संस्कृती
संवादिका - ३
"आहेस का रे?"
"आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे."
"तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?"
"व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?"
"माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला."
"असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D"
"नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..."
"असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?"
"तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?"
श्रद्धा म्हणजे...
श्रद्धा म्हणजे आधी असतो
कल्पनांचा भास
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
त्यां'चाच पहिला श्वास
श्रद्धा म्हणजे आधी असतो
जाणिवांचा खेळ
श्रद्धा म्हणजे नंतर होतो
फुकट जाणारा वेळ
श्रद्धा म्हणजे कुणा तोंडी
दो वक्ताची रोटी
श्रद्धा म्हणजे काही तोंडी
सहज पडलेली बोटी!
श्रद्धा म्हणजे काहिंसाठी
pre plan जुगारी अड्डा
श्रद्धा म्हणजे कुणासाठी
स्वत:च पडायचा खड्डा
श्रद्धा म्हणजे कुणी करतात
ठरवून मोठ्ठी होळी
श्रद्धा म्हणजे कुणी मारतात
ठरवून छुपी अरोळी
तांत्रिक मत"
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव "
तांत्रिक मत"
ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला..
पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली
समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत.. साधना कालाच्या उदरात लुप्त पावले.
तांत्रिक मत" मानणा~या व अभ्यासणा~या लोकानी एका मोठ्या महा विद्यालयाची स्थापना मध्य प्रदेशातिल मुरेना या गावि स्थापना केली होति..
पण आज ते महाविद्यालय भग्नावस्थेत उभे आहे..
बीज अंकुरे अंकुरे (शेतातील बालपण)
मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. माझे बालपण आमच्या शेताच्या सहवासात बागडण्यात गेले. आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. माझी आई प्रार्थमिक शिक्षिका, वडील मुंबईत प्रीमियर कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांनी शेती सांभाळायची म्हणून कायम नाइट शिफ्ट केली. घरात माझा मोठा भाऊ व आजी असे आमचे कुटुंब होते. शेतकरी आणि शेत हे दोन्ही एकरूप झाले म्हणजे मोतीदार धान्याचे पीक शेतात डोलू लागते. आमच्या शेतात तांदळाचे पीक दरवर्षी रुबाबात मिरवत असे.
तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा
मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही. परंतु मराठी विकिपीडियाच्या मराठी विक्शनरी या (ऑनलाईन शब्दकोश) बन्धू प्रकल्पासाठी
१) मराठीच्या बोलीभाषांमध्ये असलेल्या पण प्रमाण मराठीत न वापरल्या जाणार्या शब्दार्थांची नोंद घेणे.
२) एखाद्या (कोणत्याही) शब्दास प्रमाण मराठीत वापरात नसलेला पण बोलीभाषेत असलेल्या समानार्थी शब्दांची नोंद घेणे
गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१२
बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)
वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे. पुन्हा.......... हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात. एकच अर्थ देतात..तो म्हणजे पुन्हा!!! ..खरं तर तिथे पुन्हा जाणं,ही घटना..म्हटली तर माझ्या हतातली,म्हटली तर नाही!
रस्त्यांवरील अपघात आणि वाहन संस्कृती
गोपिनाथ मुंडे यांचे काल सकाळी रस्यावरील अपघातात दुख्खःद निधन झाले. भारतभरात रोज दररोज शेकडो अपघात होतात. गोपिनाथ मुंडेंसारखा जाणता नेता काळा आड होतो तेव्हा देशाची मह्त्वपूर्ण हानी होते तेव्हा आपण हळहळतो आणि आपापल्या दिनक्रमास लागतो.
गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच. पण या निमीत्ताने तरी सर्वच भारतीयांनी आपली वाहन चालवण्याची संस्कृती तपासून पहावयास हवी असे वाटते.
महाभारत
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे परकीयांपेक्षा स्वकीयांची भीती जास्त वाटते,
जगण्यासाठी क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागते,
छोट्या छोट्या गोष्टींसाठी वारंवार
झगडावे लागते,
हे जीवन एक महाभारत आहे भाऊ !!
इथे नीतीमत्तेची रोजच होळी केली जातेय,
जातीच्या धर्माच्या आधारावर उचनीच ठरवले जातेय,
तरी जो तत्वांना जागतो त्याला षंढ ठरवले जातेय,
हे जीवन एक महाभारत झालेय हे भाऊ !!
इथे स्वार्थासाठी जो तो हपापलाय,
माझे माझे करताना परिवार माञ विसरलाय,
दूरदूरवर पसरलाय अन्याय,
न्याय माञ कुठेतरी हरवलाय,