कलगीतुरा-भाग ३
या आधीच्या भागांची लिन्क खाली देत आहे.
कलगीतुरा- भाग १
कलगीतुरा- भाग २
या आधीच्या भागांची लिन्क खाली देत आहे.
कलगीतुरा- भाग १
कलगीतुरा- भाग २
याआधीचा लेख खालील लिंकमध्ये वाचणे.
कलगीतुरा - पूर्वार्ध
कांतीशेठ गेल्यानंतर दार लावायला गेलो तर आमच्या सोसायटीतला त्रस्त समंध गोगटया गॅलरीतून कुचेष्टेने हसत ऊभा होताच. लगेच खवचटपणे " काय दिगूशेठ ? नवीन व्हेंचर का? " असे म्हणत खिदळलाच. या गोगटयाची गॅलरी आणि आमची खिडकी समोरासमोरच आहे. हरामखोराला आमच्या घरातली एकूणएक वित्तंबातमी गॅलरीत बसून कळते. या थेरडयाचे मी शंभर अपराध भरायची वाट बघतोय. मला लगेच वाशाला गाठायचे होते, म्हणून मी गोगटयाकडे दुर्लक्ष केले.
" तुम्हाला हिंदी येते? "
" येते तुटकी फुटकी "
" कोकणी येते? "
" नाही "
" अहिरणी "
" अं? "
" गोंडी? "
" नाही "
" तेलगु? "
" नाही "
" तुळु "
" ही कुठली भाषा? "
" तमिळ "
" नाही "
" ओरिया "
" नाही "
" बांग्ला "
" नाही हो नाही "
" भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे अन तुम्हाला तुमची मातृभाषा सोडून
कुठलीही दुसरी भाषा धड येत नाही, खंत नाही वाटत? "
" वाटते ना! "
" कसची? "
" इंग्लिश नाही येत ना त्याची! "
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी,
भ्रष्टाचार सोडून देईल, अशी कोणाची स्वकमाई,
भ्रष्टाचार मेडीकल बिलात नांदे, भ्रष्टाचार टॅक्सरिटर्नमध्ये कोंदे
भ्रष्टाचार ब्ल्याकच्या तिकिटात, भ्रष्टाचार आहे डोनेशनात
भ्रष्टाचार शोधूनिया पाही, भ्रष्टाचार सर्वाभूतां ठायी
भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे
भ्रष्टाचार आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही भ्रष्टाचार भरूनिया राही
भ्रष्टाचार जरी अवगुण, भ्रष्टाचार सत्तेचे कारण
निवडणूक येई, निवडणूक जाई, भ्रष्टाचार आहे तैसा राही
----पगला गजोधर
टाईम साप्ताहीक या जगातील अतिप्रतिष्ठीत साप्ताहीकात झालेल्या १०० लोकप्रिय प्रभावी नेत्यांच्या जनमतचाचणीत लाडके नेते श्री. अरविंद केजरीवाल हे पहीले आले आहेत तर देशाचे नेते नरेन्द्र मोदी हे दुसरे आले आहेत! अर्थात जरी केजरीवालांनी "हो" मतांमधे मोदींना मागे टाकले असले तरी "नो" मतांमधे मोदींनी बाजी मारली आहे. राहूल गांधींचा क्रमांक त्यांच्या वया इतकाच म्हणजे ४३वा आला आहे! तेंव्हा सर्वप्रथम केजरीवालांचे अभिनंदन! आता जरी ते देशाचे पंतप्रधान चुकून झाले नाहीत तरी सारे विश्वासाठीचे ते एक प्रभावी व्यक्तीमत्व ठरले आहेत.
भारताचं नावडतं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". मुस्लिमांचा 'प्रश्न' सोडवायचा आहे ना? मग मुस्लिमांना हिंदू वस्त्यांमध्ये घरं घेऊ देऊ नका. तसं नाही केलं तर सुरुवातीला एखादी मुस्लिम व्यक्ती जास्त किमतीने घर घेईल आणि आजूबाजूच्या परिसरात इतर मुस्लिम कमी किमतीची घरे घेऊन स्थायिक होतील. अशी धमकी प्रवीण तोगडिया यांनी दिल्याचं वृत्त आज 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं. बिहारी भाजपा नेते गिरीराज यांचा मोदीविरोधकांचे स्थान पाकिस्तानात आहे हा "विनोद" ताजा असतानाच तोगडियांच्या नवीन वाचाळतेमुळे भाजपा आणि संघाची पुन्हा एकदा दातखीळ बसली आहे.
मी आणि माझे नशीब हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझे नशीब कुणी लिहिले हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझे नशीब यावर चर्चा बंद करा आणि नशीब घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....
माझं मत त्याला रे ज्याने ईकास केला
त्याला नाही ज्याने मला नुस्ताच झुलविला
त्याला नाही ज्याने मला नुस्ता रडविला
माझं मत त्याला रे ज्यानं मला घडविला
माझ मत त्याला रे जो शोभलं त्या पदाला
सगळीकडे त्याच्या नावाचा डंका मी पिटविला
माझं मत त्याला रे
माझं मत त्याला....
विडंबन: माझ आभाळ तुला घे(टिंग्या)
सोडा नसला तरी चालेल ,
पण संध्याकाळी एक चपटी असावी !
एकही चुनाडबी नसली तर चालेल ,
पण खिशात एक तंबाखूची पुडी असावी !
लॉलीपॉप- तंदूरीची सर कोणालाच नाही ,
पण चखण्यात एक चकली तरी असावी !
हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली ,
पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी !
क्रेट संपवायला गँग आहेच ,
पण शेवटी मारायला एक चिल्ड असावीच !
पाण्याशिवाय सर्वच अपुर्ण ,
पण किक बसायला एक ऑन द रॉक असावी'च्च' !!!
-पिणार
____________________________________________
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "पूरब से सुर्य उगा" असं एक गाणं लागायचं. भारत सरकारच्या साक्षरता अभियानाची ती जाहिरात होती. त्या अभियानाच पुढे काय झालं ते माहिती नाही. पण त्यातून साक्षर झालेल्या जनतेसमोर लवकरच एक नवीन आव्हान निर्माण झालं. अक्षरओळख तर झाली, लिहिता - वाचता पण यायला लागलं पण , "कॉम्पुटर येतो का तुम्हाला ?" या प्रश्नाच "नाही" असंच उत्तर द्यावा लागायचं. नंतर त्या गरीब जनतेनी महत्प्रयासाने कॉम्पुटर सुद्धा शिकून घेतला. पण आता परत त्याच जनतेसमोर आणखी एक आव्हान निर्माण झालं आहे. त्याच जनसमुदायाचा मी एक प्रतिनिधी आहे. " मला सुद्धा स्मार्टफोन्स वापरता येत नाहीत".