गुलाम अली साहब...
सालगीराह मुबारक हो ,
तुमच्या बद्दल सर्व काही माहित असूनही काय लिहावं हेच कळत नाही, कारण तुम्हाला आजपर्यंत जे काही ओळखले ते फक्त संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये.. स्वतःला व्यक्त करायचं म्हटले तरी श्यक्य नसणारे कित्येक जण तुम्हाला गुणगुणत असतात..
अबोल असताना कधी कशी हुकून तुमच्या गझलची लिस्ट माझ्या मोबाईलमध्ये आली आणि आणि बाकी गाणी कधी कमी झाली, नवीन गायक आले, गेले, पण तुमची जागा कुणीच घेऊ शकले नाहीत.
तुम्हाला ऐकणारे थोडे थोडकेच आहेत पण जे कुणी ऐकतात ते कधीच न विसरण्यासाठी. आजच्या पिढीतले श्रोते जुनीच गाणी नवीन पद्धतीने ऐकतात, किंवा भाग भोसडीके अशी गाणी ऐकणाऱ्यांचा विषयच सोडून द्या. उनके आस्था का सूर दुसरा लग गया है,
गुलाम अली साहेबांच्या गझल जालावर भरपूर ठिकाणी मिळतात पण माझ्या निरीक्षणानुसार इथे व्यवस्थित आहेत,
फिर एक बार सालगीराह मुबारक हो गुलाम अली साहब...
प्रतिक्रिया
5 Dec 2017 - 2:06 pm | चांदणे संदीप
असोत... पण आम्ही तर..
इथूनच घेतली... लोल! ;)
Sandy
6 Dec 2017 - 5:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुलाम अलीची गाणी सहज डाऊनलोड करता आली आभार..!
-दिलीप बिरुटे