कविता/लिखाण हा आपला प्रांत नाहि. जी लोकं हे करतात त्यांच्याबद्द्ल आपल्याला प्रचंड आदर आहे. मिका कवी म्हणुन ग्रेट आहेतच त्यामुळे खालील विडंबन करुन त्याना दुखवावं किंवा त्यांची खील्ली उडवावी असा विचार अजीबात नाहि. फक्त हे उत्स्फुर्त सुचलं म्हणुन लिहलं. आधीच म्हटल्याप्रमाणे आस्मादिक कवी नसल्यामुळे कडव्यांमधे कदाचीत रिदम नसेल आणि दम तर त्याहुन नसेल :D म्हणुन गरज भासल्यास धागा जरुर उडवावा.
दुधाचं दहि बनायला
ताकाची गरज भासते
तसचं दह्याचं लोणी बनायला
रवीची (घुसळणी) गरज लागते
चांगल्या पाकृ/देखण्या फोटोंच कौतुक करायला शब्दांची गरज भासते
तसचं ते पाहुन जळजळ थांबवण्यासाथि ईनोची साथ लागते
स्वप्न पहायला निद्रेची गरज लागते आणि
ती सत्यात बघायला प्रयत्नांची गरज लागते
लेखांवर येणारे तिरकस प्रतीसाद पचवायची ताकद लागते
पण मिपाकर आपलेच आहेत हि भावना मनी बाळगावी लागते
दुर परदेशी आईच्या मायेची उब आठवते
डोळे भरुन आल्यावर तिच्या पदराची उणीव जाणवते
पाऊसात चिंब भीजायला हक्काची साथ लागते आणि
ती फक्त आपलीच आहे हि जाणिव मनात सुखावते
नॉनव्हेज वाल्यांसाठि व्हेज पर्यायांची गरज भासते
पण एका चांगल्या चवीला लोक मुकतात हि खंत वाटते
राग यायला 'मिपाबंद' हे कारण पुरेसे ठरते
पण चालु झाल्यावर ते कुठच्याकुठे पळते....
घाईच्या वेळि ट्रेन मधली गर्दि नकोशी वाटते
पण झटापटिनंतर मिळालेली ती चौथी सीट तो सगळा थकवा पळवते
जाता जाता....
हे विडंबन सुचायला सुद्धा मुळ कवितेचा आधार लागतो
पण मग जाणवतं अरे....मिकापुढे आपण किती फिके/थिटे पडतो....
आणि हे असचं चालु आहे म्हणुन जग सुंदर भासते, जगण्याची गोडि कळते....
प्रतिक्रिया
27 Jun 2013 - 3:14 pm | अक्षया
पाककॄती बरोबर ही कला पण अवगत आहे वाटतं. :)
27 Jun 2013 - 3:27 pm | अक्षया
कवितेचा ऐवजी विडंबन असे वाचावे.. :)
27 Jun 2013 - 4:42 pm | भाते
वा दिपकशेट,
आज एकदम पाककृती मधुन कविता/विडंबन भागात सिम्मोलंघन!
तुमच्या पाककृती छानच असतात हे वेगळे सांगायची गरज नाहीच आहे.
पण वरील विडंबनसुद्धा झक्कास.
27 Jun 2013 - 5:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बाकी सगळं छानच आहे, पण हे जरा अतिच झालयं
आणि हे तर फारचं झालं:
27 Jun 2013 - 5:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
पहिल्या प्रयत्नात रेसिपी छान जमलीय ! अभिनंदन.
स्वप्न पहायला निद्रेची गरज लागते आणि
ती सत्यात बघायला प्रयत्नांची शर्थ लागते.... हे कसं वाटत?
27 Jun 2013 - 5:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
पहिल्या प्रयत्नातच रेसिपी छान जमलीय ! अभिनंदन.
स्वप्न पहायला निद्रेची गरज लागते आणि
ती सत्यात बघायला प्रयत्नांची शर्थ लागते.... हे कसं वाटत?
27 Jun 2013 - 6:17 pm | पैसा
पण यावेळी फोटो कुठे आहे? :P
27 Jun 2013 - 6:25 pm | अनन्न्या
मस्त जमलीय कविता, तरी पाकृ. इतकी नाही!
27 Jun 2013 - 7:17 pm | किसन शिंदे
व्वा!! आता जनातलं मध्ये एखादा लेख येऊ द्या तुमच्याकडून.