तुला शहरात घर आहे
मोक्याच्या ठिकाणी
बेसिन बाथरुम मधे नळ
सोडला कि धो धो पाणी
२४ तास..
तुझ्या सेकंड होम साठी
माझा डोंगर,झोपडी नको तोडु
माझे ते फर्स्ट होम आहे.
सुंदर तुझ्या खेड्यातून आलास तू माझ्या शहरात
मित्र मित्र म्हणत शिरलास थेट माझ्याच घरात?
अरे तेही होतं नं माझं फर्स्ट होम
का केलस तू ते तुझं सेकंड होम?
अरे तुच नं केलंस माझं शहर बकाल,
मी खेड्यात, डोंगरदर्यात येतो तर गळे काढतोस आजकाल?
रोजगारासाठी शहारात येणं तेंव्हा होती तुझी गरज
शांततेसाठी मी खेड्यात येतो म्हणालो तर करतोस माझेच सावज?
शहरात येताना म्हणाला होतास आपण सारे भारतवासी,
आज मात्र मला ठरवितो आहेस निसर्गद्वेष्टा क्रूर प्रवासी.
वाईट वाटतं तुझा कृतघ्नपणा पाहून,
नाही येत जा तुझ्या स्वार्थी खेड्यात, चालता हो माझ्या गलिच्छ शहरातून.
प्रतिक्रिया
14 Aug 2014 - 6:45 pm | अनुप ढेरे
लिहिलेलं आवडलं आणि पटलं!
14 Aug 2014 - 7:30 pm | कविता१९७८
वास्तवावर लिहिलंय
15 Aug 2014 - 6:30 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर तुझ्या खेड्यातून आलास तू माझ्या शहरात
मित्र मित्र म्हणत शिरलास थेट माझ्याच घरात?
अरे तेही होतं नं माझं फर्स्ट होम
का केलस तू ते तुझं सेकंड होम?
अरे तुच नं केलंस माझं शहर बकाल,
मी खेड्यात, डोंगरदर्यात येतो तर गळे काढतोस आजकाल?
रोजगारासाठी शहारात येणं तेंव्हा होती तुझी गरज
शांततेसाठी मी खेड्यात येतो म्हणालो तर करतोस माझेच सावज?
शहरात येताना म्हणाला होतास आपण सारे भारतवासी,
आज मात्र मला ठरवितो आहेस निसर्गद्वेष्टा क्रूर प्रवासी.
वाईट वाटतं तुझा कृतघ्नपणा पाहून,
नाही येत जा तुझ्या स्वार्थी खेड्यात, चालता हो माझ्या गलिच्छ शहरातून.
कृपया, वैयक्तिक घेऊ नये ही नम्र विनंती.
16 Aug 2014 - 7:01 am | कविता१९७८
हे हि वास्तवच आहे.
16 Aug 2014 - 3:16 pm | पोटे
दोन्ही सुंदर आहेत.
16 Aug 2014 - 4:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
एकदम सरस
16 Aug 2014 - 4:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
सुद्धा आवडली.थोडक्यात मोठा आशय व्यक्त केलाय
16 Aug 2014 - 4:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
सुद्धा आवडली.थोडक्यात मोठा आशय व्यक्त केलाय
16 Aug 2014 - 5:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
>>> तुझ्या सेकंड होम साठी
माझा डोंगर,झोपडी नको तोडु
माझे ते फर्स्ट होम आहे. >>>
या ऐवजी,
तुझ्या सेकंड होम साठी
माझा डोंगर, झोपडी विकणार नाही
माझे ते फर्स्ट होम आहे.
असं म्हटलं (आणि केलं) तर हा प्रश्न निर्माणच होणार नाही ना ! :) ;)