Nandini's Diary
किती महिने झाले असावेत? सात, आठ? ख्रिसमसची सुट्टी संपून नुकतंच क्लिनिक पुन्हा सुरु झालं होतं. स्कॉटलंडमधल्या या लहानश्या शहरात ख्रिसमसच्या काळात सगळं ठप्पच असतं. जानेवारीत आळोखे पिळोखे देत शहर पुन्हा जागं होतं. त्याच दरम्यान कधीतरी ती पहिल्यांदी आली. रोज घरी जाण्याआधी पुढच्या दिवसाच्या पेशंट्सच्या फाईल्स वरून नजर फिरवते तशी तिचीही फाईल बघितली. वय पन्नाशीच्या पुढे, एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारी एलिझाबेथ - लिझ. तिच्या घराच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथे येणारे बरेच लोक त्या रस्त्यावर आजूबाजूला गाड्या पार्क करत. आसपास राहणार्या लोकांना हा तसा त्रासच होता.