तू आलीस त्याला सोडून
नमस्कार मंडळी,
आज परत फा......र दिवसांनी विडंबनाचा मूड जमून आलाय तो कितपत जमलाय हे तूम्हिच ठरवा. खालील विडंबनाचं मूळ श्री. वडापाव ह्यांच्या ह्या कवितेत आहे. सदर विडंबन श्री. वडापाव ह्यांची माफि मागुन.
प्रेमाचा त्रिकोण / एक फुल दो माली हि नेहमीच एखाद्यासाठि वेदनामय घटना. त्यातुन प्रेयसी आपल्या सख्ख्या मित्राची झाली तर अजूनच नैराश्य येतं. पण कालांतराने तीला मित्राच्या प्रेमातील फोलपणा जाणवतो आणि मग ती परत त्याच्याकडे येते........कायमचीच! आता पारड ह्याचं जड झालय!