रंगीत चित्र इथे आहे

Kanheri

मुक्त विहारि's picture

15 Mar 2014 - 11:43 am | मुक्त विहारि

आवडले.

( मनातल्या मनांत....जा एकटेच. करा मज्जा...

कुरकुरे खा,पाणी प्या...जमल्यास कोल्ड्रींक पण ढोसा....

नशीब निदान फोटो तरी टाकले आहेत.)

छे छे मी चूकूनही कुरकुरे आणि बिसलरीमधले पाणी घेत नाही. प्लॅस्टिक पडले नसते तर आज लेण्यांखालचे साठवलेले पाणी पिता आले असते.

मी गेटवर शहाळे मिळाले ते प्यालो.

मुक्त विहारि's picture

15 Mar 2014 - 2:32 pm | मुक्त विहारि

तुम्ही एकदम सिरीयस झालात.

(आमच्या कंसातल्या वाक्यांना जास्त सिरीयस घेवू नका.)

मी अलीकडे तीन वर्षाँपूर्वी गेलो होतो .तीन वाजता आत जातांना वीस रु गेटवर(बोरीवली पार्कचे गेट )भरले .आतमध्ये कृष्णगिरीत बससाठी उभा राहिलो .

एकच बस ( =सोळा सिटर काडेपेटी छाप ज्यात लहान मुलेच बसू शकतील अशा सीटस होत्या .साडे पाच फुटी माणूस उभा राहू शकत नाही .खिडक्यांना तिहार जेलच्या जाळ्या )फेरी मारणारी आली .
फैमिली वाल्यांनी गर्दी केली .थांबलो .ही बस चारला परत आली .यात मात्र दारात उभा राहिलो .आठ किमीचे वीस रूपये तिकीट काढले .कसाबसा साडेचारला गेलो .मुख्य लेणी पाहिपर्यँत पाच वाजले आणि सर्वाँना हाकलले .

फार पूर्वी बोरिवली स्टेशनहूनच बेस्टच्या बस रविवारी दर अर्धा तासाने सुटायच्या आणि कुठेही फिरता यायचे .त्यावेळी हे प्लास्टीकचे भूत नव्हते .कुरकुरे नव्हते .
पेरु ,चिंचा ,बोरे ,कैऱ्या ,चणे शेंगदाणे ,काला खट्टा ,सरबत हा मुलांचा खाऊ होता .

एक खास खादाडी :हातगाडीवर राय आवळेंचा ढीग असायचा .पाव /अर्धा किलो आवळे एका छोट्या मटक्यात घालून तिखट मीठ ,धने पावडर टाकुन तोंड एका पानाने झाकून गदागदा हलवून त्याच पानावर द्रोणासारखे करून खायला मिळायचे .

मस्त बरेचदा गेलोय कान्हेरी केवसला, किंबहुना नॅशनल पार्क म्हणजे कान्हेरी केवस हेच माझे समीकरण. कमाल म्हणजे खूप कमी जण जातात इथवर, त्यामुळे गर्दीचा त्रास असा कधी होत नाही, शांत पणे रमता येते..
पावसाळ्यात तर क्या बात है, पाण्याचे ओहोळ, झरे आणि धबधबे वाहायला सुरुवात झाली की त्याची एकवेगळीच मजा ..

शोभना गोखले यांच्या भारताचे संस्कृतीवैभव या पुस्तकात कान्हेरीबाबतचे संशोधन त्यांनी माडलेले आहे. काही गुरु शिष्य परंपरा इ.

प्रचेतस's picture

19 Mar 2014 - 5:00 pm | प्रचेतस

मिपाकरांसोबत केलेली कान्हेरीची सफर आठवली.

कान्हेरी लेणी: भाग १

कान्हेरी लेणी: भाग २