विडंबन

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
1 Apr 2014 - 2:40 pm

राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे.......

मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे.

बालकथाप्रेमकाव्यबालगीतविडंबनवाक्प्रचारसुभाषितेऔषधोपचारगुंतवणूककृष्णमुर्तीस्थिरचित्रप्रतिसादसद्भावनाअनुभवमतचौकशीवाद

< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
26 Mar 2014 - 2:42 pm

सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष
लक्षात येण्याजोगे आहेत...

गणपाहूनही गणपाभक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे

असो तर प्रश्न असा आहे

खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...
प्रश्न अनेक आहेत.

बालगीतविडंबनचौकशीप्रश्नोत्तरेवादप्रतिभाविरंगुळा

डर्बी लाजिरवाणी (मॅन्चेस्टर युनायटेड च्या पराभवाचं गीत)

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
26 Mar 2014 - 2:19 pm

काल गजर लावून सव्वा वाजता उठून मॅन्चेस्टर डर्बी बघितली... आणि हाय रे दुर्दैवा... ३-० ची हार बघावी लागली. झोपही गेली आणि हारही झाली. निराशेतून सुचलेलं हे कवन, आपणासमोर ठेवतोय, फुटबॉल रसिकांना, त्यातून युनायटेड फॅन्स ना या भावना नक्कीच जास्त समजतील.

(धुनः भातुकलीच्या खेळामधली)

मॅन्चेस्टरच्या युनायटेड ची, हालत केविलवाणी
अर्ध्या मिनिटी घाव लागला, डर्बी लाजिरवाणी ||धृ||

पर्सी बसला, होऊनि जखमी, स्तंभ एक ढासळला
जुना मावळा, रूनी सुद्धा, मुळीच नाही फळला
होता होता गोल होईना, पळे तोंडचे पाणी ||१||

विराणीसांत्वनाकविताविडंबनमौजमजा

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

अजय जोशी's picture
अजय जोशी in जनातलं, मनातलं
23 Mar 2014 - 6:32 pm

कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे)

वाङ्मयकविताचारोळ्याप्रेमकाव्यविडंबनगझलसाहित्यिकसमाजबातमीविरंगुळा

<काही शंका......>

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
13 Mar 2014 - 1:49 pm

गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत.

१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का?

२. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत)

३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?

४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती?

५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले?

६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली?

बालगीतविडंबनशुद्धलेखनराहती जागाकृष्णमुर्तीविरंगुळा

टाईमपास

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
10 Mar 2014 - 6:25 pm

"ए गित्या, अजुन वर वढ ना फ़्लेक्स तिच्या आयला ..." कांच्या माझ्यावर खालून वराडला. आयला या कांच्याच्या! याच्या वाढ्दिवसाचा फ़्लेक्स यानी बनवुन आणलाय आन आम्हाला लावलेय धक्क्याला. याचा वाढ्दिवस आहे का तेरावा याचं पब्लिक्ला काय घेणं हाय का ? पण याला चमकायची हौस दांड्गी . चौकात मोठा फ़्लेक्स लावलाय, " आपले लोकप्रिय युवा नेते कांच्या आरकुले यांना वाढ्दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा". शुभेच्छूक म्हणुन स्थानिक नगरसेवक पोपटरावचा फ़ोटो साइडला, मधे याचा पिवळे दात दाखवणारा आणि गांजा मारल्यागत दिसणारा फ़ोटो आणि खाली आम्हा पोराटोरांची नावे !

कथाविडंबनविरंगुळा

खिचडी बिघडली - विडंबन

नेत्रा वैद्य's picture
नेत्रा वैद्य in जे न देखे रवी...
3 Mar 2014 - 7:59 pm

भोंडल्याचं एक गाणं

हरीच्या नैवेज्ञाला केली जिलबी बिघडली
त्यातलं घेतलं एवढंसं पीठ
त्याचं केलं थालीपीठ
नेऊन वाढलं पंगतीत, जिलबी बिघडली

त्यातला घेतला थोडासा पाक
त्याचा केला साखरभात
नेऊन वाढला पंगतीत, जिलबी बिघडली

ह्या गाण्याचं विडंबन :

आषाढी एकादशीला केली
खिचडी बिघडली
त्यातला घेतला एवढासा गोळा
त्याचे केले वडे सोळा
तळून काढले तुपात, खिचडी बिघडली

त्यातलं घेतलं एवढंसं पीठ
त्याचं केलं थालीपीठ
खरपूस भाजले तव्यावर , खिचडी बिघडली

विडंबन

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (पुणे)

अजय जोशी's picture
अजय जोशी in जनातलं, मनातलं
3 Mar 2014 - 6:37 pm

कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com

नमस्कार,

कविताप्रेमकाव्यविडंबनगझलसद्भावनाबातमी

(कश्या कश्याला मुकलो ते...)

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
21 Feb 2014 - 11:25 pm

आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो..
समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन.
हाती पाण्याने भरलेला डबा.
आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे
कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते..
माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले,
कश्या कश्याला मुकलो ते...

हास्यविडंबन

मदिरा स्तोत्र

नेत्रा वैद्य's picture
नेत्रा वैद्य in जे न देखे रवी...
12 Feb 2014 - 7:23 pm

मद्य मदिरा सुरा दारु, प्रसिध्द नामांनी असे |
तीन प्रहरी प्राशिता ती, गाढ निद्रा येतसे||

रिचविता ते पेग पेग, जडत्व कायेचे नुरे |
चालतानां भूमीवरुनी, स्थिर पाऊल ना ठरे ||

होऊनी आरक्त नेत्र, जीभ जड ती होतसे |
धरेवरती स्वर्ग उतरे, कि स्वतः स्वर्गी वसे ||

सुरवरांना सुरा प्रिय, अप्सरांचा सवे जथा |
दुग्ध शर्करा योग ऐसा, मदिराक्षी सवे सुरा ||

विडंबन