काही दिवसांपूर्वी मोदक यांचा वडोदरा (बडोदा) प्रवासाचा लेख मिपावर आला होता. वडोदरा बद्दल ओढ असणारे बरेचशे मिपाकर त्या लेखाच्या प्रतिक्रीयेत दिसले. म्हणूनच वडोदराची जवळून ओळख करून देण्यासाठी हा लेख.
संस्कारनगरी,विध्यानगरी,साहित्यनगरी किंवा कलानगरी अशी विश्वात कीर्ती मिळवून देण्याबद्दल वडोदरा संस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड ३रे यांचं सदैव ऋणी आहे. स्वातंत्र्याआधी वडोदरा संस्थान निझामाच्या हैद्राबादा नंतर भारताचं दूसरं भव्य राज्य होतं. तरीही वडोदराला इंग्रजां कडून जास्तच महत्व मिळालं होतं.
श्रीमंतांनी बरीचशी स्थापत्य व महालांचं राज्यात निर्माण केलं. त्या पैकी जवळजवळ २५० स्थापत्य नेशनल किंवा इन्टरनेशनल हॅरीटेज म्हणून प्रसिध्ध झाले.
त्यापैकी आज वडोदरा म्युझीयम आणी त्यात असलेल्या गामा पैलवानाच्या दगडाचं वर्णन दर्शन करूया.
वडोदरा रेल्वे स्टेशन
नाही, हा मॉल किंवा मल्टीप्लेक्स नाही तर वडोदरा बस डेपो आहे.
स्टेशनाहून अवघ्या पाव कि.मी. वर हे श्रीमंत
मेजर जनरल हिझ हाइनेस फरजंद-ए-खास-दौलत-ए-इंग्लीशीया-महाराजा सर सयाजीराव गायकवाड, सेना खासखेल शमशेर बहाद्दुर ध महाराजा ऑफ बरोडा. (ही लांबलचक डिग्री त्यांना इंग्रजांकडून मिळाली होती.)
सयाजीबाग (कमाटीबाग) (स्थापना १८७६)
आणी त्यात असलेलं वडोदरा म्युझ्झीयम (स्थापना १८९४ )
भींती आणी खिडक्या असा कोरीव आहेत.
पृष्ठभाग
त्यात आहे ७० फूटी ब्ल्यु व्हेलचा सांगाडा,पंधराशे दोन हजार वर्षा पूर्वीच्या मूर्त्या,२५०० वर्ष जुनं इजीप्शियन ममी,गायकवाडी मराठी राज्याचे हत्यारं आणी....
आणी हा गामा पैलवानाचा दगड
त्या दगड वरचं लिखाण
दगड उचलणारा पैलवान गुलाम मोहम्मद (गामा)
द्गडाचं वजन ६० मण
दगड उचलण्याची तारीख २३-१२-१९०२
दगडाची किंमत ५० रू.
या खाचांमधे बोटं टेकवून त्याने हा दगड जक्कल ९५ सेकंद पर्यंत जमीनीहून तीन फूट वर पर्यंत उचलला.
म्युझीयमच्या दूसर्या विशीष्टता आणी स्टेशन ते सयाजीबागेच्या वाटेत येणार्या जगप्रसिध्ध महाराजा सयाजीराव युनीवर्सीटी व त्याच्या प्रसिध्ध गुंबजा बद्दल परत केव्हां तरी....
(क्रमशः)
प्रतिक्रिया
16 Mar 2014 - 7:57 pm | अजया
सगळं वडोदरा पाहिलं आणि हा दगड नाही पहाण्यात आला!!
16 Mar 2014 - 8:15 pm | मुक्त विहारि
आवडला...
क्रमशः वाचून बरे वाटले.
16 Mar 2014 - 8:53 pm | तुमचा अभिषेक
दगडाची किंमत ५० रुपये?
म्हणजे?
16 Mar 2014 - 9:36 pm | संतोषएकांडे
पैलवानाला हवा तसा आणी वजनाचा (१२०० किलो)दगड बनवून घेण्यासाठी खर्च झाला ५० रूपये. (१९०२ मधे).
17 Mar 2014 - 1:47 pm | तुमचा अभिषेक
ओह ओके, साधारण वाटले तसेच.. पण एक विचार असाही मनात आला की ज्याला तो दगड उचलून नेता येईल त्याला तो पन्नास रुपयांत :)
18 Mar 2014 - 9:30 am | संतोषएकांडे
दगड उचलून नेणार्याला दगड 'फ्री' आणी वरून '१००० रू. बक्षीस' देण्याचं ठरवीलं होतं त्या वेळी श्रीमंत महाराजांनी....
*smile* :-) :) +) =) :smile:
16 Mar 2014 - 9:32 pm | खटपट्या
६० मण म्हणजे किती किलो ?
16 Mar 2014 - 9:37 pm | संतोषएकांडे
१ मण म्हणजे २० किलो. त्या हिशोबाने दगडाचे वजन १२०० किलो.
17 Mar 2014 - 8:47 pm | इष्टुर फाकडा
एक मण म्हणजे साधारण चाळीस किलो- माझ्या मते !
19 Mar 2014 - 6:04 pm | जेपी
मणाचे माप बहुतेक सगळीकडे वेगळे आहे .
माझ्या माहितीतील .
लातुर-10 किलोचा एक मण
धाराशीव-15 किलोचा एक मण .
(कन्मर्फ केल्यावरच सांगतोय)
19 Mar 2014 - 6:19 pm | प्रभाकर पेठकर
मीही लहानपणी १ मण = ४० किलो ऐकले आहे.
परंतु मस्कतात गुजराथी दुकानात १ मण = ४ किलो हेही प्रमाण पाहिले आहे.
20 Mar 2014 - 12:50 am | संतोषएकांडे
सायबांनो..
आता भारतीय वजनांबद्दल पण एक लेख लिहावाच लागेल असं वाटतय..
टाकतोय. बघाच आता....
16 Mar 2014 - 9:55 pm | प्रभाकर पेठकर
१९६१ ते ७३ ह्या काळात २-३ वेळा कमेठी बागेला भेट दिली आहे पण हा दगड आणि २५०० वर्ष जुनं इजीप्शियन ममी पाहिल्याचे आठवत नाही. नव्याने प्रस्थापित केले असल्यास सांगता येत नाही. पण पूर्वी नक्कीच ते तिथे नव्हते. असो.
कमेठी बाग बरीच मोठी आणि सुंदर आहे. त्यातील गाडी जी इंग्लंडहून सयाजीरावांसाठी खास खेळायला आणली होती त्यात बसून बागेची चक्कर मारणे विशेषतः 'पंछी घर' हे स्टेशन मला आवडायचे.
पुन्हा त्या बागेत चक्कर टाकली पाहिजे.
18 Mar 2014 - 9:46 am | संतोषएकांडे
पेठकर काका
ममी चं आगमन म्युझीयम मधे १९२३ साली झालं. म्युझीयम मधे शिरताच डावी कडे एका खोलीत ते एका काचेच्या पेटीत ठेवलं आहे. आणी अद्याप तिथेच आहे. दगड तिथे बाहेरच म्युझीयमच्या आवारात पडून होता. सहसा त्या कडे लक्ष जाइल असं काही नसल्या मूळे त्याच्या कडे दुर्लक्ष झालं. स्वर्णिम गुजरातच्या परिकल्पने नंतर त्या दगडाचा मान वाढवून त्याला म्युझीयमच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या दालनात ससम्मान प्रस्थापित केला
इंग्लेंडची गाडी आता बागेत नसून तीच्या जागी एक नवी जरा मोठी गाडी आहे. त्यात मोठी माणसं बसून बागेची फेरी कस्रू शकतात.तरी आपली फेरीची इच्छा नक्कीच पूर्ण होणार....
17 Mar 2014 - 1:07 am | बॅटमॅन
अतिशय धन्यवाद फोटोंबद्दल!!!! गामा पैलवानाबद्दल वाचले होते की हा दगड त्याने उचलला म्हणून. डीटेल माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद!!!
मोदका, हाच तो दगड म्हणत होतो बघ.
17 Mar 2014 - 4:19 am | रेवती
फोटू आवडले. स्टेशन खरेच छान आहे.
17 Mar 2014 - 7:01 am | यशोधरा
फोटो आवडले.
17 Mar 2014 - 12:20 pm | राजेश घासकडवी
१२०० किलो?? क्लीन अॅंड जर्क मध्ये सध्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे २६५ किलोंचा! त्याच्या पाचपट कोणीतरी उचलू शकेल हे पूर्णपणे अविश्वसनीय आहे. त्या गामा पैलवानाने स्पेशल दगड बनवून घेऊन मामा केला लोकांना.
17 Mar 2014 - 11:22 pm | बॅटमॅन
क्लीन & जर्क मध्ये उचलायची विशिष्ट पद्धत असते, तस्मात उचलण्याची पद्धत हा मुद्दा एकवेळ बाजूस ठेवू. माणसाने फक्त स्वतःच्या हस्ते कशाही प्रकारे उचललेले सर्वांत जड वजन कुठले हे पाहिले पाहिजे. शिवाय, किती वेळ उचलले हा मुद्दाही डिसरिगार्ड केला तर जास्त बरं. म्हणजे अगदी थोड्या वेळासाठी का होईना, माणूस किती वजन उचलू शकतो याची रेकॉर्ड्स पाहिली पाहिजेत. क्लीन & जर्क हा वजने उचलण्याचा एक ऑलिंपिक खेळप्रकार आहे, त्यात सर्व पद्धती समाविष्ट होऊ शकत नाहीत. तस्मात ऑलिंपिक रेकॉर्ड्स पाहण्यात प्वाइंट नाही.
पॉल अँडरसन नामक प्राण्याने २८४० किलोचे वजन जरा उगीच थोडेसे जरा वेळ उचलल्याचे गिनेस बुकमध्ये नमूद आहे. तो पॅरा पेस्ट करतो.
The Guinness Book of Records reported a back lift by Paul
Anderson (done June 12,1957, in Toccoa, Georgia) of 6,270 pounds
at a bodyweight of 364, calling it the “greatest weight ever raised
by a human being.” Guinness also listed Paul’s best powerlifts as
627 bench press, 1200 squat, and 820 deadlift (done after others
had exceeded Bob Peoples’ record).
दुवा खालीलप्रमाणे:
http://library.la84.org/SportsLibrary/IGH/IGH0305/IGH0305c.pdf
पान क्र. ३ वर पाहणे. तस्मात पॉल अँडरसन जर अंमळ वेळाकरिता २८४० किलो उचलू शकतो तर गामा पैलवानाने १२०० किलोचा दगड जरा वेळ का होईना यावर विश्वास ठेवायला अडचण नसावी, नै का?
19 Mar 2014 - 9:32 am | सुहासदवन
कदाचीत गामा पैलवानने २४०० किलोचा (६० मणाचा) दगड उचलला आणि विक्रम केला आणि त्यानंतर पॉल अँडरसनने २८४० किलोचे वजन उचलून हा जुना विक्रम मोडला असावा.....
19 Mar 2014 - 3:16 pm | राजेश घासकडवी
हम्म्म... एकंदरीत आकडे थोडे पोकळ आणि फसवे आहेत. पॉल अॅंडरसनच्या ६२७० पाउंडांबद्दल - हा आकडा विश्वसनीय नाही. (गिनीज बुकने नंतर एंट्री काढून घेतली) हा व्हिडियो पहा. आणि त्याच्या खालच्या कॉमेंटा वाचा. हा माणूस २००० पाउंड उचलतो आणि तेसुद्धा लीव्हरचं प्रिन्सिपल लावून. म्हणजे सुमारे ७०० पाउंडच उचलतो आहे. पॉल अॅंडरसनचे सगळे विक्रम कायच्याकाय मागे पडलेले आहेत. त्यामुळे आत्ताचे स्ट्रॉंगमेन ७०० उचलतात, आणि त्यावेळचा कोणीतरी ६००० उचलतो हे पटत नाही. म्हणून १२०० किलो किंवा २४०० किलो वगैरे आकड्यांवर अजूनही विश्वास बसत नाही.
19 Mar 2014 - 3:31 pm | बॅटमॅन
मग हा ष्ट्राँगमॅन १००० किलो डेडलिफ्ट कशी काय उचलू शकतो बॉ. गंमतच आहे सगळी.
https://www.youtube.com/watch?v=kL0tORi7Cbk
त्यामुळे १२०० किलोचे वजन काहीकाळ उचलणे तरी अशक्य नसावे असेच वाटते.
17 Mar 2014 - 1:14 pm | विजुभाऊ
हे म्युझिअम खूप वैशिष्ठ्य पूर्ण आहे. इथे पेंढा भरलेले बरेच पशुपक्क्षी आहेत.
व्हेलचा सांगाडा एका मोठ्या दालनात आहे. ही व्हेल म्हणे साबरमती नदीत आतपर्यन्त आला होता. असे सांगितले जाते.
18 Mar 2014 - 9:43 am | मंदार दिलीप जोशी
मस्त.
19 Mar 2014 - 1:50 am | रमेश आठवले
या नावाच्या बडोदा नरेशांनी बांधलेल्या सुरेख राजवाड्याची सचित्र माहिती श्री संतोष एकांडे हे लवकरच सादर करतील अशी आशा वाटते.
तीसरे सयाजीराव हे दूरदर्शी राजे होते. त्यांनी इतर तत्कालीन इतर राजांच्या तुलनेने बरीच आगळी वेगळी कामे केली. त्यापैकी काही -
स्त्रीयांना मोफत शिक्षण आणि शिक्षणाची सक्ती.
राज्याचा कारभार मराठीच्या जागेवर गुजराती भाषेतून करण्याचा पायंडा.
बाबासाहेब आंबेडकर यांची, ते बडोदा संस्थान चे नागरीक नसताना आणि ते दलित वर्गातले असून सुद्धा, केवळ हुशारी लक्षात घेऊन, इंग्लंड मध्ये शिक्षणाची आर्थिक सोय दिली. या निर्णयाचा परिणाम देशावर किती झाला हे आपण सर्व जाणतो.
19 Mar 2014 - 1:54 am | अर्धवटराव
मला वाटायचं कि बाबासाहेबांना कोल्हापुरच्या महाराजांनी मदत केली.
19 Mar 2014 - 12:24 pm | प्रभाकर पेठकर
शाहू महाराजांनी बालगंधर्वांच्या कानाच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला.
20 Mar 2014 - 12:55 am | अर्धवटराव
म्हणजे ते "आम्हि फक्त गादीचे राजे, ज्ञानाचे राजे तुम्ही" असा बाबासाहेबांचा गौरव सयाजीरावांनी केला होता तर.
19 Mar 2014 - 9:53 am | संतोषएकांडे
नक्कीच आठवले साहेब...
अजून तर मी म्युझीयमच्या बाहेरच वावरतोय. या नंतर म्युझीयमच्या आतली माहीती, बागे बद्दलची माहीती व इतर बरचसं आहे. लक्ष्मीविलासचा नंबर लौकरच येइल. स्टेशना वरून चालत शहरा कडे येताना जशजश्या इमारती येतील त्या प्रमाणेच त्याचं अवलोकन मिपाकरांपुढे मांडण्याचा विचार आहे.
19 Mar 2014 - 12:21 pm | आयुर्हित
रमेश आठवलेजी, धन्यवाद.
खूप चांगले उदाहरण दिले आहे आपण.
आता माझी सटकली रे.........! यासाठी उपयोग करता आला मला.
19 Mar 2014 - 9:45 pm | विजुभाऊ
दांडीया बजार बद्दल ल्हा की जरा
20 Mar 2014 - 12:45 am | संतोषएकांडे
विजुभाउ..काय अगदी बेचकीत धरलय..!
आमच्या वास्तव्य्याच्या जागे बद्दल आम्ही शेवटच लीहू बरंका....
20 Mar 2014 - 2:37 am | प्रभाकर पेठकर
दांडियाबाजार, सुरसागर, टॉवर इ.इ.इ. सर्वच येऊ द्या.
दांडियाबाजारात (आमचा उच्चार 'दांड्याबाजार') दहि-खमण मिळायचं. आता दुकान आठवत नाही पण बडोद्यात गेलो तर हमखास दाखवू शकेन (अजून चालू असेल तर...) मऊ जाळीदार खमण, वर फेटलेलं दही, चाट मसाला, तिखट आणि कोथिंबीर ... अहाहा! झकास टेस्ट.
21 Mar 2014 - 1:14 am | संतोषएकांडे
दांडीयाबाजार चार रस्ता
बालुभाइ ना खमण
दही चटणी किसलेल खोबरं आणी खमंग राइची फोडणी
आहा...मज्जाच..
21 Mar 2014 - 2:47 am | श्रीनिवास टिळक
वडोदऱ्याचे डॉक्टर द. वि. नेने “दादुमिया” या टोपणनावाने धर्मभास्करमध्ये एक स्तंभ लिहितात. त्यात बऱ्याच वेळा वडोदऱ्याचे सांस्कृतिक संदर्भ असतात. एकदा त्यांनी सयाजीराव महाराज आणि त्यांचे संस्कृत प्रेम या बद्दल लिहिले होते. तसेच स्वामी विवेकानंद आणि सयाजीराव यांची भेट झाली होती होती. त्यानंतर त्रावणकोरचे राजकुमार मार्तंड वर्मा यांना स्वामीजींनी लिहिलेल्या पत्रात खालील मजकूर होता: "of all the ruling princes he [Vivekahada] met, he had been most impressed with the ability, patriotism, vigor and foresight of H.H. the Gaekwad of Baroda."
म्हणून डॉ. नेने यांना जमले तर भेटा. सयाजीराव आणि संस्कृत, सयाजीराव आणि विवेकानंद भेट या विषयांवर आणखी काही माहिती मिळाली तर पहा आणि त्यावर लिहा हि विनंती.
9 May 2015 - 11:07 pm | चौथा कोनाडा
वडोदरा व वडोदरा म्युझीयमची सुरेख माहिती !
10 May 2015 - 9:59 am | नूतन सावंत
वाचेय. आवडले.पु.भा.प्र.