✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आईचा मुलगा

श
शिव कन्या यांनी
Fri, 06/08/2018 - 11:46  ·  लेख
लेख
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात. त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा. तिचं अपर्णासत्र चालू झालं, कि तो तिच्यासमोर उभा राही. ‘आई, का ओरडतेस तू? अपर्णा आणि मी इथे राहात नाहीत आता!’ हे तो लक्ष्याव्यांदा तरी तिला सांगत असे. ‘अजून एकदा चहा आणून देऊ का तुला?सांगतो अपर्णाला.’ त्यावर आजी त्याच्याकडे मिटीमिटी पहात. एकदमच उसळून म्हणत, ‘रे जयंता, तू माझाच मुलगा ना रे! माझाच ना! तिघांत थोरला म्हणून किती रे कौतुक तुझें! तुला विचारले का मी कि बाळा, तुला दुध देऊ का अजून एकदा? विचारले का? आज तू मला एका चहाच्या कपासाठी परत परत विचारतोस!’ जयंताला हे पण पाठ झाले होते. आता कुठे तिने त्याला बाळ असताना दुध पाजणे, आणि कुठे याने चहा आणून देऊ का म्हणून विचारणे! कुठून तरी काही तरी जोडून घ्यायच्या आणि बोलत सुटायच्या. आजीना कोण सांगणार? कधी जयंता म्हणे, ‘का सांगायचे तिला? मी मुलगा आहे, बोलेना का! कुणा रस्त्यावरच्या माणसाला तर नाही बोलत! ऐकून घ्यायचे. आई आहे. तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी होतो कि नाही, माहित नाही, पण मी नक्कीच भिकारी झालो असतो.’ संध्याकाळी बरोब्बर पावणेपाचला जयंता दाराचे छोटेसे कुलूप काढी, ते त्याने दुपारी घातलेले असे. आईच्या सुरक्षिततेसाठी. मग, दरवाज्याच्या फटीतून हात घालून, दाराची आतली कडी काढी आणि दरवाजा उघडे. चहाचा थर्मास बाजूला ठेवी. ‘आई, ऊठ. आज बुवामहाराज येणारेत मंदिरात! जायचंय ना प्रवचनाला?’ ‘नको रे! कुठले ते महाराज अन फिराज! सगळे आपलं तेच भागवत सांगतात.’ तिने संध्याकाळी बाहेर जायला नकार दिला कि जयंताला धस्स होत असे. ती घरात थांबणार म्हणजे आणखी बडबड करणार, संध्याकाळी वरती अपर्णाचा गायनाचा क्लास चालतो. हिला पेटीचा आवाज, गाण्याचे सूर चालत नाहीत. म्हणजे ते अपर्णाचे आहेत म्हणून चालत नाहीत. तेच जर चंदूचे असते तर.... तर... जयंताच्या काळजात धाकट्या भावाच्या आठवणींनी बारीकशी कळ उमटे. त्याचा उमदा फोटो पाहिला कि तो मनातल्या मनात म्हणे, ‘चंदू, अरे रहायचास कि रे! आईला दोन गाणी म्हणून दाखवली असतीस! तुझे गाणे घरात राहिले असते, आईचा जीव जीवात राहिला असता.’ त्याला आईची समजून काढून तिला दोनेक तास बाहेर घेऊन जायचे असायचे. ‘आई मी काय म्हणतो, मंदिर नको तर नको, पण परवादिवशी स्नेहुलीचा वाढदिवस आहे. जरा तिच्यासाठी काहीतरी खरेदी करावी म्हणतो... चल तरी माझ्या सोबत!’ नातीचे नाव काढताच आजीबाई एकदम सावरीचे पीस होते, हे जयंताला माहित. आईच्या विस्मृतीचा फायदा घेत त्याने, स्नेहलचे एका वर्षात किमान शंभर सव्वाशे वाढदिवस तरी असेच साजरे केले होते. आजी मग उठे. जयंत कपाटातून तिचे एखादे चांगले पातळ काढून ठेवी. सहज म्हणे, ‘आई, आज बाजारत गेलो कि तुझ्यासाठी एखादी चांगली नऊवार घेऊ!’ ‘मला मेलीला कशाला रे आता नवे पातळ!’ ‘असू दे गं, मेलीला तर मेलीला...’ जयंत असला स्टार्क विनोद करे पण मुलाचे आपल्याकडे इतके लक्ष आहेसे पाहून आजीचा जीव सुपाएवढा होई. ती म्हणे, ‘मेले एकदाची कि मग नवे पातळ येणारच! जुन्या कपड्यांत कोण जाळेल मला? एवढ्या मोठ्या इमारतीची मालकीण मी! कोण मला जुनेर नेसवून जाळेल? म्हणून म्हणते, नवे पातळ राहू दे, येईल उपयोगी...’ मुलापेक्षा हातभर पुढचं आजी बोलायच्या. जयंताला हे ही पाठ होतं. आई तयार होईपर्यंत तो बाकीच्या रूम्स मध्ये चक्कर टाकून येई. कुठे तिने सुटकेस उघडलेली असे, कशासाठी? तिचं तिलाही माहित नसायचं. बंद करायची विसरलेली असे. कुठे कपडे ओले करून ठेवलेले असत, ते वाशिंग मशीनमध्ये टाकून, मशीन लावून देत असे. कुठे चक्क स्टीलच्या डब्यातली चिल्लर उपडी करून तशीच ठेवलेली असे. एकएक, दोनदोन, पाचपाचची नाणी वेगवेगळी करायचा अर्धवट प्रयत्न केलेला दिसे. नंतर मिक्स नाण्यांच्या राशी दिसत. जयंता नाण्याचा आवाज न करता सावकाश ती परत भरून ठेवी. खिडक्या अर्धवट उघड्या असत, त्या तो नीट बंद करी. एवढे करून बाहेर येईपर्यंत, त्याची आई तयार झालेली असे. त्याच्या मनाप्रमाणे घडलेले असे. हातात नेहमीची फुलांची परडी असे. तिचा मऊ, सुरकुतलेला, दोनच सोन्याचे बिल्वर घातलेला हात तो हातात घेई, आणि पायऱ्या उतरू लागे. बाहेर येताच, पावले आपोआप मंदिराकडे वळत. आईला मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात, इतर बायकांमध्ये सोडले, कि जयंताचा जीव भांड्यात पडे. मनात म्हणे, ‘ती अशीच तर आपला हात धरून शाळेत सोडवायला यायची. एकदा का आपण आपल्या वर्गात बसलो, कि तिचाही जीव असाच भांड्यात पडत असणार!’ मंदिरासमोरच त्याची कन्सल्टन्सी होती. अधूनमधून काचेतून मंदिराकडे पाही. साधारण साडेसात वाजता प्रवचन संपे. पण त्याची नजर सतत प्रवेशद्वाराशी असे. आई अवेळी बाहेर आली तर? समोरच्या वाहत्या रस्त्यात चालू लागली तर? तो शांत डोळ्यांनी, अस्वस्थ अंत:करणाने मंदिराकडे पहात राही.... हे असे वर्षानुवर्षे चालले होते.... कोण म्हटलं, केवळ घारच आपल्या पिलांवर नजर ठेवते? - शिवकन्या
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
वाङ्मय
कथा
साहित्यिक
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
17587 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

मस्तच!!

पिलीयन रायडर
Fri, 06/08/2018 - 11:55 नवीन
मस्तच!! बेवाफा सनम पोरांनी कसे पांग फेडले नाहीत हे सांगणाऱ्या कथांचा कंटाळा आला होता. पोरं सुद्धा आई बापाला खूप जीव लावतात. सुंदर मांडलं आहे तुम्ही हे!
  • Log in or register to post comments

अतीवेळा सहमत !!!

वीणा३
Fri, 06/08/2018 - 23:16 नवीन
अतीवेळा सहमत !!! काये ना, लोकांना बरेचदा गॉसिप करायचं असतं, आणि कोणीतरी काही चांगलं करतंय हे गॉसिप होत नाही. आणि बऱ्याच लोकांना दुसर्याबद्दल त्याच्यामागे वाईट बोलायला आवडतं. लेख अतिशय हृदयस्पर्शी!!! स्वतःच्या मायेच्या माणसांसाठी, स्वतःहून, मनापासून, मायेने केलेल्या कामात असाच गोडवा असतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिरा ताई आणि वीणा ताई

शिव कन्या
Wed, 06/13/2018 - 22:32 नवीन
सनम बेवफा .... आवडलं. होय, सकारात्मक बर्याच गोष्टी असतात, बऱ्याचदा आपले दुर्लक्ष होते. वाचत असल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

_/\_ !!

रातराणी
Fri, 06/08/2018 - 11:57 नवीन
_/\_ !!
  • Log in or register to post comments

वाह! अशी मुले पाहिली आहेत.

एस
Fri, 06/08/2018 - 12:09 नवीन
वाह! अशी मुले पाहिली आहेत. त्यामुळे कथा फारच आवडली.
  • Log in or register to post comments

वाह! वाह! सुंदर कथा..

पुंबा
Fri, 06/08/2018 - 12:35 नवीन
वाह! वाह! सुंदर कथा..
  • Log in or register to post comments

लक्षात

नाखु
Fri, 06/08/2018 - 12:42 नवीन
राहील अशी "लक्ष"वेधी कथा!!! पुलेशु लक्षायनी नाखु
  • Log in or register to post comments

_/\_

टवाळ कार्टा
Fri, 06/08/2018 - 13:31 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

खूप आवडली कथा..

यशोधरा
Fri, 06/08/2018 - 13:51 नवीन
खूप आवडली कथा..
  • Log in or register to post comments

उत्कृष्ठ!

श्वेता२४
Fri, 06/08/2018 - 14:37 नवीन
मुलांचेही आईवडीलांवर प्रेम असतेच. त्यांनाही आईवडीलांना जपायचे असतेच. पण जीथे जोडीदार व आई वडील असा संघर्ष येतो त्यावेळी नात्याची दुसरीही हळवी बाजू दाखवणारी तुमची कथा उत्तमच आहे. ही दुसरी बाजू प्रकाशझोतात आणल्याबद्दस बरं वाटलं.
  • Log in or register to post comments

श्वेता

शिव कन्या
Wed, 06/13/2018 - 22:33 नवीन
होय, बऱ्याचदा एकांगी चित्रण होते. वाचत असल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

कथा आवडली, मन सावरीचे पीस

अनिंद्य
Fri, 06/08/2018 - 14:53 नवीन
कथा आवडली, मन सावरीचे पीस झाले.
  • Log in or register to post comments

खूप छान

नूतन
Fri, 06/08/2018 - 15:06 नवीन
आवडली. आईचा मुलगा आणि बायकोचा नवरा एकाच वेळी असू शकतात हे सांगणारी कथा
  • Log in or register to post comments

नूतन

शिव कन्या
Wed, 06/13/2018 - 22:34 नवीन
असा समतोल साधणारी पुरुष मंडळी असतात... मला कौतुक वाटते त्यांचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

छान. सुंदर

manguu@mail.com
Fri, 06/08/2018 - 15:49 नवीन
छान
  • Log in or register to post comments

सुंदर

मार्मिक गोडसे
Fri, 06/08/2018 - 16:30 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

आवडली

कपिलमुनी
Fri, 06/08/2018 - 19:05 नवीन
कथा आवडली . छान लिहिता
  • Log in or register to post comments

वा! सुरेख!

शाली
Fri, 06/08/2018 - 20:13 नवीन
वा! सुरेख!
  • Log in or register to post comments

आहा __/\__

पद्मावति
Fri, 06/08/2018 - 21:08 नवीन
आहा __/\__
  • Log in or register to post comments

छान लेखन ! कथा आणि लिहिण्याची

शेखरमोघे
Fri, 06/08/2018 - 21:11 नवीन
छान लेखन ! कथा आणि लिहिण्याची शैली आवडली !!
  • Log in or register to post comments

मस्त.. सुरेखच...

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 06/09/2018 - 09:29 नवीन
गोष्ट प्रचंड आवडली, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

विशुमित
Sat, 06/09/2018 - 09:57 नवीन
<<<‘ती अशीच तर आपला हात धरून शाळेत सोडवायला यायची. एकदा का आपण आपल्या वर्गात बसलो, कि तिचाही जीव असाच भांड्यात पडत असणार!’>>> ==>> अयो. काय जबरदस्त लिहलंय.
  • Log in or register to post comments

विशुमित

शिव कन्या
Wed, 06/13/2018 - 22:35 नवीन
हे चक्रच आहे . धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

अप्रतिम , सुरेख च

अपश्चिम
Sat, 06/09/2018 - 10:31 नवीन
मनापासून आवडली , वेगळी बाजू मांडल्या बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

एकदम छान कथा

अनन्त अवधुत
Sat, 06/09/2018 - 12:00 नवीन
आवडली !!
  • Log in or register to post comments

पटला एकदम वास्तव

Topi
Sat, 06/09/2018 - 13:30 नवीन
पटला एकदम वास्तव
  • Log in or register to post comments

आईवडीलानी लहानपणी जीव लावला

एमी
Mon, 06/11/2018 - 07:34 नवीन
आईवडीलानी लहानपणी जीव लावला होता, आत्तादेखील 'मुद्दाम' त्रास देत नाहीत असे असेल तर घेतात मुलं काळजी. नसेल तरी सामाजिक दबावामुळे बऱ्याचदा मिनिमम काळजी घेतातच. अगदीच दुर्मिळ घटनांत चांगले आईवडील आणि दुष्टकपटी मुलं दिसू शकतात...
  • Log in or register to post comments

अॅमी

शिव कन्या
Wed, 06/13/2018 - 22:37 नवीन
कुणाला आपले आईवडील नको असतात? सगळ्या प्रकारचे लोक समाजात असतात. चांगले ते दिसते, आणि लिहून होते. वाचत असल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

खूप सुरेख...

शित्रेउमेश
Mon, 06/11/2018 - 10:44 नवीन
खूप सुरेख...
  • Log in or register to post comments

खूप दिवसांनी मिपावर आले आणि

ज्योति अळवणी
Wed, 06/13/2018 - 02:03 नवीन
खूप दिवसांनी मिपावर आले आणि पहिलीच कथा हृदयस्पर्शी वाचली. खूप आवडली
  • Log in or register to post comments

काय बोलावं. भिडणारं लिखाण.

गवि
Wed, 06/13/2018 - 08:40 नवीन
काय बोलावं. भिडणारं लिखाण. अतिशय सुंदर.
  • Log in or register to post comments

खुप छान लेखन . +१००

सिरुसेरि
Wed, 06/13/2018 - 13:49 नवीन
खुप छान लेखन . +१००
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

साबु
Wed, 06/13/2018 - 13:53 नवीन
भिडणारं लिखाण. +१
  • Log in or register to post comments

छान, आवडला __/\__

माहितगार
Wed, 06/13/2018 - 17:11 नवीन
छान, आवडला __/\__
  • Log in or register to post comments

वाह !! कथा आवडली

किसन शिंदे
Wed, 06/13/2018 - 17:15 नवीन
वाह !! कथा आवडली
  • Log in or register to post comments

सर्व

शिव कन्या
Wed, 06/13/2018 - 22:38 नवीन
या कथेच्या वाचकांचे मन:पूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

सुरेख!

रुपी
गुरुवार, 06/14/2018 - 06:29 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा