बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
5 Jun 2014 - 1:52 am

वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे. पुन्हा.......... हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात. एकच अर्थ देतात..तो म्हणजे पुन्हा!!! ..खरं तर तिथे पुन्हा जाणं,ही घटना..म्हटली तर माझ्या हतातली,म्हटली तर नाही!

अत्ता गेल्या महिन्यात माझ्या एका यजमानाच्या बंगल्याची वास्तुशांत करायला गेलो होतो,तेंव्हाचा हा प्रसंग आहे. त्यांचा बंगला(फार्म हाऊस) बेडश्याच्याच रस्त्यावर आत एके ठिकाणी. काम अवरलं..आणि जेवायला बसल्यावर आमच्या सहकार्‍यांकडे विषय काढला.तसा तो काम ठरलं तेंव्हापासूनच मनात होता.पण एकदा काम म्हटलं,की मग काम प्रथम,मग नंतर इतर..बाकिचं..या व्यावसायिक तत्वाला अनुसरून,शेवट..जेवणं होता होता सहकारी-मित्रांना म्हणालो, "आज तुंम्हाला एका अद्भुताची भेट घडवली तर चालेल का?" माझ्या ह्या अनपेक्षित समाधिस्थ वाक्यानी ;) त्यांचे कान एकदम टवकारले..आणि उत्तरादाखल, तिघांचा (डोळ्यांनीच)एकत्रित प्रश्न आला-"का........य?????" मी:- "अरे..इथुन ५ कि.मि.वर बेडसे लेणी नावाचा एक खरच भारी चमत्कार आहे. तुंम्ही पहाल,तर या आजच्या दिवसाला कामापेक्षा जास्त अठवाल." माझ्या या प्रस्तावनेचा तिघांवर अपेक्षित परिणाम झाला.आणि मग तिथून बाहेर पडल्यावर आमचा मोर्चा बेडश्याकडे निघाला. बेडश्याच्या पायर्‍यांजवळ गेलो,आणि त्यांना किती उंचीवर ..कुठे आहे ते जेवतानाच सांगितलेलं असल्यामुळे,आमच्या त्या तिघांमधला एक नामी-वीर* म्हणालाच, "गुर्जी...उतरल्या-नंतरचं दुसरं जेवण तुमच्याकडे लागलं बरं का!" :D

पण वरच्या वाक्यातला विनोद त्यादिवशी सर्वार्थानं खरा ठरला,एक तर सकाळी ८ ते १२ हा "बंगल्याच्या" वास्तुशांतिमुळे झालेला नेहमीपेक्षा जास्तीचा वर्कआउट..आणि त्यावर छान जोर्रात झालेलं जेवण. ह्याच्या नंतर मस्त "पडी-लावण्याच्या" त्यांचा(माझ्या-सह ;) ) दैंनंदिन सुखाला मी हे असं माझ्या हौसेपोटी आडमार्गाला आणून ठेवलं होतं! त्यामुळे नाराजीनी नाही..पण हौसेनिही नाही..अश्या अवस्थेत मंडळी माझ्यासह दुपारी २ च्या उन्हात..
१)हाशहुश्श करत..थांबत बसत वर'ती आली!
https://lh5.googleusercontent.com/-hLBblo4XIYo/U49unxDqeUI/AAAAAAAACz0/88i6D1Oar6Y/s512/IMG-20140524-WA0024.jpg
२)चौघात डाविकडून अनुक्रमे:-नाखरे,दिवेकर(मी),नाटेकर,आराध्ये*...
https://lh4.googleusercontent.com/-iZmDVvoV9Fw/U490Bh_yBOI/AAAAAAAAC0A/oaf2vik5ACE/s640/IMG-20140524-WA0020.jpg
हा आराध्ये आहे ना..त्याच्याच मुळे हे# व्हिडिओ शुट घडलेले आहेत..(कामात नविन आहे पोर..पण लै क्रीएटिव्ह आहे लेकाचं! ;) )
फोटो काढत (एकमेकांचेही ;) ) आंम्ही वरती आलो...
आणि मग तिथून मी त्यांना पहिलं दर्शन घडवलं..ते खास माझ्या श्टाइलनी...शेवटाच्या ४ पायर्‍या अलिकडे मी त्यांना डोळे बंद करायला लावले. आणि तिथून माझ्या खास कॉमेंट्रीसह त्यांना आतल्या लोखंडी अडसरापर्यंत तसच ऐकवत..ऐकवत आणलं.मग आता डोळे उघडा!!!!!!!! अशी स्वसंमोहन उपचारात वापरतात तश्या आवाजात.. शेवटची सूचना दिली... आणि मग डोळे उघडताच............................काय झालं!!!!?????

तिघे जण आतला नजारा..विशेष करून वरची खांबांवरची शिल्प...सगळी आखिवरेखिव कोरीव लेणी अक्षरशः विस्फारलेल्या ..आश्चर्यचकित डोळ्यांनी बघत राहिली!

बास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!इथेच माझं काम संपलं! .मग त्या 'प्रथम-दर्शना' नंतर त्यांना तिथून बाहेर आणून (मनात एकदा वल्ली..लेखःस्मरण करून ;) ..) मी त्यांना समग्र लेणी आधी - दाखवली! आणि नंतर आत चैत्यगृहात सगळे जाऊन स्थिरावलो. मग थोडी त्यांना चैत्यगृहातल्या खांबावरच्या चिन्हांची..त्याच्या जुनेपणाची अठवेल तशी माहिती सांगितली..आणि अचानक एक कल्पना आली डोक्यात..मनात म्हटलं, आपली "समाधि" कविता "इथलिच"...ती यांना इथेच वाचून दाखवली तर?????????? पटकन आमच्या मित्राचा फोन घेऊन नेट-लावलं (माझं नेट-भारत संचा..र अवस्थेत गेलेलं होतं! )..आणि माझी "समाधी" हुडकुन काढली! ती वाचून पूर्ण होते तोच तिचा इथेच व्हिडिओ शुट काढावा अशी दुसरी कल्पना डोक्यात आली.आणि मग एका छोट्या प्रस्तावनेसह आधी "समाधी" आणि नंतर "बेडसे लेणी-एक गूढानुभव" चं तिथे एक त्यावेळी जमलं तसं छोटेखानी व्हिडिओ शुट काढलं. (या दोन्ही कविता मि.पा.वर आहेत) खरच सांगतो...त्या दोन्ही कविता लिहिल्या गेल्या ती वेळ आणि ही वेळ मला एकच वाटावी..अशी एक निराळीच अनुभूती मला त्याठिकाणी आली. त्यामुळे..आता फार काहि अधिक न बोलता हा सगळा अनुभव तुम्हा सर्वांसमोर ठेवतो... तुंम्ही अनुभवा आणि योगायोगानी झालेला हा प्रयत्न कसा वाटला? .. ते सांगाही! :)

१)#प्रस्तावना...(ही प्रस्तावना आणि पुढे तिच्यासह पहिली कविता "समाधी" असं आधी ठरल होतं.पण त्याच्या फोनवरून मी २ वेळा स्क्रीन धरून ठेवायला चुकलो..आणि प्रस्तावना संपल्यावर कविता वाचायला गेलो तर फोन लॉक...बॅटरीही कमी उरलि होती..म्हणून मग प्रस्तावना वेगळी आणि पुढे कविता वेगळी असे नाइलाजानी करावे लागले)

२)#समाधी

३)#बेडसे लेणी-एक गूढानूभव!

============================
तर....अश्या या गूढ आणि तितक्याच रम्य बेडसे लेण्यांना मी जितक्या वेळा जाइन..त्यापेक्षा माझं मन पुन्हःपुन्हा तिथे अधिक जाइल..जात राहिल..हेच अखेर खरं आहे. आज या लेखना निमित्तानी मी तिथे गेलेलो आहेच..आणि ते जिवंत काव्य आज पुन्हा माझ्याशी परत येता येता काहि बोलू पहातय... तो संवाद तुमच्या समोर मांडून,तूर्तास मी आपली रजा घेतो..................भेटू तिथेच...

................पुन्हा...!................

जाइन पुन्हा मी तेथे
घडवीन पुन्हा मी काही
फिरता माघारी...पुन्हा
वाटेल राहिले..काही!

हे कैसे गूढ तरिही???
किती उकलत जाऊ मी ही
लागताच हाती इतुके
मन म्हणते 'तितुके'..नाही

किती काव्य लिहु मी आता?
की.."थांब!" म्हणू मी मजला?
मन देत इशारा तरिही
फिरुनी म्हण'ते मज..नाही

मग मी ही सोडून देतो
वारूला-माझ्या इतुका
पण खुंटी त्याची 'तेथे'
तेथूनच-सुटका..नाही!!!

आता या गूढापाशी
किती काळ पुन्हा थबकेन???
हा 'थांग" कसा मी लाऊ?
मन पुन्हा म्हणते...नाही!
==============================

संस्कृतीकलानाट्यकविताअनुभव

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2014 - 2:31 am | प्रभाकर पेठकर

>>>> मंडळी माझ्यासह दुपारी २ च्या उन्हात..हाशहुश्श करत..थांबत बसत वरती आली!

गुरुजी, ह्या वाक्याने मनाला एक समाधान वाटले की असा थांबत थांबत बसत बसत 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो.

बेडसे लेण्यांच्या पुनर्दर्शनाने आनंद झाला. त्यात तुमचे काव्य वाचन म्हणजे दूधात साखर किंवा पंचामृतच म्हणाना.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2014 - 9:45 am | अत्रुप्त आत्मा

@ 'वरती' जाणार्‍यात मी एकटाच नाही तरुण मुलेही आहेत. असो.>>> =)) असं नाय हां...आंम्ही आधिच सकाळच्या कामाने आउट झालेलो होतो,त्यात यजमानाने भोजन/विडा/दक्षिणा देऊनी लोळविलेले होते! =)) म्हणून ही अवस्था..नाय तर ;)

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2014 - 10:20 am | प्रभाकर पेठकर

गुरुजी,

आम्हीही मिसळ आणि ८ पाव चापून बसलो होतो. (आ केला असता तर, मिसळीच्या रश्शात भिजलेला, पावाचा शेवटचा तुकडा नरड्यात दिसला असता). त्यात पुन्हा दुपारचे जागरण झाले होते. सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2014 - 2:41 pm | टवाळ कार्टा

दुपारचे जागरण = टोचणार्या गुलाबाच्या पाकळ्या :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१११

आणि अआंच्या काव्यगायनाने त्याला चार चांद लावले !

चौकटराजा's picture

5 Jun 2014 - 7:06 am | चौकटराजा

बुवा, वल्लीला लेखः स्मरणाची रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? मी साक्षीदार म्हणून येतो.( वल्ली बरोबर चौराची यात्रा ! )
बाकी त्या भागात एक बंगल्यांची कॉलनीच होणार आहे. मग चंगळ वास्तूशांत्या अन गूढयात्रेची !
आपला नम्र
खवचट म्हातारा .

माझीही शॅम्पेन's picture

5 Jun 2014 - 9:50 am | माझीही शॅम्पेन

बुवा, वल्लीला लेखः स्मरणाची रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार

अगदी हेच बोल्तो !!!!

बुवा, वल्लीला लेखः स्मरणाची रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ?

थंडा मामला नैतर बाबा रामदेव ढाबा चालेल.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2014 - 10:11 am | अत्रुप्त आत्मा

@रॉयल्टी कोणत्या हाटेलात देणार ? >>> हा घ्या रॉयल टी! http://www.sherv.net/cm/emoticons/drink/tea.gif ;) इथेच देतो..हाटिल कशाला? :-/

@थंडा मामला नैतर बाबा रामदेव ढाबा चालेल.>>> :-/ llllllllllluuuuuuuu :-/

विटेकर's picture

5 Jun 2014 - 11:18 am | विटेकर

ठंडा मामला के बराब्बर सामने अपना घर हो रयेला हय..
सगळ हिषेब तिथेच पूर्ण करु... पायजेल तर जेवण ठंडा मामला तिथूनच मागवू..
तत्पूर्वी "स्-वल्ली घोरावडे लेणी " पाहू..
.
.
.
.
होऊ दे खर्च !

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2014 - 12:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपला नम्र... खवचट म्हातारा संदर्भासह स्पष्टीकरण करा (५ गुण)... ही, ही, ही SSSSS

(संदर्भ माहित असलेला) इए

प्रचेतस's picture

5 Jun 2014 - 9:48 am | प्रचेतस

पुन्हा मस्त लिहिलंय. रेकॉर्डिंग तर सुरेख झालंय.
माझ्यापेक्षा तुम्हालाच बेडश्यानं जास्त झपाटलंय

बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा दहिभाते पाहून डोळे पाणावले.

चाणक्य's picture

5 Jun 2014 - 10:55 am | चाणक्य

वाह बुवा. रहावलं नाही आणि हापिसात फोनवर बाॅसची नजर चुकवत ऎकलं. कवी कडूनच त्याची कविता ऎकायला मिळावी यासारखं सुख नाही.

एस's picture

5 Jun 2014 - 11:07 am | एस

बेडसे लेणी खरोखरच सुंदर आहेत. आणि भाजे-कार्ले लेण्यांप्रमाणे तिथे माणसांच्या व्यावसायिकतेचे जंजाळ नाही. निदान मी पाहिली तेव्हा तरी नव्हते. तिथे खरंच चिटपाखरूही नसे. तेव्हा अशा पायर्‍याही नव्हत्या. आता बरंच काही बदललंय असं वाटतंय.

खटपट्या's picture

5 Jun 2014 - 11:27 am | खटपट्या

आत्मा साहेबांचा फक्त कविता वाचानांचा कार्यक्रम एका कट्ट्यावर झाला पाहिजे

चौकटराजा's picture

6 Jun 2014 - 7:17 am | चौकटराजा

हळव्या कविता की आणखीन कशा ? बुवाकडे लय प्रकारचा "ष्टॉक" आहे !

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jun 2014 - 7:59 am | अत्रुप्त आत्मा

@बुवाकडे लय प्रकारचा "ष्टॉक" आहे !>>> =)) बास कीssss! :p

प्रचेतस's picture

6 Jun 2014 - 8:28 am | प्रचेतस

aaaaa

धन्या's picture

5 Jun 2014 - 1:54 pm | धन्या

हायला बुवा... अता बेडसे पुन्हा एकदा?

बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही. :)

शेवटी, शेवटची कविता आवडली. सुंदर !!!!

प्रचेतस's picture

5 Jun 2014 - 2:37 pm | प्रचेतस

तू पण का आता 'अता'च?

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2014 - 6:10 pm | अत्रुप्त आत्मा

@ सोयिस्कररित्या विसरलेले दिसताहात. असो. चालायचेच.>>> *biggrin*

@बाकी त्या तिसर्‍या क्लिपमध्ये शेवटी शेवटी स्तूपानजीकच्या कुणा जोडीला लेणी दाखवणारा
दहिभाते पाहून डोळे पाणावले.>>> त्या दिवशी आमच्यातल्या एकानी त्याच्या पोपटगिरीला जोरात तडाखा दिला! =))

@बाकी ते चश्मावाले भटजी आहेत की गुंठामंत्री आहेत कळत नाही.>>> निरर्थक! :-/ वाण नाही..पण गुण वग्रे! :-/ त्यामुळे असोच्च! :-/

@तू पण का आता 'अता'च?>>> :-/ हे पहा वाण! :-/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jun 2014 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुवा बेडसे लेणी बघायला जाईन. कविता आवडली. आपले व्हिडियो आवडले. पहिल्या व्हिडियोत शेवटचे काही सेकंदात 'असं हे काव्य' म्हटल्यानंतर मोबाईलला काही तरी बोटांनी टोचायची अ‍ॅक्श्न केलीय ना, ते काय म्हणत होता तेवढे सांगा बॉ. :)

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jun 2014 - 2:40 pm | अत्रुप्त आत्मा

तो दुसय्राचा मोबॉइल.. नेमका त्याच वेळी लॉक झाला. वाचायची कविता त्यावर होती!

सूड's picture

6 Jun 2014 - 3:05 pm | सूड

ह्म्म !!

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2014 - 11:27 am | अत्रुप्त आत्मा

सर्वेषां धण्यवादम्॥॥॥॥ :)