पॉझीटीव्ह
( सत्तर शब्दांची लघुतम कथा लिहिण्याचा प्रयोग. )
पॉझीटीव्ह
......
त्याने चादर डोक्यावर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप.
तेवढ्यात मेसेजची रिंग वाजली. बघणे भागच होते.
त्याने मोठ्या कष्टाने पांघरूण बाजूला केले.
स्क्रीनवर तिचा मेसेज चमकत होता, ‘पॉझीटीव्ह’.
‘Abort.’ याने इकडून मेसेज पाठवला.
रडण्याची स्मायली तिकडून.
‘Don’t cry. Me too positive.’
‘What?’
‘Just got the reports. HIV positive.’
त्याने सरळ फोन बंद केला. त्याला याक्षणी काहीच, कुणीच नको होते.
चादर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप.