देर न हो जाये
खालील घटना पुर्णपणे काल्पनिक असुन तो कुणाशी खरच साधर्म राखत असेल तर फक्त मनातले मनात हसुन घ्यावे, खालील लेखन निव्वळ मनोरंजनासाठी लिहिला गेला आहे. त्यात लेखिकेला कोणताही मानसिक आजार झालेला नाही यांची कृपया नोंद घ्यावी.
स्थळ : इंजिनीअरिंग कॉलेज होस्टेल.
वेळ : सकाळची .
संख्यने जास्त असलेल्या आणि सुविधा कमी असलेल्या होस्टेल मधला काल्पनिक प्रसंग.
नीरु : ए वश्या बाहेर ये, इथे आतल्या चिकनची पुरण व्हायची वेळ आली आहे.
अभी : अरे तो कसला येतोय लवकर, आता महाआवाहन करा त्याला.
सम्या : साला, तोंडावर ताबा नाही त्याच्या, याला पहिला जाऊच कशाला दिला?