एक मजेदार घटना..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Jul 2014 - 2:42 pm

दांडेकर पुलावरुन जाताना एका मोसा वाल्याने एका बाईचे मंगळसुत्र चोरले.... हिसक्याने बाई स्कुटरवरुन खाली पडली व तिला चांगलेच लागले..ह्या प्रसंगाचा धसका घेतला व हिला म्हटले मंगळ सुत्र निदान बाहेर जाताना घालु नकोस..व तिने मान्य केले...
घरापासुन थोड्या अंतरावर नुक्कड आहे तिथे किराणामाल जनरल स्टोर बेकरी अशी दुकाने आहेत आठवड्यातुन ३-४ वळा तिथे जाणे असतेच,,सारे मित्र झाले आहेत..
मधे आजारी होतो डॉक्स ने १ महिना घराबाहेर पडु नका पुर्ण विश्रांति घ्या असा सल्ला दिला...व मी तो पाळला तब्बेत पण बरी नव्हतिच..
त्या काळात सौ बाजार हाट करत असे.
बरे वाटले अन जनरल स्टोर च्या दुकानात गेलो..
मला पहाताच मालक आश्चर्य चकित होवुन म्हणाला..."आयला तुम्हि आहात हो अजुन?"
मला कळेना.. मी म्हणालो आहे ना..असे का विचारता?
त्यावर तो म्हणाला परवा वहिनी येवुन गेल्या होत्या गळ्यात मंगळसुत्र नव्हते..तुम्हि पण दिसला नाहित.. विचारणार होतो पण त्या घाईत होत्या..त्या मुळे मला वाटले......
मला हसु आले..घरी आल्यावर तिला किस्सा सांगितला.
तिने कपाटातले मंगळसुत्र काढले व गळ्यात घातले.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

7 Jul 2014 - 2:54 pm | भिंगरी

मंगलसूत्राच्या ऐवजी नवरा गळ्यात घालून फिरावे का?

पगला गजोधर's picture

7 Jul 2014 - 3:57 pm | पगला गजोधर

दुकानमालकाला विचारायचे नं, 'गधड्या अरेपण, कप्पालाला लावलेलं गंध/टिकली/कुंकू बघायचं न भौ !'. निदान पायातले जोडवे तरी.

(बा द वे, तरीच अशोक-सराफ चे पात्र सारखं म्हणायचं 'सौदामिनी, आधी कु कु लहाव , आदि खु खु लहाव ' रेफ : माझा पती करोडपती, आत्ता लष्करात आलं , कुकुवाच महत्व )

तुमचा अभिषेक's picture

7 Jul 2014 - 2:56 pm | तुमचा अभिषेक

हा हा हा सहिये ..

तुमचा अभिषेक's picture

7 Jul 2014 - 2:57 pm | तुमचा अभिषेक

मोसा बोले तो ?

मोटारसायकल का?

प्यारे१'s picture

7 Jul 2014 - 2:58 pm | प्यारे१

खरंच मजेदार.
कारुण्यरसातून नकळतपणं उत्पन्न झालेला हा विनोद वाचकांचा हशा नक्कीच मिळवतोय.

बाकी: ओ काका, तुम्हाला लई काथ्याकूट करायचाय अजून. एकोळी धागे काढायचेत. जाताय कुठं? ;)

च्यायला =)) खरेच मजेदार किस्सा आहे खरा.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2014 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा

संपली .. एकदाची... ;) वाचता वाचता *blum3*

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Jul 2014 - 2:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मस्तच किस्सा रे अवि.बाजार्हाटासाठी आता तूच जात जा.

आणि स्कूटरवर फिरायला जातांना, कुत्र्याला पत्नीच्या मांडीवर बसवा. पण साखळी मोठी ठेवा, नाही तर उगीच बचत करायला जाल आणि कुत्र्यानं मोसावाल्यावर झेप घेतल्यावर, हिसका बसून... कुत्र्यासकट वहिनीपण `मोसा'वर जातील. तो सुसाट निघून जाईल आणि तुम्हाला मंगळसूत्र, वहिनी आणि कुत्रा असा तिहेरी फटका बसेल.