रस्त्यांवरील अपघात आणि वाहन संस्कृती

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Jun 2014 - 10:25 am
गाभा: 

गोपिनाथ मुंडे यांचे काल सकाळी रस्यावरील अपघातात दुख्खःद निधन झाले. भारतभरात रोज दररोज शेकडो अपघात होतात. गोपिनाथ मुंडेंसारखा जाणता नेता काळा आड होतो तेव्हा देशाची मह्त्वपूर्ण हानी होते तेव्हा आपण हळहळतो आणि आपापल्या दिनक्रमास लागतो.

गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच. पण या निमीत्ताने तरी सर्वच भारतीयांनी आपली वाहन चालवण्याची संस्कृती तपासून पहावयास हवी असे वाटते.

बर्‍याच जणांना स्वतःच्या भरधाव आणि बेदरकार वाहनचालवण्याचे मोठे कौतुक असते त्यांच्या लेखी सांभाळून वाहनचालवणारे वेडे असतात. वस्तुतः वाहन चालवणार्‍या चालकाला जे दृश्य दिसते ते आणि तसेच आजूबाजूच्या आणि मागच्या कोणत्याही व्यक्तीला दिसणे तांत्रीकदृष्ट्या बहुतांश वेळा शक्य नसते. वाहनचालकास त्याच्या समोरचे अडथळे त्यालाच दिसत असतात ते मागच्या वाहनचालकास दिसतीलच असे नाही. किंवा काही वेळा रस्त्यावर अडथळाही नसतो पण वाहनचालक स्वतःच्या कुटूंबासोबत वेगवेगळ्या कारणांनी सावकाश वाहन हाकत असू शकतो, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मानवी संस्कृती असते शाळा असतात, दवाखाने असतात वृद्ध अपंगांना रस्ता क्रॉस करावयाचा असू शकतो, पण रस्त्यावर आपल्यापुढे कुणी सांभाळून अथवा सावकाश वाहन चालवत असेल तर त्याचा मागून हॉर्न वाजवून त्याचा पिट्टा पाडला जातो आणि बहुतांश लोकांना तीच (बेदरकारपणे वाहन हाकण्याची ) सवय लागते.

बहुतांश लोक बेदरकारपणाची सुरवात घरातूनच करतात का अशी शंका वाटते. घरातून स्वतः वेळेवर न निघणारी मंडळी बाहेर रस्त्यावर आल्यानंतर प्रचंड घाईत असताना दिसतात. रस्त्यावर कितीही वेगाने चालवले तरी लाल सिग्नलला थांबावे लागणारच आहे याचे भानही नसते. हा बेदरकारपणा इथेच थांबत नाही, आपल्या समोर आणि डाव्या - उजव्या बाजूच्या वाहनांशी सुद्धा किमान अंतर न सोडणे, सिंगल लेन ड्राईव्ह न करणे , लेन बदलताना हात अथवा इंडीकेटर न दाखवणे, सिग्नलचा डाव्या हातास लाल सिग्नल असल्यास तो न पाळणे ( डाव्या हातास सिग्नल केव्हा असतो आणि नसतो हे बर्‍याच जणांना माहिती नसते), डाव्या हातास सिग्नल नसलातरी काही वेळा ट्रॅफीक मंदावते अथवा थांबते आणि डावीकडे न वळणारी वाहने सुद्धा वाटेत थांबलेली असतात अशा वेळी ट्रॅफीक मोकळा होई पर्यंत संयम बाळगण्या एवजी हॉर्नवर हॉर्न वाजवून अवघा आसमंत एक करताना आजू बाजूला लोक राहतात त्यांच्या कानाचे पडदे आपण फाडतो आहोत याचे भान न ठेवणे, लाल सिग्नल लागण्याच्या आधी वेग कमी करण्याच्या एवजी सिग्नल पार करण्यासाठी वेग वाढवणे आणि नंतर लाल सिग्नल लागलाच आणि तोडता नाही आला तर झेब्रा क्रॉसिंगच्यावर आणि पुढेपर्यंत वाहने थांबवणे, हिरवा सिग्नल दिसण्यापुर्वीच आपल्याच रस्त्याची पाळी आहे समजून सिग्नल रेड असतानाच वाहने हाकणे चालू करून सिग्नल जंप करणे, एकुण ज्याला सिग्नल हिरवा आहे त्यानेही आपले वाहन जीव मुठीत धरून हाकले पाहीजे. मोबाईल फोन कानाला लावून वाहन चालवणे आपला हक्क आहे वाटणारे लोक असतातच पण आपला मित्र नातेवाईक वाहन चालवत असण्याची शक्यता आहे हे माहित असून सुद्धा त्याला फोन लावून आणि बोलण्यास भाग पाडणारे महाभाग मित्र आणि नातेवाईक सुद्धा दिसून येतात. अथवा ऑफीस स्टाफच्या अमुल्य जिवाची काळजी नकरता त्याला चालत्या वाहनातून मोबाईलवर बोलण्यास भाग पाडणारे सहकारी.
काही वाहनांचे वाहक कसेही करून गाडीने अ‍ॅव्हरेज दिलेच पाहीजे म्हणून गाड्या भरधाव हाकत असतात. तर दुसरीकडे ड्रायव्हर म्हणून नौकरीस असलेली मंडळी एकतर मालकांच्या/प्रवाशाच्यां भिडेस्तव भरधाव धावत असते अथवा मालक शिस्तबद्ध ड्रायव्हींगचा चाहता असेल तर जेव्हा गाडीत मालक/प्रवासी नसतील तेव्हा बरीच ड्रायव्हर मंडळी आपले स्वतःचे आप्तांकडे स्वतःच्या गाड्या असणार नाही हे विसरून गाडी मिळालीये रिकामी तर चालवा बेदरकार या अविर्भावात गाड्या हाकताना दिसतात. नाही म्हणावयास एखाद्या गाडीच्या मागे हे वाहन बरोबर चालवले जात नसल्यास संपर्ककरण्याचा क्रमांक दिलेला असतो पण गाडीस पगारी ड्रायव्हर असलेल्या इतर मालक आणि कंपन्यांनी सुद्धा हे करावयास हवे नसता अप्रत्यक्ष नुकसान या ड्रायव्हर आणि मालकांचेच असते हे त्यांनी लक्षात घ्यावयास हवे.

दुसर्‍या बाजूला सिग्नलचे काहीच दिवे(बल्ब) चालू असणे आणि काही चालू नसणे तरीही सिग्नल चालू ठेवणे असे प्रकारही आढळून येतात. ट्रॅफीकबद्दलच्या काही चर्चा झाल्याचतर हेल्मेट, सीटबेल्ट, स्पीडब्रेकर आणि पार्कींगच्या समस्यांच्या पुढे धावत नाहीत. काही सोसायट्या आत विजीटर पार्कींग करता पुरेशी जागा असून सुद्धा केवळ नियमाकरता नियम लावून विजीटर्सना रस्त्यावर पार्कींग करण्या करता लावताना आपल्याच घराशेजारच्या रस्याची रुंदी त्यामुळे कमी होणार हेही विसरलेले असतात. रस्त्याचे (चौकाचे) कॉर्नर्स व्हिजीबीलीटी कमी करणारे असतील तर ते बदलून व्हिजीबिलीटी वाढवणे. युटर्न्सचा वापर कमीत कमी होईल हे वाहनचालकांनी आणि ट्रॅफीकची/रस्त्यांची आखणी करणार्‍यानी पाहण्याची गरज असू शकते हे तर आमच्या ध्यानीमनीही नसते.

असो तक्रारींचे पुराण पुरे करतो, आणि आपला सर्वांचा रस्त्यांवरील प्रवास सुखरुप होवो हि शुभेच्छा देतो.

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

4 Jun 2014 - 10:46 am | प्रभाकर पेठकर

कित्येकदा वाहन चालविताना चालकाची अपुरी झोप किंवा अल्कोहोलचा प्रभाव त्याच्या मेंदूच्या निर्णयक्षमतेत उणीव निर्माण करते जे अत्यंत घातक असतं. कित्येकदा वाहन भरधाव चालविताना विचारांमध्ये बुडलेल्या किंवा इतर प्रवाशांशी चर्चा/विनोद करण्यात गुंतलेला चालक त्याच्या नकळत मार्गिका (लेन) बदलून दुसर्‍या मार्गिकेत घुसतो तेही अत्यंत घातक असतं.
मोकळ्या रस्त्यावर कधी कधी चालक स्वतःच्याच विचारात लाल इशारा (सिग्नल) लक्षात न येऊन पुढे जातो आणि अपघाताला आमंत्रण देतो.
'कुछ नही होता' ही वृती जास्तित जास्त अपघातांना आमंत्रण देणारी असते. आजपर्यंत कसेही वागून अपघात न झाल्यातून ती अधिकाधिक ठाम होत गेलेली असते. ह्यावर भारतिय रेल्वेने लावलेली एक समाज प्रबोधनाची जाहिरात आठवते. दोघेजणं उंच आकाशात ढगावर बसलेले आहेत आणि गप्पा मारत आहेत असे चित्र होते. दोघांच्याही डोक्यावरील दाखवलेली चक्र ते मृतात्मे आहेत हे दर्शवत होते. खाली इंग्रजी भाषेत संदेश होता...
'I crossed railway lines thousand times But accident took place only once.'
Use overhead bridge.

हम्म... मंगळावर यान पाठवणार्‍या देशात लोक रस्ते अपघातात ठार कसे होतात बरं ?
असो... या धाग्यामुळे मला माझाच एक जुना प्रतिसाद आठवला :-
http://www.misalpav.com/comment/548746#comment-548746
मागच्याच आठवड्यात माझाही दुचाकी चालवताना अपघात झाला, अर्थात कारण रस्ताच...नशिब फ्रॅक्चर झाले नाही, पण टंकताना अजुन त्रास होत आहे.

पुर्वी च्या काळा सारखं मग, जावं की निवांत.
३० ते ४० मिनिटांनी घरी पोहोचुन व्यवस्थित फोन वर बोलता येतेच की.
आपण अंबानी नाही कि टाटा नाही की ४-५ मि. ने लाखाच/कोटींच नुकसान होईल.
आपल्याला काही जिवापेक्षा फोन जास्त महत्वाचा नाही.
हे सर्व कळले तरी बास झाले.

उदय's picture

5 Jun 2014 - 7:26 pm | उदय

गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच.

पण गोपिनाथ मुंडे यांनी सीटबेल्ट लावला होता की न्हवता, याबद्दल काही माहिती आहे का? लेडी डायनाचा अंगरक्षक जो ड्रायव्हरशेजारी बसला होता, तो केवळ सीटबेल्टमुळे वाचला होता, असे वाचल्याचे आठवते.

कशात प्रौढी, किंवा धन्यता आहे आणि कशात कमीपणा मानावा, हे जर भारतीय लोकांना कळलं असतं, तर मग आणखी काय हवं होतं?