ऑनलाईन मराठी कट्यांच्या आणि ग्रूप्सच्या मराठी आणि महाराष्ट्रासाठीच्या योगदानाची माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
6 Jul 2014 - 10:41 am
गाभा: 

आंतरजालाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या ऑनलाईन मराठी लोकांच्या कट्यांच्या आणि ग्रूप्सच्या मराठी आणि महाराष्ट्रासाठीच्या उल्लेखनीय योगदानाची माहिती हवी.

* कट्टे = यात मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारे कट्टे आले

* ग्रूप = यात जुने याहू ऑर्कूट ग्रूप नवीन काळातील फेसबूक ग्रूप इत्यादी तत्सम ग्रूप आले

* या धाग्यावर प्राप्त ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेली माहिती मराठी विकिपीडियासाठी वापरली जाऊ शकते म्हणून नेहमी प्रमाणे या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.

* दिल्या जाणार्‍या माहितीस इतर सदस्यांचा दुजोरा उपयूक्त ठरणारा असू शकेल.

* प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार

प्रतिक्रिया

संचित's picture

6 Jul 2014 - 2:59 pm | संचित

यात जुने याहू ऑर्कूट ग्रूप नवीन काळातील फेसबूक ग्रूप इत्यादी तत्सम ग्रूप आले

ऑर्कूट बन्द झाल हो. गूगल ने अधिकृत घोषणा केली.

माहितगार's picture

6 Jul 2014 - 3:37 pm | माहितगार

ऑर्कूट बन्द झाल हो. गूगल ने अधिकृत घोषणा केली.

ऑर्कूट सप्टेंबर २०१४ पासून बंद होतयं, याहू ग्रूप्स पण फारस वापरात नाही. मुद्दा तो नाही. ज्या काळात ती माध्यम वापरली जात होती त्या काळात वापरणार्‍यांकडून मराठी अथवा महाराष्ट्राला म्हणून काही योगदान झाले आहे का ? वापरकर्त्यांपैकी/ सहभागी लोकांपैकी कुणी तशी भूमीका मांडू इच्छित का ? याचा आढावा घेणे हा उद्देश आहे.

एकुलता एक डॉन's picture

6 Jul 2014 - 3:42 pm | एकुलता एक डॉन

सहित्या चोरि फक्त झाली

माहितगार's picture

6 Jul 2014 - 5:41 pm | माहितगार

=))