श्रीगणेश लेखमाला २०१८ - समारोप

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
24 Sep 2018 - 7:39 pm

नमस्कार.

अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी एक हुरहुर असते, तशी काहीशी भावना श्रीगणेश लेखमालेचा समारोप करताना आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही मिपावर श्रीगणेश लेखमाला-२०१८ आयोजित केली होती. यंदा 'DIY - Do It Yourself - केल्याने होत आहे रे' अशी संकल्पना घेऊन लेख मागवले होते. लेखकांनी उत्स्फूर्तपणे आपण केलेल्या प्रयोगांचे, प्रकल्पांचे, स्वनिर्मितीचे लेख पाठवले.

आणि विषयांचा आवाका तरी केवढा!
मातीच्या भांड्यांना रंगवून त्यांचं सौंदर्य खुलवण्याची कल्पना, 'वैद्यकीय डॉक्टर' असून Y2K वर केलेली मात, सायकलिंगच्या माध्यमातून दीडशे किलो वजन शंभरवर आणण्याचा अनुभव, आरत्या व श्लोक यांचा इतिहास व अर्थ, पेशवेकालीन गणेशोत्सव, जुन्या सूटकेसमध्ये बनवलेली सौर चूल, जगभरात एकल प्रवासाचा अनुभव, शून्यातून सुरुवात करत २००-३००-६०० किमी सायकलिंग, ब्लू टूथची तांत्रिक करामत, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहाद्दरांच्या सांगायलाच हव्यात अशा गोष्टी.... कला, तंत्र, विज्ञान, मनोनिग्रह यांचं मनोज्ञ दर्शन घडलं.

आणि प्रत्येक लेखाला मिळालेला मिपाकरांचा भरघोस प्रतिसाद!! असे लेखक आणि चोखंदळ वाचक हीच तर आहेत मिपाची बलस्थानं!

अर्थात आणखी काही उत्तम लेख प्रकाशित करता यायला हवे होते अशी हुरहुर आहेच आणि त्याबरोबरच 'पुढच्या वर्षी लवकर या' ही भावनासुद्धा आहे.

पुन्हा एकदा सर्व लेखकांचे व वाचकांचे मनापासून आभार.

ता.क.
आणि हो, आता वेध लागलेत दिवाळीचे.. फराळाचे.. आणि मिपा दिवाळी विशेषांकाचे!

हे ठिकाणसंस्कृतीवाङ्मयभाषालेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

24 Sep 2018 - 7:47 pm | ज्योति अळवणी

श्रीगणेश लेखनमालेत माझा लेख घेतल्याबद्दल मनापासून आभार.

दिवाळी अंकाच्या बांधणीत नक्की भाग घेण्याचा प्रयत्न करेन. मिपाच्या सर्वच उपक्रमांना कायमच मनापासून शुभेच्छा!

सुरेख झाली श्री गणेश लेखमाला. अभिनंदन!
उत्तम वाचनानुभव दिल्याबद्दल धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

24 Sep 2018 - 10:16 pm | पिलीयन रायडर

छान झाली लेखमाला! आता दिवाळी अंकाची उत्सुकता आहे. शुभेच्छा!

आपण घरात केलेले खटाटोप,फसलेले किंवा यशस्वी झालेले जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मिसळपाव माध्यम फारच उपयोगी. इंग्रजीत DIY भाराभार साइट्स असतात पण मराठीत दोनचारच असतील. DIY मध्ये काय प्रयत्न केले किती खर्च केला त्यातून काय साध्य झाले हे वाचून पुढचा हौशी आणखी पर्याय शोधतो. पुन: तेच करण्यात वेळ वाया जात नाही.
सर्वच गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत अथवा छोटेमोठे दुरुस्तीचे काम करून देणारेही सापडत नाहीत. किंवा एखादी वस्तू फेकून नवी घ्या सांगतात तेव्हा आपल्याला करता आले तर त्यात आनंद मिळतो.

बऱ्याचदा फसलेले DIY थट्टेचा विषय होऊन प्रयत्न सोडून दिलेले जातात.
लेखमालिकेमुळे नवीन लोकांचा उत्साह वाढेल. पुढेमागे वेळ कसा घालवायचा ही विवंचना सुटेल.
या छंदाकडे अधिकाधिक लोक वळतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2018 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर, रोचक आणि उपयोगी माहितीने भरलेली ही लेखमाला वाचताना खूप मजा आली !

तिला प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या कोणी आपला अमुल्य वेळ आणि श्रम खर्च केलेला आहे, त्या सर्वांचे हार्दीक अभिनंदन आणि धन्यवाद !

वरुण मोहिते's picture

24 Sep 2018 - 11:46 pm | वरुण मोहिते

आणि लेखमाला घडवण्यासाठी सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचे आभार.