पुलं "दैवत"
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत
पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की. शेवटी एवढेच म्हणेन की..