संक्रांतीला कल्पकतेचं वाण
उत्तरायणची सुरुवात झाली की, हळदी-कुंकू समारंभाची लगबग सुरु होते. हळदी कुंकूवाची परंपरा जुनी असली तर त्याचं महत्व आजही तितकचं टिकून आहे. हळदी कुंकू लावून तिळगूळच्या लाडवासोबत वाण देण्याची प्रथा अजूनही कायम आहे. हळदी-कुंकु कार्यक्रमाचे धार्मिक महत्व किती ते माहित नाही. पण असे कार्यक्रम सर्वांनाच आवडतात. सर्व महिला मस्तपैकी नटुन-सजुन येतात, गोड गोड गप्पा मारतात, नविन ओळखी होतात, एकाच कॉम्प्लेक्समध्ये असुनदेखील कधी न बघितलेल्या महिला एकमेकींना भेटतात.