विहीर खोदण्याचा विचार
विहीर खोदण्याचा विचार...
डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला
हसण्यातील सच्चेपणा संपू लागला
तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले....
जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा
पाण्याची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा
उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे
दुष्काळात विहीर खणू नये
जमिनीला कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये