सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


शुभेच्छा

डॉ.अक्षयकुमार काळे : एक ओळख. (अ.भा.मराठी साहित्य संमेलन उमेदवार)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
1 Nov 2016 - 9:41 pm

राम राम मंडळी. डोंबिवली येथे नियोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु झाली आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषद शाखेत डॉ.अक्षयकुमार काळे यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. आम्ही त्यांचे पाठीराखे, आणि मतदार असल्यामुळे आम्हीही त्यांच्या सोबत होतोच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य समाज आणि संस्कृतीच्या चिंतनाचं एक व्यासपीठ आहे, असे आम्ही समजतो. मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीचा विचार त्या विचारपीठावरुन मांडल्या जातो हे अनेकांना माहिती आहेच.

शुभेच्छासंस्कृतीवाङ्मयसाहित्यिक

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
1 Nov 2016 - 1:00 pm

पेर्णा
"याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.
नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता?
‘हॅलो…’
आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.

प्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारसमाहितीप्रतिभाविरंगुळामांडणीइतिहासबालकथाविडंबनउखाणेप्रतिशब्दशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसमाजजीवनमानऔषधोपचारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणमौजमजा

स्मार्ट शहर - स्मार्ट कट्टा !!

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in जनातलं, मनातलं
31 Oct 2016 - 6:06 pm

ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो

श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला

मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच

शुभेच्छावावर

अशी सजेल दिवाळी

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
12 Oct 2016 - 11:35 pm

नमस्कार मंडळी,

श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ. सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि आनंदाची अशी दिवाळीच मला खुणावू लागली.मग काय विचार पक्का झाला आणि कामाला सुरवात कॆली.
दिवाळी म्हटलं की सर्वप्रथम आठवतॊ तॊ आकाश कंदील.तॆंव्हा सादर आहॆ,

क्विलींगचा आकाश कंदील.......

सद्भावनाशुभेच्छाकला

खुलता खुळी खुलेना...

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
30 Sep 2016 - 5:33 pm

शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :)
'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग,
तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते.

या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार
लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली.
आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :)

विचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादमाध्यमवेधअनुभवचौकशीप्रश्नोत्तरेमदतप्रतिभाविरंगुळासंस्कृतीबालकथाराहणीऔषधोपचारराहती जागागुंतवणूकफलज्योतिषराजकारणमौजमजा

मोहिम-ए-संपादक

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
22 Sep 2016 - 11:51 am

तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला
झेपेनासे झाले.

सद्भावनाशुभेच्छामाहितीप्रश्नोत्तरेविरंगुळाविनोदमौजमजा

आंतरजालावरचा भेंडीपणा !!

इरसाल's picture
इरसाल in जनातलं, मनातलं
12 Sep 2016 - 12:19 pm

सर्वसाधारण कोणा एका मित्राने, ओळखीच्याने तो आधीच कार्यरत असलेल्या एखाद्या मराठी संस्थळाची माहिती दिली आणी आपणही त्यात सामील व्हावे अशी गळ घातली की "त्या" लाही वाटते की बघुया तरी की ही आभासी दुनिया आहे तरी कशी ?
हो नाही करता करता "तो" सगळे सोपस्कार पार पाडुन या लोंढ्यात एकदाचा सामील होतो. रंगीबेरंगी असणारी ही दुनिया त्याच्या मनाला, मनात येणार्‍या लेख्/कविता/विचारांना कधी एकदा जालावर ओसंडुन वाहु ह्याच्या कळा द्यायला सुरुवात करते.

शुभेच्छासंस्कृती

गुलजार!

रुपी's picture
रुपी in जनातलं, मनातलं
19 Aug 2016 - 11:10 pm

महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे.

प्रकटनशुभेच्छाआस्वादअनुभवकलासाहित्यिक

(घंटा हलवून बघ)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 1:19 pm

शब्दावरती रागावू नकोस
विचार करून बघ
झोपलेल्या मेंदूची
घंटा हलवून बघ

शेवाळलेल्या मनावरती
पूर्वग्रहाचे थर
इतिहास परंपरा जाऊ देत
वर्तमान घट्ट धर

अनुदान माफी काही नकोत
पीक ऑरगॅनिक लाव
तेव्हा तुला मिळेल
शहरी मॉलमधला भाव

दिसतो तसा नाही शहरी
स्वार्थी व मग्रूर
बळीराजाच्या दुःखासाठी
त्याचाही भरतो ऊर

देऊ नकोस टॅक्स मित्रा
तुझ्या शेतकी उत्पन्नापाई
भारताच्या भल्यासाठी
भलेही इंडिया टॅक्स वाही

शुभेच्छामुक्तक

रिओ ऑलिम्पिक २०१६

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
4 Aug 2016 - 9:29 pm

रिओ ऑलिम्पिक २०१६

गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.

प्रकटनशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाबातमीमाहितीधोरणसमाजजीवनमानक्रीडा