श्रद्धा म्हणजे...
श्रद्धा म्हणजे आधी असतो
कल्पनांचा भास
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
त्यां'चाच पहिला श्वास
श्रद्धा म्हणजे आधी असतो
जाणिवांचा खेळ
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
फुकट जाणारा वेळ
श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी
दो वक्ताची रोटी
श्रद्धा म्हणजे काही तोंडी
सहज पडलेली बोटी!
श्रद्धा म्हणजे काहिंसाठी
pre plan जुगारी अड्डा
श्रद्धा म्हणजे कुणासाठी
स्वत:च पडायचा खड्डा
श्रद्धा म्हणजे कुणी करतात
ठरवून मोठ्ठी होळी
श्रद्धा म्हणजे कुणी मारतात
ठरवून छुपी अरोळी