<ये दिल मांगे मिनिमल!>
रामराम मिपाकरहो,
साचा तयार होता. शब्द बदलले. बघा जमलंय का?
---------------------------------------------------------------------
जा ना घरी सत्तापिपासू नेत्या. जा..!
माझे करोडो नागरीक वाट बघतायत..
त्या खर्या लोकशाहीची जी वर काढेल मला हजारो समस्यांतून..
भिरकावून टाकेल आडवं येणारांना करारी निर्णयांनी
झेलेल आव्हानं अल्लद अनेक हातानी...
आणि मी म्हणेन तिला तूच बनून रहा सत्ताधीश आता...!
मी वाट बघते त्या लोकशाहीची, जी करेल मोकळे जनतेचे घुसमटलेले श्वास
आणि नेईल मला प्रगतीच्या उंच शिखरावर..