विंचू चावला
मतदान झाल ,निकाल लागला ,आलं सरकार
आलं सरकार , तयाला माझा नमस्कार
अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
आर आर आबा , बा ..... विंचू चावला
अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?
सत्ता , स्वबळ विंचू चावला
सत्तेचा माज अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला
सत्तेची इंगळी अति दारुण
((हा, हा, म्हणजे अति 'दारू' नं)
दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही.
दारूण म्हणजे भयंकर.