( सत्तर शब्दांची लघुतम कथा लिहिण्याचा प्रयोग. )
पॉझीटीव्ह
......
त्याने चादर डोक्यावर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप.
तेवढ्यात मेसेजची रिंग वाजली. बघणे भागच होते.
त्याने मोठ्या कष्टाने पांघरूण बाजूला केले.
स्क्रीनवर तिचा मेसेज चमकत होता, ‘पॉझीटीव्ह’.
‘Abort.’ याने इकडून मेसेज पाठवला.
रडण्याची स्मायली तिकडून.
‘Don’t cry. Me too positive.’
‘What?’
‘Just got the reports. HIV positive.’
त्याने सरळ फोन बंद केला. त्याला याक्षणी काहीच, कुणीच नको होते.
चादर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप.
- शिवकन्या
प्रतिक्रिया
26 Jun 2018 - 12:06 pm | Patil 00
मस्त
26 Jun 2018 - 1:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त कथा !
कथा ‘Just got the reports. HIV positive.’ इथेच थांबली असती तर जास्त प्रभावी झाली असती असे वाटले.
27 Jun 2018 - 8:18 am | गवि
अगदी अगदी.
त्याही उपर जाऊन कोणतंच निवेदन न करता फक्त मेसेज टेक्स्ट ठेवलं असत तर अजून धारदार झालं असतं. किंचित विचार करून पूर्ण अर्थ लागलाच असता. आणि त्या प्रोसेसमध्ये बाकी भावना वाचकांच्या मनात आल्याचं असत्या.
"Hi. Positive.. :-) yay"
"Abort"
:-(
"I am positive too. Just got reports. Sleeping."
27 Jun 2018 - 4:29 pm | वकील साहेब
जव्हेरगंज यांच्या कथा अशाच गविंनी सांगितल्या प्रमाणे असतात. रिकाम्या जागा भरा टाईप. पण त्या जागा भरता भरता जेव्हा कथेचा अर्थ उलगडत जातो तेव्हा एकदम भन्नाट वाटते कथा.
29 Jun 2018 - 10:43 am | मनुष्य
मस्तच जमलंय!! लय आवडली कथा!