"ए गित्या, अजुन वर वढ ना फ़्लेक्स तिच्या आयला ..." कांच्या माझ्यावर खालून वराडला. आयला या कांच्याच्या! याच्या वाढ्दिवसाचा फ़्लेक्स यानी बनवुन आणलाय आन आम्हाला लावलेय धक्क्याला. याचा वाढ्दिवस आहे का तेरावा याचं पब्लिक्ला काय घेणं हाय का ? पण याला चमकायची हौस दांड्गी . चौकात मोठा फ़्लेक्स लावलाय, " आपले लोकप्रिय युवा नेते कांच्या आरकुले यांना वाढ्दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा". शुभेच्छूक म्हणुन स्थानिक नगरसेवक पोपटरावचा फ़ोटो साइडला, मधे याचा पिवळे दात दाखवणारा आणि गांजा मारल्यागत दिसणारा फ़ोटो आणि खाली आम्हा पोराटोरांची नावे ! वर मला कांच्या गुळ लावतोय की आपल्या बाकीच्या पब्लिकची नावं बारिक अक्षरात लिव्हलीत, पण तुझं नाव मोठ्य़ा ठळक अक्षरात लिव्हलय बघ. तेच्यावर आमच्या ग्यांग मधला पांड्या मला म्हनतो की कांच्याला तुझ्याबद्दल सॉफ़्ट कॉर्नर आहे म्ह्णुन! ते ऐकून सगळे फ़िदीफ़िदी हसले. मला सॉफ़्ट आणि कॉर्नर असे वेगवेगळे माहिती आहेत पण सॉफ़्टकॉर्नर ही काय भानगड आहे ते कळले नाही. पांडयाला एकदा खोपच्यात घेतले पायजे. सालं हे इंग्रजीचं आन आमचं पह्यलापासुन वाकडं! शाळेत इंग्रजीच्या तासाला मी आणि कांच्या बाईंना इतकं सतवायचो का बस. कांच्या तसा माझ्यापुढं तिन वर्ष होता. पण तो इस्टॉप घेत घेत नववीला माझ्याबरोबर आला. एकदा इंग्रजीच्या बाई वर्गात येत असताना कांच्या इलु इलु असा चिरक्या आवाजात ओरडला आन मी मोठ्यानी हसलो. झालं ! बाईंनी कांच्याच्या आन माझ्या बापाला शाळेतच बोलवुन घेतलं आन दोघांना पयल्यापासुन आम्ही दोघं कसं सतवतोय ते तिखटमीठ लावुन सांगीतलं. कांच्याच्या बापाची आन आमच्या बापूची अशी काय सटकली का काय इचारु नका. दोघांची आम्हाला बडवायची कॉंम्पिटीशनच लागली. लय बडवला होता शाळेतच! तशी बापूचा मार खायची सवय होती. पण साला शाळेत पोरींच्या समोर बापूनी पिसला. इज्जतीचा पार फालुदा झाला. तवापासून इंग्रजीचा धसका घेतला तो कायमचाच. कांचानी नववीतच शाळा सोडली. मी कसाबसा दहावीत गेलो. पण तिथं इंग्रजीतच गचकलो.
फ्लेक्स लागल्यानंतर कांच्या म्हटला आता पोपटरावला बोलवून सत्कार समारंभ करु. कांच्याचा आजकाल लय वट वाढलाय हे बाकी खरं. आमच्या वस्तीच्या पुढ्च्या मोठ्या रस्त्यांवर जेवढ्या हातगाडया लागतात, त्याची वसूली पोपटरावनी कांच्याला दिलिय्. सगळे भेळ, पाणिपुरीवाले भैय्ये आणि इडली डोसावाले आहेत. कांच्याला सगळे टरकून आहेत. आपल्याला कांच्याचे हे धंदे पटत नाहीत. पण साला कधी कधी चांगल्या हॉटेलमधे मजबूत खिलवतो. आमच्या वस्तीच्या आजूबाजूला आयटी कंपन्या आणि ब-याच नविन सोसायट्या झाल्यात. एखाद्या सोसायटीत कुणी नवीन माणूस सामानाचा ट्रक घेउन आला रे आला की आमची ग्यांग तिथे हजर! कांच्या त्या सामानाच्या मालकाला दमात घेऊन सांगतो की साहेब इंथ आमची मोनापाली हाये. हिथलं सामान आम्हीच उतरवणार. एवढी ग्यांग पाहील्यावर तो नवीन माणूस तंतरतोच . सामान उतरवायला त्यानी माणसं आणलेली असतात, पण कांच्याचा थोबडा आणि आम्ही सगळी हुकलेली पाहून सामानाचा मालक झक मारत तडजोड करतो. कांच्या आधी हजाराची बोली लावतो आन उपकार केल्यागत सहाशे सातशेवर तडजोड करतो. नाही ऐकले तर म्हनतो द्या तीन हजार, आम्ही सामान खाली करतो. नवा आलेला माणूस सहसा पंगा घेत नाही. झक मारत पाचशे सहाशे कांच्याच्या हातावर टेकवतो.
बापूनी मला बर्याचदा सांगितलं की असले धंदे चांगले नाहीत. लोकांचा तळतळाट लागतो. दुसरा काहीतरी कामधंदा कर. नाहीतर आपल्या रद्दीच्या दुकानात बस. आपल्याला रद्दीच्या दुकानात बसायचं जीवावर येतं. बाकी बापूनी रद्दीचा धंदा इमानदारीत चालवलाय. काटयात खोट नाय कधी. आऊचा बाप साला गिर्हाइकाला लय काटयात मारतो. आमच्या ग्यांगमधला आऊ म्हणजे शिर्या. त्याचा बाप शक्तीकपूरसारखा दिसतो म्हणून आम्ही शिर्याला "ऑंऊं, लल्लीत्ता !" अशी हाक मारायचो. नंतर फक्त आऊच म्ह्णायला लागलो. पण आऊ आणि त्याचा बाप, दोघेही वागायला पण शक्तीकपूरच! कायम वाकडे धंदे!
एकदा मी कांच्याला म्हटले की बापू लय मागं लागलाय कायतरी कामधंदा कर म्हणून. तर कांच्या म्हणला आमची टमटम चालावतो का ? दिवसाला पाचशे रुपय आम्हाला दे, वरचे तुझे. म्हटलं बघू हे करून. पण एका महीन्यात ते बंद पडलं. कांच्याच्या बापानी कुणाकडनं ती टमटम सेकंडह्यांड मधे विकत घेतली होती कुणास ठाऊक. एकदम डबडा. मी घेतल्याच्या तिसर्याच दिवशी एक टायर बदलायला लागला. पोरगं कायतरी मार्गाला लागलय म्हणून आमच्या बापूनी हजार रुपये दिले. पाच सहा दिवसांनी पुन्हा टमटम बिघडली. पुन्हा पाचशे रुपये खर्च! पंधरा दिवसांनी अजुन एक टायर गेला. बापूला सांगीतलं तर बापूची खोपडी अशी काय सटकली की तो डायरेक्ट चूलीतून जळकं लाकुडच घेऊन आला टमटम पेटवायला. कसंबसं मायनी बापूला आवरलं म्हणून कांच्याची टमटम त्या दिवशी वाचली.
कांच्याला लगेच काय झालं ते सांगीतलं आणि म्हटलं की तुझी टमटम घिऊन जा बाबा. कांच्या टमटम न्यायला घरी आला आणि बराच वेळ घुटमळत राह्यला. मी विचारलं काय तर माझ्याकडं दुर्लक्ष करत घरात डोकावत होता. मला डाउट आला. मी घरात गेलो तर इमली खिडकीतून कांच्याला खाणाखूणा करित होती. माझ्या डोक्यात आत्ता लाईट पडला. तरीच त्या दिवशी फ्लेक्स लावताना पांडया म्हटला कांच्याला तुझ्याबद्दल सॉफ्ट्कॉर्नर आहे आणि सग्ळे फिदिफिदी हसले. आत्ता मला सॉफ्ट्कॉर्नरचा अर्थ कळला. च्यायला या इमलीच्या! समोरच्या पॉश सोसायटीत एका आयटीवाल्या बाईचं पोरगं सांभाळायला जायला लागल्यापासून लय शेफारलीय. ती बाई तीला महिन्याचे हजार रुपय देते. वर ती दिवसभर घरी नसते तेंव्हा तिची लिप्स्टिक, मेकअपचे सामान, काय काय वापरते. मिळालेले पैसे साठवून तिने आता भारीपैकी मोबाईल पण घेतलाय. कायम मोबाईलवर असते. मायला सांगावे तर माय दिवसभर कामानी कावलेली असती. बापूला सांगावे तर बापूचं डोकं तिरपागडं! पहिली माझ्याच पेकाटात लाथ घालील. त्यात इमली बापूची लाडकी. कसाबसा कांच्याला गोड बोलून घराबाहेर काढला. एक नंबरचा वासू साला. तशी आमच्या वस्तीत आयटेमगिरी चालते पण लपुन. पोरींच्या आया लय लक्ष ठिऊन असतात. त्याला कारण कांच्यासकट आम्ही सगळे टगे अशी वस्तीत प्रसिद्धी !
पांडया आणि मी एकदा रस्त्याने चाललो होतो तर वस्तीत एक सगळ्या बाजूनी ठोकलेली पिवळ्या पाटीची इंडीका गाडी उभी होती. आत पाहीले तर पांडया आणि मी चाटच झालो. आमच्या वस्तीतील एकमेव बर्यापैकी आयटेम मंगळसुत्र घालून ड्रायवरच्या बाजूच्या सिटवर बसली होती. पांडयाला म्हटले अर्रर्र हिचं लग्न कधी झालं? मग पांडयानी माहीती काढली की पलिकडच्या वस्तीतला पोरगा एका आयटी कंपनीच्या इंडीका गाडीवर ड्रायवर आहे, त्यानी तिला पटवली आणि पळून जावून लग्न केले. च्यायला ! लय तकलीफ झाली हे ऐकुन. आमच्या वस्तीतला एकमेव बरा आयटेम दुसर्या वस्तीतील खवट्यानी पटवला म्हणजे काय? आमच्या नाकावर टिच्चून ? ते पण तिच्याबरोबर नेहमी तिचा खडूस एंटेना असताना ? एंटेना म्हणजे तिची आई. तिचा बाप दिवसभर इस्त्रीच्या कामात असतो. म्हणून तिची आई वस्तीतली पोरं टारगट म्हणून टी. व्ही. च्या एंटेनासारखी कायम पोरीबरोबर असायची. त्यामुळे आयटेमला आम्ही टी.व्ही. आणि तिच्या आईला एंटेना म्ह्णायचो. लय जिवाला तकलिफ झाली बाकी. आपण बी एखादी ड्रायवरची नोकरी बघायला पायजे आयटी कंपनीत.
आमच्या ग्यांगमधल्या पांडयाला आपण मानतो. त्याचं खरं नाव अच्च्या. पण बोलतो पंडितसारखा, म्हणून आम्ही त्याला पंडित म्हणायचो. पंडितचा झाला पांडया. आमच्या ग्यांगमधला एकमेव जो एस. एस. सी. पास झाला आणि आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. म्हणजे आता डिग्रीच की ! इस्त्रीवाल्याच्या पोरीने लग्न केल्याचे कळल्यावर पांडयाला म्हटले लय तकलीफ झाली तर पांडया म्हटला अरे छोड यार, असल्या छप्पन मिळतील. वर इंग्लिश मारलं. नो युवरसेल्फ अँड यु वुइल वीन ऑल ब्याटल्स. च्यायला! अर्थ सांग म्हटले तर असं काय सांगितलं की डोक्यावरुन गेलं. पण बाते साला अकलमंदीची करतो. म्हणून आपण त्याला मानतो.
तसा कांच्या अधीमधी सगळ्या ग्यांगला घेऊन ट्रिप काढतो. ट्रिप म्हणजे खाणं, पिणं, आरडाओरडा. कांच्याला दोन तीन पेग बास होतात. त्यातच तो असा काय आउट होतो की जपुन रहायला लागते. एकदा कांच्या म्हटला चल आपण मंबयला जाऊ. आऊचा मामा बोरवलीला रहातो. तो म्हणला की तिथं गोराई का कसलं जंगल आहे तिथं एका आंटीकडं अस्सल गोव्याचा माल मिळतो. वर नंतर पण "भारी" गंमत करून येऊ असं कायबाय सांगायला लागला. मी येत नाय म्हटल्यावर मला शिव्या घालत तो आणि आऊ मंबयला गेला. दोन दिवसांनी कांच्या आणि आऊ परत आले तर त्यांचा थोबडा उतरलेला होता. कशी झाली ट्रिप असे विचारले तर दोघेही बोलायला तयार नव्ह्ते.
एक दिवस पांडया आणि मी आऊला साइडला घेतले, बीयर पाजली आणि मग आऊ काय झाले ते सांगायला लागला. "... अरे तो आय xxx कांच्या ! मामानी त्या आंटीच्या गुत्त्यावर गोव्याची फेणी प्यायला नेले. कांच्या तीन चार घोट घेतल्यावर मोठयानी कोकलला..., तिच्याआयला ही फेणी हाय का घोडयाचा मूत ? आंटीने ते ऐकले आणि भाषेवरुन तिनी ओळखलं की ही बेणी इथली न्हाइत. तिनी तिच्या चेल्यांना इशारा केला. कांच्याला न मला मागं नेऊन त्यांनी आम्हाला चांगलाच बुकलला. कांच्याला अक्कल नाही. आपला वट वस्तीत हाये म्हणजे समदीकडे हाये का? त्यात ते मंबयचे मवाली. एव्ह्ढं होऊन पण कांच्याची खाज गेली नाही. वर मामाला म्हणतो की आता आलोच हाये तर ती गंमत पण करुन जाऊ. मामा वैतागला आणि दिले त्याला कुठल्यातरी गल्लीत पाठवून. तिथं ती बाई कांच्याचा थोबडा पाहून सुरवातीलाच म्हटली, मेरे पेटमे बच्चा है. जरा संभालके. कांच्या शिव्या घालत परत आला आणि मला म्हटला लय झाली गंमत. मिळल त्या गाडीनी परत जाऊ. "
मी आणि पांडया खो खो हसत सुटलो पांडयाची फजिती ऐकून. इमलीला आता सावध केले पाह्यजे असल्याच्या नादी लागू नको म्हणून.
कधी कधी पांडया पण डोक्यात लय भुंगे सोडतो. मला म्हणतो की तू थोडाफार त्या टाईमपास पिक्चर मधल्या हिरोसारखा दिसतो. तूला बी अशीच एखादी हिरॉईन घावल. आणि स्वतःवर चिडून म्हणतो सालं आपलं लाइफ असंच जाणार काय सडत ? कधी गुड फिलिंग वाटतच नाय. मला बी कधी कधी शेम वाटतं. आजूबाजूच्या पॉश सोसायटींतली पोरंपोरी काय मजेत लाइफ जगतात. आपलं सालं नशीबच खत्रुड. तरी पण एकदा पांडया म्ह्णतो तसं गुड फिलींग आलं होतं थोडे दिवस. आमच्या वस्तीच्या सार्वजनिक गणपतिच्या विसर्जन मिरवणूकीत पोपटरावनी लई भारी डीजे आणला होता. आम्ही सगळी पोरं कोंबडी पळाली वर हे धमाल नाचत होतो. पोपटरावनी मागं बीयरच्या बाटल्यांची गाडी पण ठिवली होती. मी नाचत असताना पब्लिकमधली एक आयटेम माझ्या डान्सला बघून लय खुष दिसत होती. मला बी गुदगुल्या झाल्या मनातल्या मनात. मिरवणूक संपल्यावर पांडयाला मी ते सांगीतलं सुद्धा. म्हटलं परत भेटली तर लय बेस होईल. आन आयशपथ गणपती पावला. तिस-याच दिवशी समोरच्या मॉलमधी तीच आयटेम जातानी दिसली. मी पाठलाग केला तर ती एका कॉस्मेटीकच्या दुकानात जाताना दिसली. अर्ध्या तासानी ती भायेर आली आणि मी दुकानासमोर उभा! मी स्माईल दयायची डेअरिंग केली आणि तिनी बी चक्कं स्माईल दिलं की राव. म्हटलं आज एव्ह्ढच बास. त्या दुकानात आमच्या वस्तीतला टिंग-या सेल्समनचं काम करतो. ठरवलं की त्याच्याकडून माहिती काढू. टिंग-या साला मॉलमधी कामाला लागल्यापासून लय आकडतो. पह्यला आमच्याच ग्यांगमधी होता. म्हटलं आकडला तर आकडला , पण त्या आयटेमची माहिती काढू. सरळ दुकानात घूसलो आणि टिंग-याला कोप-यात नेवून डायरेक्ट प्रश्न विचारला की मगाशी ती पोरगी आली होती तिचं नाव काय, कुठं रहाते वगैरे. तुला काय माहिती हाये का ! तर टिंग-या आधी खो खो हसत सुटला आणि नंतर म्ह्टला, " अरे येडा की खुळा तू? ती पोरगी एका वेळी पाच हजाराचं कॉस्मेटीकचं सामान नेते. तिची लिप्स्टीकच नुसती पाचशे रुपयाची हाये. तुला झेपनार हे का हे ? ते बी जावू दे. मागं असाच एक खवटया तिच्या मागं फिरत होता. तिनी काय केलं माहिती हे ? त्याला एका हॉटेलात नेलं आणि भरपूर मिरच्या मागवल्या. आणि त्याला म्हणली की तुझं माझ्यावर खरं प्रेम असंल तर एव्ह्ढया मिरच्या खाऊन दाखव. त्या येडयाला पण शिवाजी द बॉसमधला रजनीकांत चावला होता की काय माहीत. त्यानी सगळ्या मिरच्या खाल्ल्या आणि नंतर बोंबलत पळून गेलं. नादी नको लागू तिच्या. एकदम चक्रम डोक्याची पोरगी हाय ती !" तिच्याआयला ! पांडया म्हटला तसं गुड फिलींग दोन तीन दिवस आलं होतं. टिंग-यानी त्यातली हवाच काढून घेतली. टाईमपासमधल्या हिरोला लय भारी हिरॉईन भेटली. पण पिक्चरमधी काही बी शक्य असतं, तसं रियल लाईफमधी नसतं हे बाकी खरं.
एक दिवस पांडयाला सणक आली. म्हटला आपली लेवल वाढवायला जवळच्या सोसायट्यांमधल्या पोरांबरोबर फूट्बॉलची मॅच खेळू. मी म्हटले की अरे ते सगळे मोठ्या आईबापाचे हायेत. चांगल्या शाळा कॉलेजात जातात. त्यांना स्पेशल कोचिंग असतंय खेळांचं. आपलीच इज्जत जाईल. एक तर आपले प्लेयर लय भारी. पण पांडया काय ऐकायला तयार नव्हता. पांडयाला म्हटले फूटबॉलच्या स्टडचे काय? कारण नवीन स्वस्तात घ्यायचे म्हटले तरी हजार रुपयांच्या खाली नाहीत. तो म्हटला क्यानव्हासचे वापरु. प्रत्यक्ष मॅच झाली तेव्हा झाली नसती तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं. कांच्याला खबर लागली आणि दादागिरी करुन गोल कीपर झाला. त्याने जश्या काय बापजन्मात पोरी पाहील्या नव्ह्त्या. त्या पोरांना चियर अप करायला त्यांच्या सोसायटीतल्या पोरी आल्या होत्या. कांच्या गोल कीपींग सोडून त्या पोरींकडंच बघत राह्ला. त्यात आऊ म्हटला मी डीफेन्सला खेळतो. ह्या आऊ घन्ट्याला लहानपणी गोटया आणि आता जुगार, ह्याच्याशिवाय खेळणं माहीत नाय, आणि हा डीफेन्सला खेळणार. मी तेव्हाच पांडयाला म्हटलं आपलं काही खरं नाही. शेवटी व्हायचा तोच नतीजा झाला. १०-० नी हरवलं आम्हाला त्या पोरांनी. त्या टिममधलं एक पोरगं जाता जाता दुस-या पोराला म्हटलंच, "आय शप्पथ कसली सोन्या पक्या टिम होती. जरा स्टँडर्ड टिम असती तर खेळायला तरी मजा आली असती." ते ऐकून पांडयाचा थोबडा बघण्यासारखा झाला.
माय म्हणती दुसरा काय कामधंदा करायचा नाय तर एवढया समोरच्या रस्त्यावर हातगाडया लागतात, तू बी एखादी गाडी लाव. चार पैसे कमव. तसा मनात इचार हाये कच्छी दाबेलीची गाडी लावून पहायचा. पण भांडवलाचं काय? बापू काय एवढे पैसे देणार नाय. कांच्याचा वशीला लावून पोपटरावला पटवाया लागंल सुशिक्षीत बेकार म्हणून काय मदत मिळंल काय कार्पोरेशनकडून. पण पोपटरावचं काय तरी भलतंच चाललंय. पोरबाळ होत नाय म्हणून दुसरं लगीन केलंय. पन अजून पाळणा हलंना. म्हणून एका बाबाच्या नादी लागलाय. एकदा टेंपो भरून वस्तीतल्या बाया, बापे, पोरं , सगळ्यांना त्यानी त्या बाबाच्या दर्शनाला नेलं. मी जात नव्हतो, पण मायनी जबरदस्तीनी पाठवलं. तिला देवाधर्माचं लय वेड. पांडयाला म्हटले चल जाऊ. कुठल्यातरी गावाच्या पार भायेर त्या बाबाचा मठ होता. भगवी कफनी घातलेला आणि दाढी वाढवलेला बाबा चेह-यावरून जणू जन्मठेपेचा फरार कैदी वाटत होता. त्याचे आजुबाजूचे भगतगण पण तसेच उग्र चेह-याचे. पोपटरावनी आणि त्याच्या दोन्ही बायकांनी गेल्या गेल्या बाबापुढं लोटांगण घातलं. पोपटराव बाबाचे पाय धरून म्हणाया लागला, " म्हाराज, लेकरावर क्रीपा करा. येव्हढं देवाचं करतो. व्हता न्हवता तो पैसा म्हाराजांच्या चरणी अर्पण केला. देवाच्या आन म्हाराजांच्या शेवेत काय कमी पडत आंसल तर ते तरी सांगा !" बाबांनी डोळे झाकून काय तरी पुटपुट केली , जवळच्या पात्रातून एक संत्र घेतलं आणि दाणकन पोपटरावच्या पाठीत फेकून मारलं. त्यानंतर बाबानी डोळे उघडले आणि मोठमोठ्यानी रागाने कायतरी बडबडायला लागला. पोपटरावला काय समजंना ! त्यानी आजूबाजूच्या भक्तांकडं पाह्यलं. एका भक्तानी पोपटरावला बाजूला घेतलं आन म्हणला, " महाराज म्हणताहेत सेवेत आजून कमी हाये. महाराजांची तुझ्यावर मर्जी आहे. महाराजांनी तूला संत्र फेकून नाय मारलं. महाराजांनी तूला संत्र्याचा प्रसाद दिलाय. त्याच्या फोडी कर, एक फोड तू खा आन बाकीच्या तुझ्या दोन्ही बायकांना खायला दे. आजपासून महाराजांच्या सेवेला तुझ्या दोन्ही बायकांना आठ दिवस ठेव. मनपूर्वक आणि श्रद्धापूर्वक महाराजांची सेवा केली की तुझी कामना पुर्ण होईल." महाराजांची इच्छा म्हटल्यावर पोपटराव काय बोलणार. तो श्रद्धापूर्वक त्याच्या बायकांना महाराजांच्या सेवेला ठेवून आला. पांडया आणि मी एकमेकाला टाळी देत खदाखदा हसत म्हटले, "आता पोपटरावच्या घरी पाळणा हलणार बघ !" जाऊ दया. आपलं काय जातंय. पोपटरावनी आपलं काम केल्याशी कारण. तिकडं तो आणि त्याचं कुटुंब कायम का जाईना बाबाच्या सेवेला. तेव्ह्ढी कच्छी दाबेलीची गाडी लावता आली म्हणजे आपल्याला पण महाराज पावला म्हणायचे ! तोपर्यंत असाच टाईमपास करत दिवस घालवायचे !
प्रतिक्रिया
10 Mar 2014 - 6:33 pm | यसवायजी
:)
आता वाचतो.
10 Mar 2014 - 6:54 pm | मुक्त विहारि
लई उपकथानके...
10 Mar 2014 - 7:03 pm | बबन ताम्बे
सहमत. मलाही वाटते जरा जास्तच झालीत उपकथानके ! अजून नवीन आहे या क्षेत्रात :-)
10 Mar 2014 - 9:57 pm | मुक्त विहारि
इथे बरेच जण नविन आहेत.
त्यामुळे बिंधास्त लिहा.
11 Mar 2014 - 11:30 am | बबन ताम्बे
धन्यवाद.
10 Mar 2014 - 10:14 pm | खटपट्या
नया हु मय !! (असं म्हना)
11 Mar 2014 - 8:59 am | लौंगी मिरची
अंह् !
" नया है वह "
11 Mar 2014 - 11:33 am | बबन ताम्बे
तसा एकदम नया नै मैं. याच्या आधी "मित्रास पत्र (सन २०४५)" असा एक इनोदी लेख लिव्ह्लाय.
25 Mar 2014 - 1:39 pm | निनाद मुक्काम प...
म्हणूनच क्रमश असायला हवे होते.
अजूनही सिक्वेल निघू शकतो ह्याचा
पु ले शु
10 Mar 2014 - 7:06 pm | बॅटमॅन
अतिशय जबरी. मुवी म्हणतात त्याप्रमाणे अनेक उपकथानके आहेत. भारी आवडलं!!!
11 Mar 2014 - 11:54 am | बबन ताम्बे
श्री. बॅटमॅन ,
थँक यू !
10 Mar 2014 - 7:20 pm | आत्मशून्य
?
10 Mar 2014 - 7:30 pm | बबन ताम्बे
थोडीशी विनोदी कथा आहे म्हणून विडंबन ऑप्शन निवडले. "विनोदी" हे ऑप्शन कुठे सापडले नाही.
10 Mar 2014 - 7:23 pm | यसवायजी
फुल्ल २ टैम्पास्स..
11 Mar 2014 - 11:35 am | बबन ताम्बे
श्री.आवडेश,
थँक यु !
11 Mar 2014 - 12:49 pm | यसवायजी
श्री.आवडेश,
:))
:))
आता तर नक्कीच नया हय वह. :))
11 Mar 2014 - 1:01 pm | बबन ताम्बे
सॉरी " एसवाय-जी ".
:-)
10 Mar 2014 - 9:41 pm | चिगो
टाइमपास जमलाय, बबनराव..
11 Mar 2014 - 11:36 am | बबन ताम्बे
श्री. चिगो,
थँक यु व्हेरी मच !
10 Mar 2014 - 11:02 pm | धन्या
मस्त जमलंय. निरिक्षण जबरा आहे. :)
11 Mar 2014 - 11:38 am | बबन ताम्बे
श्री. धनाजी,
धन्यवाद. माझ्या सोसायटीच्या आजूबाजूला तशी वस्ती आहे.
10 Mar 2014 - 11:53 pm | प्यारे१
लईच्च झाला की टाईमपास.
डिट्टेलवारी ल्हिवलंय.
बाकी ते.... आ सो!
11 Mar 2014 - 11:40 am | बबन ताम्बे
श्री. प्रशांत आवले,
धन्यवाद. आवडलाना टाईमपास ?
11 Mar 2014 - 6:46 am | स्पा
मजा आली.
लिहित रहा :-)
11 Mar 2014 - 11:41 am | बबन ताम्बे
श्री. स्पा जी,
धन्यवाद.
11 Mar 2014 - 11:03 am | मृत्युन्जय
खुप ओघवत्या शैलीत लिहिला आहे. मजा आली. पण शेवट नाही जमला असे वाटते. पुलेशु.
11 Mar 2014 - 11:43 am | बबन ताम्बे
श्री. मृत्युन्जयजी,
धन्यवाद. अजून सुधारणा करण्याचा अवश्य प्रयत्न करिन.
11 Mar 2014 - 11:12 am | विटेकर
स्तुत्य !
लिहिते रहा !
11 Mar 2014 - 11:44 am | बबन ताम्बे
श्री. विटेकरजी,
मनःपूर्वक धन्यवाद.
11 Mar 2014 - 1:16 pm | संपत
लेख उत्तम वगैरे सालं नेहमीचे झाले. हे वाचून बऱ्याच दिवसांनी नाक्यावर उभा राहून टाईमपास करतोय असे वाटले. जीवाला थंड वाटले.
पुल वगैरे लाडके लेखक खरे, पण आपला वाटणारा लेखक म्हणजे भाऊ पाध्ये. तुमचा लेख वाचून तसेच वाटले.
असेच लेख येवू द्यात.
11 Mar 2014 - 2:33 pm | बबन ताम्बे
श्री. संपत राव.
पु.ल. हे तर महाराष्ट्राचं दैवत आणि भाऊ पाध्ये माझेही अतिशय आवडते लेखक आहेत. आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद !
11 Mar 2014 - 1:20 pm | वैभव जाधव
भारी लिहिलय राव.
मस्तच.
11 Mar 2014 - 2:34 pm | बबन ताम्बे
श्री. वैभव जाधव ,
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद !
11 Mar 2014 - 4:20 pm | जेपी
आवडल .
11 Mar 2014 - 6:02 pm | बबन ताम्बे
थँक यु व्हेरी मच !
11 Mar 2014 - 5:58 pm | भ ट क्या खे ड वा ला
जमतय
काही शब्दांचे नवीन अर्थ समजले. मजा आली.
11 Mar 2014 - 6:02 pm | बबन ताम्बे
थँक यु व्हेरी मच !
12 Mar 2014 - 8:11 pm | बबन ताम्बे
कोणत्या शब्दांचे नवीन अर्थ समजले ते नाही लिहीलेत? :-)
21 Mar 2014 - 7:48 pm | पैसा
अजून येऊ द्या अशा कथा!
24 Mar 2014 - 10:50 am | बबन ताम्बे
थँक यु. नक्किच प्रयत्न करेन.
21 Mar 2014 - 10:32 pm | आसिफ
वाकड-हिंजवडी गावठाणाच्या कट्ट्यावर बसल्यासारखे वाटले.
बाकी यांचे कुठेही भररस्त्यात गाडी थांबवुन पिचकार्या मारणे,गाडीत बसुन दारु पिणे, उगाच कुणालाही शिवीगाळ करणे, भर वेगात गर्दीतुन वेडी वाकडी करत गाडी दामटणे सुरु आहेच.
~ आसिफ.
24 Mar 2014 - 10:53 am | बबन ताम्बे
त्याला इलाज नाही. पुण्यात आय्.टी./बी.पी.ओ. कंपन्यांनी सुबत्ता आणली त्याप्रमाणे त्याचे साईड इफेक्ट पण बरोबर आणले.
25 Mar 2014 - 1:50 pm | इरसाल
श्री बबन ताम्बे
थॅक्यु,
धन्यवाद,
आभारी आहे
9 Apr 2014 - 9:26 am | ब़जरबट्टू
हेच म्हणायला आल्तो बघा.. च्यामारी ते हिन्जेवाडीच्या चैकातले पोस्टूर पाहुन डोक्तातच जाते.,.. च्यामायला... :)
9 Apr 2014 - 10:56 am | बबन ताम्बे
त्यापेक्षा तुम्ही येरवडा, वड्गाव शेरी इकडे चक्कर मारा. एव्ह्ढा अंगावर सोन्याचा भार सोसुन "आमचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान वगैरे..." फोटोसाठी उभी कसे काय राहीले हा प्रश्न पडावा.
11 Apr 2014 - 8:04 pm | उगा काहितरीच
+1
14 Apr 2014 - 3:33 pm | बबन ताम्बे
मराठी अन्ना,
होते असे कधी कधी !
9 Apr 2014 - 9:02 am | चौथा कोनाडा
बबन ताम्बे, टाईमपास छान जमलाय. छान बोले ती एकदम झकास ! आवडेश बरयाच दिवसांनी जरा चमचमीत वाचलं !
वाचताना डोळ्यापुढे चित्र उभे राहिले. विविध पात्रे म्हंजे एक-एक नमुना दिसतोय. उत्कृष्ट निरिक्षणामुळे छान मेळ साधलाय! प्रसंगांचे वर्णन मस्त !
“तारक मेहताका उल्टा चष्मा” किंवा “नुक्कड” सारखी छान मालिका होऊ शकेल. दाबेलीची गाडी लावता येणे" अशी ईच्छा असलेल्या हिरो गित्याची " असाच टाईमपास करत दिवस घालवायचे" असा प्रश्न टाकून पुढील लेखाची देखील तुमी सोय करून ठेवलेली दिसतेय …. . . . .
मग कधी टाकताय पुढचा भाग?
9 Apr 2014 - 10:48 am | बबन ताम्बे
श्री. चौथा कोनाडा ,
अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद. मालीकेबद्दल आत्ताच काही सांगता येणार नही. :-)
पुढचा भाग लवकरच येईल मि.पा. वर.
पुन्हा एकदा थँक यु.
आपला,
बबन तांबे
9 Apr 2014 - 9:36 am | ब़जरबट्टू
मस्त लिहलेय.. अजुन लिहा...
9 Apr 2014 - 10:50 am | बबन ताम्बे
श्री. ब़जरबट्टू,
धन्यवाद.
अॅक्चुली, सर्व मि. पा.च्या वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
आपला,
बबन तांबे
9 Apr 2014 - 3:40 pm | लव उ
पु. ले. शु.
11 Apr 2014 - 7:28 pm | बबन ताम्बे
श्री. लव उ,
धन्यवाद.
11 Apr 2014 - 10:30 pm | मितभाषी
छान. आवडले.
14 Apr 2014 - 3:31 pm | बबन ताम्बे
श्री. मितभाषी,
धन्यवाद !
14 Apr 2014 - 3:43 pm | आदूबाळ
बबणराव - भाग २ लिहा...
14 Apr 2014 - 4:45 pm | बबन ताम्बे
श्री. आदूबाळ,
नक्कीच दुसर भाग लवकर येईल.