One Night Stand आणि आपण सगळे
५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत .