कोणीतरी बाजूला सरकले असेल......
घरातील चार मुले चार दिशांना पांगतात. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळतो. मग बागेत नको असणारे तण पुरुषभर उंच वाढू लागते. नको त्या कुठल्या कुठल्या जाडजूड वेली मोठमोठ्या झाडांना विळखा घालू लागतात. बाग गुदमरते. घर आकसू लागते. माईंचे वय झालेले, उमेद संपलेली. पण नवऱ्याची अहोरात्र सेवा, त्यात खंड नाही. अशात लाडली नावाची मांजरी घरात येते, जीव लागतो. ती गर्भार मांजरी एके दिवशी नाहीशी होते. तिला शोधशोधून माई थकतात. त्याच रात्री नवर्याचा जीव जातो. सभोवती कुट्ट काळोख. त्या काळी इतकी संपर्कसाधने नव्हती. जवळ दुसरे माणूस नाही.