(कॅन्टीन कॅन्टीन...)
प्रेरणेचा स्त्रोत : आमच्या मित्राचा हा लेख!
हाफिसच्या कॅन्टीनात मागच्याच आठवड्यात घडलेला एक किस्सा..
जेवता जेवता मध्येच एखाद्याने चमत्कारीक आवाज काढल्याने "तो मी नव्हेच" असे दाखवत इतरत्र बघत कसे तोंड लपवावे हे कळणार्या प्रसंगांपैकी एक प्रसंग..
दुपारचे जेवण सुरू होते..
माझ्या डब्यातील भाजी आणि आमच्या वडगाव बुद्रूकच्या हापिसातील एका दुसर्या सहकार्याची भाजी हि काही केल्या संपतच नव्हती...
आणि अचानक 'टुर्रर्रऽऽऽ' असा बारीकसा पण बर्यापैकी ऐकायला जाईलसा आवाज आमच्या टेबलावर झाला..