गणपती गेले (एकदाचे) गावाला !
गणेशोत्सव संपला न भो एकदाचा. व्हय असंच म्हणायची यळ व्हो
पुणेकरांना याचा लै च राग येईन. पन तेचं काय मी मनाव घेत न्हाय.
पन आज कसं सकाळ सकाळ शांत वाटतय.
गेले धा दिस लई जाम झालं व्हत.
या धा दिसात आमच्छ्या मंडळानी लई कामं केले.
लोकांकडून लई पावत्या फाडल्या. पुण्याचे लोक लई डेंजर बरका… पैशे देताच न्हाईत.
(महाराष्ट्र ब्यांक कॉलनी मध्ये पैसा माघायची टाप न्हाय आमची)
पन केले जमा २ एक लाख. हा पन खर्च पन केला बरका.
काल संध्याकाळ पासून राती २ वाजेपथूर एक ढोल ताशा पथक अन्ह्ल. तेन्ल्हाच अर्धा लाख गेले.
नेक्ष्ट इअर साठी पैशे नको का ? मंग त्यासाठी पंचवीस हज्जार ब्यांकेत ठीवायचे अस ठरल.
संपला हिशोब …
(कोनतरी म्हनलं बाकी २५ च काय? म्हनलं कमी नको पडायला, आपनंच ढिले २५ रुपै, पावती पण नाय घेतली)
निवडणुका आल्यात…. चालायचचं
बाकी लई छान झालं सम्द. नेक्ष्ट इयरला बाप्पाला सोताच्या स्कार्पिऊ मधून न्हेणार आपन असं ठरलंय.
प्रतिक्रिया
9 Sep 2014 - 8:24 am | इनिगोय
थांबा जरा.
नवरात्र येतंय.
9 Sep 2014 - 8:45 am | सवंगडी
नवरात्री वर बंदी आली न राव … मागच्या तोरनाच्या मिरवणुकीत मारामाऱ्या केल्या पोट्ट्यांनी.
… अन तेव्हा टाईम नसल.आचार संहिता ( इंग्रजीत इमर्जन्शी ) लागायची हाय उद्या पासून.
9 Sep 2014 - 9:01 am | डांबरट
तुमचे लेखन पाहून वाटते, तुम्ही पुण्याचे नाही. तसेच आम्हा पुणेकरांना घाबरता हे पण बरे झाले.
अन्यथा तुमचेही विसर्जन झाले असते. आणि हो ते महाराष्ट्र बँकेबद्दल आणि त्यांच्या सेवाभावी स्टाफ बद्दल काही बोलू नये.
ते आपणास पैसे देण्यास बांधील नाहीत. पाहिजे असल्यास तुमच्या विंचू गाडीला (तुमच्या स्कोर्पिओ ला ) लोन मिळेल.
9 Sep 2014 - 8:30 pm | सवंगडी
पुण्यात डांबरट लोक पण हायेत हे नक्की झाले.
9 Sep 2014 - 9:23 am | पेट थेरपी
सहमत. डोके उठले होते आवाजाने. विंचू गाडी आवडले. आज सकाळी सुद्धा टीव्हीवर पहिल्या पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन हीच बातमी.
9 Sep 2014 - 6:27 pm | प्रसाद१९७१
सुटका झाली. आता माझा वर्षातला सर्वात आवडता पंधरवडा येणार. ना कोणाकडे बारसे, ना मुंजी, लग्ने. मिरवणुक नाही, डॉल्बी नाही. सगळीकडे कशी शांतता.
9 Sep 2014 - 7:08 pm | पैसा
इतकं थोडक्यात का लिहिलय भौ? तो बिचारा बाप्पा कंटाळून गेला असेल. केव्हा एकदा घरी जातो असं झालं असणार त्याला.
9 Sep 2014 - 8:29 pm | सवंगडी
पैसा, अहो पोटापान्याच पन बघव लागतंय.
जगाचा न्याय हाये ,"जोवरी पैसा तोवरी बैसा"!
आनी पहिल्यांदीच असं लिव्हल. म्हन्ल आवडतंय नाय आवडत.
पन तुमच्या म्हणण्याने बर वाटलं.
9 Sep 2014 - 8:35 pm | तिमा
मुरलेला गडी अन डु आयडी
9 Sep 2014 - 9:50 pm | सवंगडी
आव्ह जे काय आसल ते आसल जाळायचे काम नाही… !
तसाही इथे कोन खरे (तीमा)तीर मारणारे आय डी बाळगून हायेत?
लैच त्रास व्हत आसल तर admin साहेब हायेत त्यांना इचारा की.
9 Sep 2014 - 10:23 pm | सूड
काल लैच नाचल्यालं दिसताय !!
9 Sep 2014 - 10:56 pm | सवंगडी
का घेता हो सूड ?
नाचलो नाय व्हो. पण फ्लेक्स वर नाव अन फोटू यायचा म्हंजी कायतरी करायला लागतच.
अन कोरडा दिस व्हता. आज श्रम परिहार का काय म्हणत्यात तो झाला.
9 Sep 2014 - 10:32 pm | मुक्त विहारि
जावू द्या.....
9 Sep 2014 - 11:01 pm | सवंगडी
आम्ही काय धरून बसलो नाय. हे असं चालतच असतंय बगा.
दूध देणारी गाय पन गाढवागत लाथ देतीच की,म्हणून काय राग धरायचा?