'संगीतज्ञानी इळैयाराजा'

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
2 Jun 2017 - 12:08 am

ते ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत.

BBC ने घेतलेल्या सर्वेक्षणात ते भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले.त्यांच्या 'दलपति' या सिनेमातलं 'रक्कम्मा कय्य थट्टू' हे जगातलं ૪ थ्या क्रमांकाचं सार्वकालीन पसंती दिलेलं गीत!

६००० पेक्षा अधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.१००० पेक्षा अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं.एस.जानकी,के.जे.येसुदास,चित्रा,एस पी बालसुब्रह्मण्यम् हे त्यांचे आवडते गायक.यांच्यासोबत सर्वाधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत!

तमिळ लोकसंगीत यांनी जागतिक पातळीवर नेलं.पारंपारीक तमिळ वाद्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाद्येही फार सुंदर पध्दतीने त्यांनी वापरली.त्यांनी संगीतबध्द केलेला 'करगाट्टकारन' हा सिनेमा तमिळनाडुच्या सर्व थिएटर्समधे वर्षभर सुरु होता.

ए.आर रेहमान,अजय-अतुल सारखे बरेचसे प्रतिभावंत संगीतकार त्यांना गुरुस्थानी मानतात.

इळैयाराजा यांचा जन्म तमिळनाडुच्या थेनी जिल्ह्यातल्या पन्नाईपुरम् या गावात २ जून १९૪३ रोजी एका ख्रिश्चन धर्मीय कुटूंबात झाला.डॅनियल राजय्या असं मूळ नाव असणार्‍या हा मुलगा 'धनराज मास्टर' या संगीतकाराकडे शिक्षणासाठी जाऊ लागला.'ए.एम.राजा' हे त्यावेळी अजून एक संगीतकार होते.त्यामुळे वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून धनराज यांनी राजय्या यांचं नाव ज्युनिअर राजय्या केलं.त्याचंच पुढे इळैया म्हणजे 'लहान' असं नामकरण त्यांच्या पहिल्या अन्नाकिली या सिनेमाचे दिग्दर्शक पांचु अरुणाचलम् यांनी केलं आणि 'इळैयाराजा' हे नाव अस्तित्वात आलं.

१९६० च्या दशकात त्यांनी हिंदु धर्म स्विकारला.अनेक मंदिरांना ते देणग्याही देत असतात.
नेहमी साधासा कुर्ता आणि लुंगी या वेषातच ते आढळतील.त्यांचा मुलगा युवन् शंकर राजा याने २०१५ साली मुस्लिम धर्म स्विकारला.त्यालाही त्यांनी मान्यता दिली.
२०११ पासून पत्नी जीवा हीच्या निधनानंतर ते आपली प्रतिभावान मुले 'कार्तिक राजा','युवन् शंकर राजा' आणि मुलगी 'भवतारीणी' यांच्यासोबत राहत आहेत.
२०१५ साली त्यांनी लावून धरलेला कॉपीराईटचा मुद्दाही चांगलाच गाजला होता.

१९७६ च्या 'अन्नाकिली' या सिनेमापासून त्यांनी संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.ही संगीतसेवा अजूनही सुरुच आहे.संगीताच्या क्षेत्रात निरनिराळे प्रयोग करणार्‍या,अनेक उच्चांक,वैविध्य देणारा,अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी असणारा हा संगीतकार आज पंचाहत्तरीत प्रवेश करतो आहे.
या महान,प्रतिभावंत संगीतकाराला दीर्घायुष्य लाभो आणि अशीच संगीतसेवा त्यांच्याकडून घडो हीच ईशचरणी प्रार्थना!

इळैयाराजा यांची मला आवडणारी काही गाणी.

https://youtu.be/TqhQ7Lty1Gs
रक्कम्मा कय्य थट्टु - दलपति

https://m.youtube.com/watch?v=rDX2F18-chM
नगुवा नयना - पल्लवी अनुपल्लवी - आयडीया नेटवर्कच्या 98 न ना ना या सिग्नेचर ट्यूनचा उगम इथे दिसेल. हा आपल्या अनिल कपूरचा पहिला सिनेमा.

https://youtu.be/iGOeDRdAXS4
सेंदूर पुवे - १६ वयथिनिले - हा श्रीदेवीचा पहिला सिनेमा.

https://youtu.be/V5qMS-K8eYY
सुरमयी अखियाँसे - सदमा

https://youtu.be/0BXqAnZWqdQ
ऐ जिंदगी गले लगा ले - सदमा

https://m.youtube.com/watch?v=MbnUrkEXxGo
तालाटदे वानम् - कादल मीनागल

https://youtu.be/gjw60VDASa8
मंद्रम् वंद - मौन रागम् - फक्त गाणंच नव्हे तर पूर्ण सिनेमाच पहा. - चिनी कम सिनेमाच्या शीर्षक गीताची चाल!

https://youtu.be/TPISsw9Vl44
पु मालये - पागल निलावु

https://youtu.be/a4iI111uP7A
उनक्कुम एनक्कुम - श्री राघवेंद्रा - या गाण्याचं सँपलिंग करुन ब्लॅक आईड पिज या रॅप ग्रुपनं आपल्या एल्फंक या थीमसाठी वापरलंय.

https://youtu.be/_m6oueaWRi
Black eyed peas elphunk theme

https://youtu.be/n0wtvrmYg1k
मानकुयिले - करगाट्टकारन् - तमिळ लोकसंगीताचा खुप छान वापर केलाय.या बरोबरच सिनेमातली इतर गाणीही पहा.

https://youtu.be/7SoPNpeJLog
पोदुवाग एन् मनुष थंगम् - मुराट्टु कालाई - रजनीकांतच्या या गाण्यावर आजही थिएटरमधे कल्ला होतो.

https://youtu.be/gQfKkhsYfZA
पुंगथवे - निझाल्गळ्

https://youtu.be/nXC-vfB3OkU
जर्मनीयिन सिंथेन मलरे - उल्लासपारवैगळ्

https://youtu.be/AsN_9uXAoNE
इलय निला - पयनान्गळ मुडिवथिल्लाई - श्रीदेवीचा 'कलाकार' या नावाचा एक सिनेमा आहे. त्याचा हा मूळचा सिनेमा.हिंदी रिमेकचं संगीत संयोजन कल्याणजी-अानंदजी यांनी केलं होतं.

अप्पु राजा - या सिनेमातली सगळीच गाणी आवडती आहेत. आया है राजा गाण्यातली सुरवातीची शीळेचा वापर, श्रीविद्याला(इन्स्पेक्टर कमल हसनची पत्नी) गुंडांपासून वाचवून नावेतून पाठवून दिल्यानंतरचं पार्श्वसंगीत तर क्लास झालंय!

https://youtu.be/7SznyPpRfJM
पल्लवी अनुपल्लवीचं पार्श्वसंगीत.

https://youtu.be/3roElRt48sI
पल्लवी अनुपल्लवीचं पार्श्वसंगीत रॉक व्हर्जन.

https://youtu.be/Hi8vHZxbx8U
दलपतिचं पार्श्वसंगीत.

https://youtu.be/F3r_XnLr0q0
सागर संगमम्(हिंदीतला सरगम)चं पार्श्वसंगीत.

मांडणीसंस्कृतीकलाशुभेच्छाआस्वादबातमीमाहितीसंदर्भप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

2 Jun 2017 - 12:27 am | अभ्या..

अहाहाहा
इलैय्या राजा. मस्तच ओळख.
आयडीयाचे म्यूज़िक ऐकल्यावर घरात नगुवे नयना हेच आठवले जाते.
अपूर्व सहोदरगलुची गानी पण बेस्टच.
त्यांचा मुलाने कार्तिक राजाने ग्रहण चित्रपटाला सुरेख गाणी दिलेली.
त्यातले नाचो ऐसे प्रचंड आवडते.

रुपी's picture

2 Jun 2017 - 1:41 am | रुपी

छान ओळख!

पुंबा's picture

2 Jun 2017 - 10:08 am | पुंबा

मस्त.. आता एकेक करून ऐकतो सारी गाणी.

सिरुसेरि's picture

2 Jun 2017 - 5:17 pm | सिरुसेरि

छान माहिती . इलायराजा यांचे "महागणपती मनसा स्मरामी" हे "सिंधु भैरवी" मधले गाणे खुप सुरेख आहे . "थेवर मगन " , "अंजली" या सिनेमातील गाण्यांमधे, त्यांनी लहान मुलांच्या आवाजाचा मोठ्या खुबीने वापर केला होता . अलिकडच्या "नाका मुका" ची मुळ चाल हि इलायराजा यांच्या "आया है राजा " या अप्पु राजा मधल्या गाण्याशी मिळती जुळती आहे .

उपयोजक's picture

2 Jun 2017 - 8:47 pm | उपयोजक

इळैयाराजा आणि दिग्दर्शक मणिरत्नम् या जोडीच्या बर्‍याचशा सिनेमांतली गाणी चांगलीच गाजलेली आहेत.योगायोग म्हणजे आजच मणिरत्नम् यांचाही वाढदिवस! दोन प्रतिभावंत एकाच दिवशी जन्मले!

इळैयाराजांचं हे आणखी एक छानसं गाणं
https://youtu.be/dwaqM8aFeZ0
अोरु सनम - मेल्ल तुरुंदथ कदवु

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2017 - 9:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ओळख ! भारत भाषावैविध्याने संमृद्ध आहे, पण त्याचा एक परिणाम म्हणजे मोठ्या वाङमय-कला वैभवाला आपण अनभिज्ञ राहतो !

रमेश आठवले's picture

3 Jun 2017 - 6:16 am | रमेश आठवले

इलिया राजा मूळ ख्रिश्चन आणि नन्तर हिंदू झाले तर रहमान हे मूळचे हिंदू आणि नन्तर मुस्लिम धर्मी झाले. दोघेही महान तामिळ संगीत दिगदर्शक. इलिया राजा यांच्या मुलाने नुकताच मुस्लिम धर्म स्वीकारला. हा केवळ योगायोग की आणखी काही ?

उपयोजक's picture

3 Jun 2017 - 12:35 pm | उपयोजक

ए.आर.रेहमान यांनी घरच्या विपन्नावस्थेतून आलेल्या मानसिक आंदोलनांमुळे मुस्लिम धर्म स्विकारला.
युवन् शंकर राजा यांनी त्यांची आई जीवा यांच्या निधनानंतर आलेल्या मानसिक अस्वास्थ्यातून बाहेर पडण्यासाठी त्या दुख:तुन बाहेर पडण्यासाठी मुस्लिम धर्म स्विकारला.
इळैयाराजा यांनी हिंदु धर्म स्विकारला तो का स्विकारला? याबद्दल आंतरजालावर तरी फार माहिती उपलब्ध नाही.त्यामुळे तो वरील प्रमाणे मानसिक अस्थिरतेतून किंवा भावनिक होऊन स्विकारला नसावा.

मुळातच तमिळ लोक हे फार भावनिक आहेत.आवडती व्यक्ती,नेता/अभिनेता कशामुळेतरी तुरुंगात गेला,जग सोडून गेला तर स्वत:ला काही इजा करुन घेणे,जीवन संपवणे यासारखे प्रकार तमिळनाडूमधे नवीन नाहीत.

इथे पेरीयार ना मानणारे पण खुप आहेत आणि ते कोणताच धर्म रुढी पाळत नाहीत देव हि संकल्पनाच
मानत नाहित

इथे नावावरून तुम्ही धर्म ओळखू शकत नाही कारण नाव बालाजी किंवा व्यंकटेश असलं तरी तो ख्रिश्चन
असु शकतो. इथे धर्मांतरण हा एक मोठा विषय आहे. पण घरात आई वडील हिंदु आणि मुलगा किंवा मुलगी ख्रिश्चन आहेत आणि अशी ही खुप कुटुंब आहेत. इथे अशीही खुप जोडपी आहेत जी भिन्न धर्माची आहेत तसं वागतात आपल्या धर्माच आचरण करतातही, पण सुखाने एकत्र नांदतात

उद्या याच युवन् शंकर राजाच्या मुलानं परत हिंदु किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारला, किंवा रेहमानच्या मुलानं परत हिंदु धर्म स्विकारला तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

राजा निस्सीम रमणभक्त आहेत. श्री रमणाश्रमात समर्पित वृत्तीने अनौपचारिक पद्धतीने ते वेळोवेळी आपली सांगितीक सेवा सादर करतात.

मूकवाचक's picture

3 Jun 2017 - 5:06 pm | मूकवाचक

'नथिंग बट विंड' - राजा यांची एक अप्रतिम रचना