माझा पहिला स्मार्टफोन्

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
2 Apr 2014 - 10:11 am

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "पूरब से सुर्य उगा" असं एक गाणं लागायचं. भारत सरकारच्या साक्षरता अभियानाची ती जाहिरात होती. त्या अभियानाच पुढे काय झालं ते माहिती नाही. पण त्यातून साक्षर झालेल्या जनतेसमोर लवकरच एक नवीन आव्हान निर्माण झालं. अक्षरओळख तर झाली, लिहिता - वाचता पण यायला लागलं पण , "कॉम्पुटर येतो का तुम्हाला ?" या प्रश्नाच "नाही" असंच उत्तर द्यावा लागायचं. नंतर त्या गरीब जनतेनी महत्प्रयासाने कॉम्पुटर सुद्धा शिकून घेतला. पण आता परत त्याच जनतेसमोर आणखी एक आव्हान निर्माण झालं आहे. त्याच जनसमुदायाचा मी एक प्रतिनिधी आहे. " मला सुद्धा स्मार्टफोन्स वापरता येत नाहीत". नाही म्हणायला माझ्या मित्रांचे स्मार्टफोन्स मी एक दोन वेळा वापरायचा प्रयत्न केला आहे. पण त्यातून फार काही निष्पन्न झालं नाही. स्मार्टफोन्सविषयी माझा मुलभूत प्रश्न असा आहे कि स्मार्टफोन् वापरायला जर माझा स्मार्टनेस वापरावा लागत असेल तर त्या फोन ला स्मार्ट का म्हणायचं ??
त्यादिवशी माझ्या भावांसोबत गप्पा मारत असताना मी सहज म्हणालो , " मला नवीन फोन घ्यायचा आहे. स्मार्टफोन् घ्यायचा विचार आहे. "
ते ऐकून त्या दोघांचा चेहरा इतका गंभीर झाला कि जणू काही मी त्यांना ," माझी भारतरत्न साठी शिफारस करा" असं म्हणालोय !!!!
पण ते दोघही मला चांगलाच ओळखत असल्यामुळे त्यांच्या गांभीर्याच कारण मला कळत होतं. जगातल्या कोणत्याही विषयावर माझं नसलेलं ज्ञान मी पाजाळू शकतो पण मोबाईल चा विषय निघाला कि मी गप्प बसतो. पण आता स्मार्टफोन् घ्यायचाच असं मी ठरवलं. माझ्या दोन्ही भावांनी मला मदत करायचा मान्य केलं. मग त्या दोघांची अगम्य भाषेत चर्चा सुरु झाली. माझं बजेट त्यांनी परस्पर ठरवलं. अधूनमधून 'नोकिया', 'साम्संग,'सोनी' अशी नावं मला ऐकू येत होती.
नंतर श्रीकांत म्हणाला ," अरे नोकिया चांगला आहे पण त्याच्यात विंडोज ८ ओएस आहे."
व्वा !! नोकिया, विंडोज आणि ओएस हे तीनही शब्द माझ्या ओळखीचे होते. मी खुश झालो.
पण दादा लगेच म्हणाला, " हो !! आणि विंडोज ८ ह्याला वापरता येणार नाही." दोघेही हसले.
शेवटी मी न राहवून म्हणालो, "अरे, विंडोज ही मला माहिती असलेली एकमेव ओएस आहे. थोडीफार जमेल ना मला."
"तू शांत बस. माझ्या laptop मध्ये विंडोज ८ च आहे" , दादा म्हणाला.

आणि मी खरचं शांत बसलो. दोन दिवसांपूर्वी दादाचा laptop वापरत असताना तो बंद कसा करायचा हे मी अर्धा तास शोधत होतो. (म्हणजे अर्ध्या तासांनी मला यश मिळालं असं नाही. नन्तर मी प्रयत्न करणं सोडून दिलं ). नवीन ओएस तयार करताना सगळं काही बदललं तर चालेल पण कॉम्पुटर सुरु आणि बंद करण्याची पद्धत का बदलावी लागते हे माझ्या आकलनशक्ती पलीकडलं आहे. असो.

तर अश्या रीतींनी माझं मोबाईलपुराण सुरु झालं. त्यानंतर रोज ते दोघही मला नवीन नवीन मोबाईल चे नाव सांगत होते. आणि रोज वेगवेगळ्या वेबसाईट चे नाव सांगून , "इथे जाउन हे चेक कर ,तिथे जाउन ते चेक कर " असं सुरु होतं. त्या वेबसाईट वर गेल्यावर मोबाईल चे वेगवेगळ्या कोनातून काढलेले फोटो दिसायचे. आणि त्याखाली अगम्य भाषेत काहीतरी लिहिलेलं असायचं. पण मी आधी कुठेतरी कोपऱ्यात लिहिलेली किंमत वाचायचो. १६८०० ओन्ली !! १८३०० ओन्ली !!! २०५०० ओन्ली !!!. ओन्ली लिहून या लोकांना काय सांगायचं असतं देव जाणे. मला मिळालेला पहिला पगार याच आकड्यांच्या जवळपास होता .आता थोडा जास्त मिळत असला तरी तिथे पोहोचायला ५-६ वर्ष लागली. आणि ह्यातला कोणताही फोन घेतला तरी तो आउटडेटेड व्हायला ५-६ महिने पण लागणार नाही . पण माझे हे विचार कोण ऐकणार.
दादा म्हणाला," अरे आजकाल कॉलेज च्या मुलांकडे चांगले फोन असतात तर तू कशाला इतका विचार करतो ?"

कॉलेज चे मुलं एवढ्या महागाचा फोन का वापरतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. म्हणजे कॉलेज मध्ये जाउन अभ्यास करा किंवा लेक्चर करा असे सल्ले मी देणार नाही पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ?? मी पुण्यातल्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो . त्यांच्याकडे त्यांच्या नात्यातला एक मुलगा राहत होता. तो इथेच शिकतो अशी त्यांनी ओळख करून दिली. पण त्याने माझ्याकडे बघितला सुद्धा नाही. देवाशप्पथ सांगतो त्या नंतर चे दोन तास मी त्याचा चेहरा बघायला धडपडत होतो. पण तो सतत त्याच्या मोबाईल कडेच बघत होता .आणि नंतर त्याच मोबाईल वर कोणाचा तरी फोन आला म्हणून तो निघून गेला.

असो. तर आपल्या पहिल्या पगाराएव्हढे पैसे खर्च करून मोबाईल घ्यावा का या विचारात मी पडलो. पण माझ्या दोन्ही भावांनी माझा मन वळवलं. आणि शेवटी मी स्मार्टफोन् घेतलाच. नंतर चे काही दिवस तो शिकण्यात गेले. आता मी पण स्मार्ट झालो आहे. समोर कोणीतरी माझ्याशी बोलत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून हातातल्या फोन कडे बघणं आता मला जमायला लागला आहे. " आज संध्याकाळी आपण भेटू " असा मेसेज whats app वर मित्रांना पाठवून , संध्याकाळी ते भेटल्यावर whats app वर तिसऱ्याच मित्राशी बोलणं सुद्धा मी सुरु केलं आहे. थोडक्यात आईनस्टाईननी म्हटलेलं वाक्य मी आता खर करून दाखवतोय.

" A day will come when technology will surpass humanity. And we will have generation of idiots!! “---- Albert Einstein

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Apr 2014 - 10:26 am | पैसा

मस्त! खुसखुशीत लिखाण आहे! मिपावर स्वागत.

Prajakta२१'s picture

2 Apr 2014 - 10:59 am | Prajakta२१

त्यादिवशी माझ्या भावांसोबत गप्पा मारत असताना मी सहज म्हणालो , " मला नवीन फोन घ्यायचा आहे. स्मार्टफोन् घ्यायचा विचार आहे. "
ते ऐकून त्या दोघांचा चेहरा इतका गंभीर झाला कि जणू काही मी त्यांना ," माझी भारतरत्न साठी शिफारस करा" असं म्हणालोय !!!!
+++++++++१ :-)

मदनबाण's picture

2 Apr 2014 - 12:00 pm | मदनबाण

म्हणजे कॉलेज मध्ये जाउन अभ्यास करा किंवा लेक्चर करा असे सल्ले मी देणार नाही पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ??
इतका स्मार्ट प्रश्न पडणार्‍यांना स्मार्ट फोन शिकताना कष्ट पडतात यह कुछ हजम नही होत्या मेरेकु... ;)
बाकी प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन बघणारी अरसिक मंडळी आहेत असं समजण्यास हरकत नसावी ! ;) किंवा ते स्मार्ट नसुन मठ्ठ आहेत. ;) हल्ली लोकांना निसर्ग सौंदर्यं म्हणजे नक्की काय तेच कळतं नाही बाँ ! ;)

मिपावर स्वागत... :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Apr 2014 - 10:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्यांच्या स्मार्ट्फोनवर कायतरी अधिक "प्रेक्षणीय" असेल :)

चिगो's picture

2 Apr 2014 - 12:34 pm | चिगो

मस्त खुसखुशीत लेख..

पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ??

आम्ही नशिबवान.. कॉलेजात असतांना मोबाईल ही परवडणारी वस्तू नव्हती, त्यामुळे सौंदर्यस्थळे बघायचो मस्तपैकी.. ;-)

ह्यावरुन एक किस्सा आठवला. तेव्हा मोबाईल जेमेतेम आला होता. (म्हणजे रिलायन्सने "इनकमिंग फ्री"वालं क्रांतिकारक पाऊल उचललं, त्याच्या जस्ट आधी.) आणि त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाईल आहे, अश्यांना कॉलेजात जाम भाव होता. एकदा एक सुबक ठेंगणी ज्युनियर कन्यका आम्हास विचारता झाली. "आप के पास सेल है?" मी म्हणालो,"हां, है ना.. लेकीन हॉस्टेल पे है.." आता आम्हा काय ठाऊक की मोबाईलला सेल पण म्हणतात म्हणून.. मी बापडा बॅटरी वाले सेल समजत होतो.. ;-)

पैसा's picture

2 Apr 2014 - 1:55 pm | पैसा

=))

दिव्यश्री's picture

2 Apr 2014 - 3:35 pm | दिव्यश्री

:D *LOL*

कुठेतरी वाचाल आहे . पुन्हा तितकीच हसले . ;) :D

बाबा पाटील's picture

2 Apr 2014 - 2:37 pm | बाबा पाटील

मला पण हे स्मार्ट फोनचे लफडे अजुन जमले नाही,माझी कन्या मात्र सतत त्यात काही तरी करत असते आपल्या काय डोक्यात त्याबद्दल प्रकाश पडत नाही.त्यामुळे आमचा जुना नोकिया ई सिरिज जिंदाबाद्,तोडा,फोडा परत जोडा,काम चालु.

झक्कास!
कोणीतरी आहे तर माझ्याबरोबर ई सिरिजचा फोन वापरणारे!
धड १२ तास न चालणाऱ्या अँड्रॉईड फोनसमोर २-३ दिवस ब्याटरी चालवणारे हे नोकियाचे फोन! :)

धन्या's picture

2 Apr 2014 - 8:26 pm | धन्या

>> धड १२ तास न चालणाऱ्या अँड्रॉईड फोनसमोर
हे बाकी खरं आहे.

इरसाल's picture

3 Apr 2014 - 2:13 pm | इरसाल

माझा नोकिया ३३१५ अजुनपर्यंत जिवंत होता. घरच्यांनी म्हणे भंगार्वाल्याला दिला. मेरा तो दिल हे ना जार जार रोया.

टवाळ कार्टा's picture

3 Apr 2014 - 2:31 pm | टवाळ कार्टा

कसला दणकट मोबल्या आहे तो...गरज लागली तर फेकूनसुध्धा मारता येतो =))

क्या बात! आम्हीही डंब फोनच वापरतो.

प्यारे१'s picture

3 Apr 2014 - 3:02 pm | प्यारे१

स्मार्ट्फोन म्हणजे गर्ल फ्रेन्ड. मिरवायला बरी.
बेसिक फोन म्हणजे बायको. (ह्यानंतर कमेंट येत नसतात. धन्यवाद)

(ह्यानंतर कमेंट येत नसतात. धन्यवाद)

यावर "ठ्ठो" करू की उगा स्त्रीद्वेष्टेपणावर मेगाबायटी निबंध लिहू ते कळेना, सबब एक स्मायलीच टाकतो झालं.

=))

पण कॉलेज च्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघायचं सोडून मोबाईलच्या स्क्रीन कडे बघण्यात काय सुख असतं ??

१००० वेळा सहमत.

बाकी लेख एकदम खुसखुशीत. :)

ज्यांना आइनस्टाइनची थेअरी कळली नाही असे म्हटतात त्यांना खरं म्हणजे त्यातलं बरंच काही कळलेलं असतं .आपले डोळे मल्टी अॅंगल नी बोटे मल्टी टच आहेत .नोटिफिकेशन ,टच ,आणि चिमटेही काढू शकतात .तुमच्यासारख्या स्माट लोकांनी हे फोन नाही वापरायचे तर कोणी वापरायचे ?थोड्याच दिवसांत गुगल ग्लास ही घ्याल आणि काय धमाल उडवाल ते सांगता येत नाही .

बाकी सहाव्या आयोगापर्यंत प्रतिसाद जाईल असे वाटले नव्हते .त्यात त्या प्राध्यापकांचा काय दोष ?
पुढे मागे नोकिआ इ सिरिज अथवा एन एट मध्ये नोकिआने ६००मेहर्ज चा प्रसेसर बदलून ड्यूल कोर टाकला असता तर चांगलीच सूमो कुस्ती झाली असती .
पाहाते राहा नी लिहिते राहा .

>>पाहाते राहा नी लिहिते राहा .

+१

सहावा वेतन आयोग म्हणजे जुने हिशेब चुकते करणं आहे. लक्स न देणे. ;)

चिनार's picture

2 Apr 2014 - 5:05 pm | चिनार

प्रतिक्रियेसाठी मनापासुन आभार !!

धन्या's picture

2 Apr 2014 - 5:55 pm | धन्या

चांगला.

मी पन दोन दिवसान आदी माजा पयला मार्टफोन घ्यातला. लय भारी वाटताय त्या फोननी. मना आता आसा वाटताय का मी आदीच का नाय यांड्रॉड फोन घ्यातला.

कदी पायजे तवा इंटरनेट बगायचा. तो ल्यापटॉप चालू कराय नुको आनी काय पन नुको.

अरेच्चा माझा प्रतिसाद जास्त स्मार्ट होता की काय.... ;)

स्पंदना's picture

3 Apr 2014 - 4:40 pm | स्पंदना

मला एक समजत नाही माधवा, आधी खुपावंच का? ऑ?
जरा मिळुन मिसळुन राह्यल तर काय बिघडतय? उगा भरल्या घरात एखादी वचावचा बोलणारी काकी असते तसं का व्हावं माणसानं?

बॅटमॅन's picture

3 Apr 2014 - 6:31 pm | बॅटमॅन

उगा भरल्या घरात एखादी वचावचा बोलणारी काकी असते तसं का व्हावं माणसानं?

हाच प्रश्न कैक पुतणीवर्गातील लोकांनाही इच्यारता येतोच, नै?

(आमचं सोडा हो, आम्ही अगोदरपासूनच ब्याडबॉय इ.इ. आहोत.)

पुतण्यांच काय आहे बॅटमॅन त्या कुत्र वगैरे म्हणवुन घेउ शकत नाहीत. तसच त्या कुणाची पाठही धरत नाहीत. समोर येउन कुणी सुनवुन जात असेल तर ऐकुन घेत नाहीत एव्हढच ना? अन बाकिच्या सोज्वळ कन्या रस्ता बदलतात असच ना?
मग त्या न्यायाने झाशीच्या राणीनेपण गप खाली मान घालुन राज्य सोडायच होतं. आधीच बाई जीला काहीच स्थान नाही, त्यात तिच्याच भाषेत सांगायच तर "रांडमुंड" (विधवा). तरीही तात्या टोपेंसारखी वयस्क, निर्भाड माणस तिची साथ देतात?
प्रश्न पडला पाहिजे तुला. त्या धाग्यावर ही चर्चा काढण्याजोग काय खुपलं तुला मला हेच समजल नाही.
एकत्र कुटुंब या धाग्यावर तुझाच तर प्रतिसाद होता, असल्या फॅमिलीत मुलींचे लय बेक्कार हाल होतात म्हणुन. त्यात मुलींचेच का म्हणावेसे वाटले तुला हा ही विचार कर. नुसते शब्दाला शब्द वाढवत नेण्याऐवजी लेखनसीमा अन खरच चुकलं असेल तर कबुली बर्‍याचदा वेळेवर सावरते.

मारकुटे's picture

6 Apr 2014 - 1:09 pm | मारकुटे

इतिहास माहीत नसला की असे प्रश्न पडतात. माफ केलं तुम्हाला... यावेळेस.

मुक्त विहारि's picture

2 Apr 2014 - 11:26 pm | मुक्त विहारि

लेख आवडला.

चित्रगुप्त's picture

6 Apr 2014 - 1:35 pm | चित्रगुप्त

छान लेख.

चिनार's picture

4 Feb 2015 - 10:08 am | चिनार

फारच मस्त !! मजा आ गया !

याच विषयावर मी लिहिलेल्या लेखाची लिंक देतो आहे .
http://www.misalpav.com/node/27462

वेल्लाभट's picture

4 Feb 2015 - 11:09 am | वेल्लाभट

" A day will come when technology will surpass humanity. And we will have generation of idiots!! “---- Albert Einstein

द डे इज हिअर ऑलरेडी

स्नेहन्कित's picture

4 Feb 2015 - 10:50 pm | स्नेहन्कित

मस्त ! मज्जा अलि.

चिनार's picture

16 Jun 2015 - 2:20 pm | चिनार

धन्यवाद !