डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल - भाग 4

Primary tabs

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
15 Jul 2019 - 11:20 am

भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619

भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807

भाग 3 - https://www.misalpav.com/node/44821

सुपरनॅचरल मालिकेचे काही एपिसोड खूप विनोदीसुद्धा आहेत.... आणि खरं म्हणजे भीती वाटण्यासारखी नाहीये मालिका ... पात्रांचे आपापसातले संबंध ह्या गोष्टीवर जास्त जोर दिला आहे .. दोन भावांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी , प्रेम हे जास्त हायलाईट केलं आहे ... भयपटांमध्ये बऱ्याच वेळा नुसतं दचकावून वगैरे घाबरवण्याच्या तंत्राचा वापर केलेला असतो .. कॅरॅक्टर डेव्हलपमेंटला त्यात फारसं महत्व नसतं .

या सिरिअल मधली अनेक पात्रं प्रेक्षकांच्या अगदी आवडीची बनून जातात .... उदाहरण म्हणजे बॉबी हे पात्र - बॉबी हा हंटर दाखवला आहे , बॉबीला स्वतःची मुलं नाहीत , पत्नी मरण पावली आहे .. जॉनची हंटिंगच्या निमित्ताने बॉबीशी ओळख आणि मैत्री होते ... जॉन ज्या पद्धतीने मुलांना वाढवत असतो कडक मिलीटरी शिस्तीत, सतत ट्रेनिंग ते बॉबीला पसंत नसतं .. जेव्हा जेव्हा जॉन मुलांना बॉबीकडे सोडून हंटिंगला जात असे तेव्हा बॉबी त्यांना लहान मुलासारखं खेळता , मजामस्ती करता येईल याकडे लक्ष देत असे . दोघे मोठे होऊन स्वतः हंटर्स झाल्यावरही बॉबीशी असलेली त्यांची मैत्री टिकून राहिली .. त्यांच्यावर तो स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करतो ..... बॉबी हंटिंगसाठी लागणाऱ्या माहितीचा एक्स्पर्ट आहे , त्याची अनेक हंटर्सना आणि सॅम आणि डीन यांनाही अनेकदा मदत होते ... जॉनच्या कडक स्वभावाच्या तुलनेत काहीसं सॉफ्ट केअरिंग कॅरॅक्टर दाखवलं आहे . जॉन आणि त्याच्या मुलांमधले वाद , त्याचा दृष्टीकोन , त्याचा हुकूम गाजवण्याचा स्वभाव , सॅम मोठा झाल्यावर त्याने जॉनला झुगारून घराबाहेर पडणं , डीनची त्या दोघांच्या मध्ये होणारी घालमेल ... एकीकडे वडिलांचा प्रत्येक शब्द ऐकायचा हे त्याच्या रक्तात भिनलेलं आहे दुसरीकडे भावाला गमवावं लागण्याचं दुःख आहे , काही करून तिघांचं लहानसं कुटुंब परत एकत्र आणायची त्याची इच्छा आहे पण लहान भाऊ आणि वडील यांच्यात सतत खटके उडतात त्यात मध्यस्थी करताना त्याचा जीव मेटाकुटीला येतो ...

पुढे जॉनने त्याची माफी मागताना दिलेलं स्पष्टीकरण - की तुमच्या आईच्या मृत्यूनंतर तुम्हाला सुरक्षित ठेवणं , स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम बनवणं हे माझं उद्दिष्ट बनलं , ते साध्य करत असताना मी तुमचा ड्रिलमास्तर बनत गेलो आणि वडील बनण्यात कुठेतरी कमी पडलो .....

असे खूप इमोशनल प्रसंग , गुंतागूंंती दाखवल्या आहेत ... ते बघताना रंगून जायला होतं . उदाहरणार्थ -

हंटिंग साठी जाताना कुठे कशासाठी जात आहोत याचं कारण न सांगता जॉन सॅम आणि डीन यांना एके ठिकाणी ड्राइव्ह करायला सांगतो . कुठे , कशासाठी जात आहोत असे प्रश्न विचारायची डीनला गरज वाटत नाही , डॅड आवश्यक ती माहिती योग्य त्या वेळी सांगणारच हे त्याला माहित आहे .... पण सॅमला राग येतो , की पार्टनरसारखं न वागवता जॉन अजूनही आपल्याशी बरोबरीच्या नात्याने माहिती शेअर करत नाही , आपलं मत विचारात घ्यायची तसदी घेत नाही ... हुकूम सोडतो ... दोघांत खटका उडतो . म्हणूनच मी घर सोडून गेलो असं सॅम म्हणतो तर आम्हाला तुझी गरज असताना तू सोडून गेलास ( इतका तू स्वार्थी आणि बेजबाबदार आहेस ) असा आरोप जॉन करतो , यावर उसळून - घरातून बाहेर गेल्यावर परत येऊ नकोस , तुझा आमचा संबध संपला असं जॉनने म्हटल्याची आठवण सॅम करून देतो . डीन कसंतरी त्यांना शांत करतो आणि सगळे पुढच्या कामासाठी निघतात .

https://youtu.be/T1aSCXK_lF4

त्याच दिवशी संध्याकाळी डीन एक काम करायला गेलेला असतो , जॉन आणि सॅम त्याची वाट पाहत असतात ... तेव्हा जॉन सॅमला सांगतो , ज्यावेळी त्याचा जन्म झाला तेव्हापासून प्रत्येक महिन्याला 100 डॉलर्स काढून त्याच्या नावाने अकाउंट मध्ये ठेवले .. डीन साठी सुद्धा तसंच - दोघांच्या शिक्षणासाठी म्हणून .... हे मेरीचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे सॅम सहा महिन्यांचा होईपर्यंत .... म्हणजे तो सांगू इच्छितो की हे हंटिंगचं आयुष्य त्याला आपल्या मुलांसाठी अपेक्षिलेलं नव्हतं ... पण मेरीच्या मृत्यूनंतर त्याचा बदला घेणं आणि मुलांना सुरक्षित ठेवणं या विचाराने तो एवढा झपाटून गेला की त्यांना काय हवं आहे याचा विचार करणं बंद झालं ... तू जेव्हा कॉलेजला जायचं म्हणालास तेव्हा माझ्या डोक्यात आधी हा विचार आला की तिकडे तू एकटा असणार , असुरक्षित , काही झालं तर वाचवायला आम्ही नसणार म्हणून मी विरोध केला .... तुझी स्वप्नं - आकांक्षा यांचा मी विचारच करत नव्हतो .... तू माझ्यापेक्षा वेगळा आहेस हे मी समजून घेऊ शकलो नाही ... सॅम म्हणतो मी वेगळा नाही , माझी प्रेयसीही त्यांनी आईला मारलं तशीच मारली .. मी तुम्हाला समजू शकतो ... मग मस्करीत त्या कॉलेजसाठी ठेवलेल्या फंडचं काय झालं म्हणून विचारतो , त्यावर जॉन ते पैसे बंदुका , गोळ्या आणि इतर शस्त्रांवर खर्च होऊन गेले म्हणून सांगतो आणि दोघे हसू लागतात ... तेवढ्यात डीन येतो आणि मगाशी भांडण झालेलं असून आता दोघे हसत आहेत हे बघून आश्चर्यचकित होतो पण दाखवत नाही .

https://youtu.be/LEoLDiPtYJw

जॉनच्या मृत्यूनंतर यलो आईड डेमन म्हणजे अझाझेल याला शोधून संपवण्यासाठी सॅम आणि डीन अथक प्रयत्न करतात ... त्या शोधत अझाझेलने त्यांच्या आईला , जॉनच्या बायकोला - मेरीला आणि सॅमच्या प्रेयसीला - जेसीकाला का मारलं त्याचं कारणही समोर येतं .

अझाझेल हा लुसीफर म्हणजे डेव्हिल / सैतानाचा सेवक असतो . बायबलप्रमाणे लुसीफर या देवाचा सर्वात लाडका मोठा मुलगा होता .. एंजल होता . पण त्यानंतर देवाने मनुष्यजात निर्माण केली आणि सगळ्या एंजल्सना मनुष्यजातीचं कल्याण / सेवा करण्याची जबाबदारी सोपवली . हे लुसीफरला सहन झालं नाही .. अशा दुर्बळ जातीची सेवा करण्याइतकी त्या जातीची लायकी नाही असं त्याचं मत होतं आणि देवापुढे ते सिद्ध करण्यासाठी त्याने लोभ , तिरस्कार , द्वेष आदी वाईट भावनांचं बीज मानवी समाजात रोपण केलं . देवाने स्वर्गाचे दरवाजे त्याच्यासाठी बंद केले आणि त्याची रवानगी हेल / नरकात केली . पण द्वेषादी भावनांची कीड रुजायची ती रुजलीच होतं .....

या मालिकेत दाखवलं आहे की देवाने लुसीफरला नरकाच्या एका भागात एका तुरुंगात / केजमध्ये बंद केलं .... केज मध्ये बंद करण्यापूर्वी लुसीफरने लिलीथ ही पहिली डेमन आणि नंतर चार प्रिन्स ऑफ हेल हे पिवळ्या डोळ्यांचे शक्तिशाली डेमन्स बनवले होते .... त्यांनी पुढे हेलमध्ये डेमन्सची संख्या वाढवली .

लुसीफरला केजमधून बाहेर काढणं हे अझाझेलचं जीवनध्येय आहे ... आणि तो सुटणं म्हणजे मानवजातीचा अंत होण्यासारखंच आहे ...

या केजची सील्स आहेत .. सील म्हणजे कुलूपं नाहीत तर घटना ... अशा एकूण 6000 घटना सील म्हणून होत्या पण त्यातल्या 66 घडल्या की केजमधून लुसीफर मोकळा होणार आणि पृथ्वीवर विध्वंसाला सुरुवात करणार ... 6000 घटना असल्यामुळे डेमन्स नक्की कुठल्या 66 घडवून आणणार हे समजणं आणि त्या रोखणं एंजल्सना कठीण जाणार होतं .

त्यातली पहिली घटना म्हणजे नीतिमान माणसाने नरकात रक्त सांडलं पाहिजे ... म्हणजे खऱ्या निःस्वार्थी , चारित्र्यवान नीतीमान माणसाने नरकात जे आत्म्यांचं टॉर्चर केलं जातं त्यात भाग घेतला पाहिजे . ही घटना सील्स तुटण्याची साखळी सुरू करेल ... म्हणजे ही घटना घडल्यावर बाकीच्या घटना घडल्या तरच ती सील्स असतील . पण असा माणूस आजवर नरकात गेलेलाच नाही . त्यामुळे डेमन्सना पुढच्या घटना घडवण्याची संधी मिळालेली नाही . जेव्हा जॉनचा आत्मा डीनला वाचवण्यासाठी केलेल्या डीलमुळे नरकाच्या अधिकारक्षेत्रात येतो तेव्हा त्याला नरकात टॉर्चर करायला लावून पहिलं सील तोडण्याचा प्रयत्न केला जातो ... म्हणजे तुझं टॉर्चर आम्ही थांबवू पण अट अशी की तू आमच्यासारखं इथे आलेल्या आत्म्यांचं टॉर्चर केलं पाहिजेस .... पण जॉन नकार देतो ... असह्य वेदना सहन करत राहतो पण स्वतः दुसऱ्या आत्म्यांचं टॉर्चर करण्यास नकार देतो . पृथ्वीवरचं एक वर्ष म्हणजे नरकातली 40 वर्षं ... जॉन जवळजवळ अडीच वर्षं म्हणजे नरकातील कालगणनेप्रमाणे 100 वर्षं असह्य टॉर्चर सहन करतो पण स्वतःच्या हातात शस्त्र घेऊन दुसऱ्याचं टॉर्चर करण्यास तयार होत नाही .... त्यामुळे पहिलं सील तुटत नाही .

अझाझेलचा दुसरा हेतू हा की लुसीफर बाहेर आल्यावर त्याला धारण करण्यासाठी माणसाचं शरीर पाहिजे .... त्यासाठी अझाझेल काही विशेष कौशल्य असलेले , काही वंश - घराण्यांतील जोडपी निवडतो आणि त्यांचं मूल सहा महिने वयाचं असताना आपल्या रक्ताचे काही थेंब त्या बाळाला भरवतो ... अझाझेल हा अतिशय शक्तिशाली डेमन्स पैकी एक आहे ... त्याच्या रक्तामुळे त्या प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र शक्ती मिळते ... जी सुप्तावस्थेत राहते आणि एक ठराविक वय झाल्यावर उदा 21 वर्षे ती जागृत होते .... कोणाला टेलीकायनेसीस , कुणाला भविष्यात घडणाऱ्या घटनांची झलक दिसण्याची शक्ती , कुणाच्या शारीरिक शक्तीत अचानक प्रचंड वाढ , कुणाचा स्पर्श विजेचा करंट देऊ लागतो , कुणाच्या नुसत्या स्पर्शाने व्यक्ती मरण पावणे तर कुणाला दुसऱ्या लोकांचा माईंड कंट्रोल .....

अझाझेलचा मनसुबा आहे की या विशेष शक्ती असलेल्या मुलांना एकमेकांशी लढायला लावून जो त्यातून वाचेल तो लुसीफरला शरीर देण्याइतका सक्षम असेल .... सामान्य माणसांच्या शरीरात लुसीफर फार काळ वास करू शकणार नाही , त्याच्या शक्तीने लवकरच ते शरीर जळून निकामी होईल ....

सॅम हा अझाझेलने निवडलेल्या मुलांपैकी एक होता . अझाझेल त्याच्या खोलीत आला असताना मेरी तिथे आली आणि तिची पर्वा न करता तिला त्याने ठार मारलं . आणि सॅमच्या प्रेयसीला मारण्याचं कारण म्हणजे सॅम तिच्याशी लग्न करून सेटल होण्याच्या विचारात होता पण अझाझेल सॅमने सेटल व्हायला नको होतं , त्याने सूडाच्या इच्छेने हंटर व्हावं , अशा कुशल हंटरचं कसलेलं शरीर लुसीफरला सामावून घेण्यास अधिक सक्षम असेल , लुसीफरला शरीर देण्यासाठी बाकीच्या मुलांपैकी सॅमचं अधिक सुयोग्य आहे असा त्याचा कयास होता ..

यातल्या काही मुलांना एकत्र आणून अझाझेल त्यांना एकमेकांविरुद्ध लढायला भाग पाडतो ... सॅम सुरुवातीला आपल्याला आपसात लढायची गरज नाही उलट आपण एकत्र येऊन इथून सुटका करून घेऊ शकतो हे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो पण त्यांच्यापैकी काही विश्वासघाताने एकमेकांना मारतात आणि सॅमला प्रतिकाराशिवाय मार्ग उरत नाही ...

तोवर डीन त्याचा शोध घेत तिथवर पोहोचलेला असतो . त्याच्यासोबत बॉबीही असतो .

शेवटच्या निर्णायक लढाईत वाचलेल्या प्रतिस्पर्ध्याशी सॅम लढतो आणि त्याला मारणं शक्य असताना जीवदान देतो ... कारण डेमनने त्याला नाईलाजाने लढायला भाग पाडलं आहे तर मारू नये , सोडून द्यावं म्हणून . पण त्याची पाठ वळून तो डीनला भेटायला जात असतानाच प्रतिस्पर्धी त्याच्या पाठीत सुरा खुपसतो ...

https://youtu.be/42U6r2y3EVc

डीन सॅमच्या शरीरावर अंत्यसंस्कार करायला बॉबीला नकार देतो .. बॉबीला चालता हो म्हणून सांगतो . त्यानंतर सॅमच्या मृतदेहाशी बोलतो ... हा पूर्ण मालिकेतला सगळ्यात इमोशनल सिन आहे . तो सॅमला विचारतो - तू लहानपणी प्रश्न विचारायचास , डॅडी कुठे जातात , काय काम करतात ? मी मनात म्हणायचो , कृपा करून हे प्रश्न विचारू नकोस , असाच अज्ञानात राहा , अजून थोडा काळ तू लहानच राहावास एवढीच माझी इच्छा होती ... ( म्हणजे वॅम्पायर , भुतं , वेअरवुल्वज आणि असंख्य भयानक गोष्टी खऱ्या अस्तित्वात आहेत आणि वडील त्यांना मारण्याच्या असुरक्षित कामावर जातात हे कळून सॅमला असुरक्षित वाटायला लागू नये , अजून काही काळ तरी त्याने लहान मुलाचं चिंताविरहीत आयुष्य जगावं ) , लहानपणापासून तुझी काळजी घे ही एकच गोष्ट वडलांनी माझ्या डोक्यात ड्रिल केली ... खरं तर त्यांना सांगण्याची गरजच नव्हती ... तुझी काळजी घेणं हे माझी नैसर्गिक उर्मीच / इन्स्टिक्टच होती ... आणि आता असं झालं आहे की एक काम - फक्त एक काम करायचं होतं नीट आयुष्यात , तुला सुरक्षित ठेवायचं ... आणि तेच करण्यात मी अपयशी ठरलो .. आता मी काय करणं अपेक्षित आहे ?

https://youtu.be/10xJ7Suhm_o

डीन तिथून निघून क्रॉसरोड्स वर येतो ... सॅम जिवंत होणे आणि आपल्याला 10 वर्षं मिळावी असं डील होईल ह्या अपेक्षेने डेमनला आवाहन करतो . ती येते ; तिला अर्थातच सॅमच्या मृत्यूबद्दल माहीत असतं आणि हेही माहीत असतं की 10 वर्षं दिली नाही तरी कोणत्याही परिस्थितीत डीन डील करण्याएवढा डेस्परेट झालेला आहे .... तसंच होतं .. डीनला फक्त एक वर्ष मिळतं ... इकडे डीन करार करतो आणि तिकडे मृत सॅम पुनर्जीवित होतो .

https://youtu.be/w_qN8x2vQUQ

डीन सॅमला सांगतो की बॉबीने मलमपट्टी केली तुला , फार काही सिरियस नव्हती जखम ... त्याला घेऊन डीन बॉबीला भेटायला जातो . बॉबी समजतो की डीनने डील केलं आहे . त्याला बाहेर नेऊन विचारतो की किती वेळ दिला आहे तुला ? डीन सांगतो एक वर्ष . बॉबी त्याची खरडपट्टी काढण्याचा प्रयत्न करतो पण डीन सांगतो की सॅमला मरू देणं माझ्याच्याने शक्य नव्हतं , तो माझा भाऊ आहे .... बॉबी विचारतो , तुझ्या भावाला कसं वाटणार आहे जेव्हा त्याला समजेल की त्याला वाचवण्यासाठी तू एक वर्षाने नरकात जाणार आहेस ? तुझ्या वडलांनी तुझ्यासाठी हे डील केलं तेव्हा तुला कसं वाटलं ? डीन सांगतो , तू मला मार वाटल्यास पण त्याला काही सांगणार नाहीस असं वचन दे .... पण सॅम समजायचं ते समजतोच ... डीनला या डील मधून बाहेर काढायचं , त्याला नरकात जाऊ द्यायचं नाही असा निश्चय सॅम करतो .

https://youtu.be/VA2WP4Tmzgc

मांडणीनाट्यप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

17 Jul 2019 - 2:28 am | जॉनविक्क

जाहिरात जास्त वाटली, पण ठिकय.

रसग्रहण नाहीच आहे ... गेम ऑफ थ्रोन्स किंवा हॅरी पॉटर कुठलेच लेख रसग्रहण म्हणून लिहिलेले नव्हते किंवा चांगलं लिहिलं आहे अशा रिमार्कसाठीही लिहिलेले नव्हते ... ते वाचून कुणालातरी ती मालिका पाहण्याची / पुस्तक वाचण्याची / चित्रपट पाहण्याची इच्छा व्हावी आणि त्यांनापण मला त्या त्या गोष्टींतून जो आनंद मिळाला तो मिळावा या हेतूने लिहिले आहेत .. कुणी ह्या मालिका पाहिल्या तर मला वैयक्तिक फायदा असा काही नसणार आहे ... तरीही आपल्याला आवडलेल्या गोष्टी आपण मित्रमंडळींंना सुचवतोच ना - आणि त्यांनी ते पाहून / वाचून "आवडलं बरं का " असं सांगितल्यावर क्षणभर खुश होतो जणू काही आपणच ती कलाकृती घडवली आहे ... तोच आनंद मला मिळतो जेव्हा मी पाहिलेल्या आणि इतरांना सुचवलेल्या मालिका / पुस्तकं आवडल्याचं ते सांगतात तेव्हा...

तेव्हा स्वार्थ असेल किंवा थोडासा अहम् ही सुखावत असेल ... नक्की माहीत नाही .... ज्या काही कारणासाठी लोक आपल्याला आवडलेल्या गोष्टी इतरांना सुचवतात ते ... त्यासाठी जाहिरात केल्यासारखं लिखाण झालेलं असू शकतं ... जवळच्या मित्रमैत्रिणींना एवढा एक एपिसोड / सीन बघच अशी गळ घालता येते , त्या सीनची बॅकग्राऊंड स्टोरी न सांगता पण इथे तसं करता येत नाही ... कनविन्स करायचं तर सविस्तर सांगितल्यावर कदाचित एखाद्याला इंटरेस्ट वाटणार असतो .

जॉनविक्क's picture

17 Jul 2019 - 3:57 pm | जॉनविक्क

बापरे, एव्हड मोठं स्पष्टीकरण ? हाडाच्या तत्वज्ञानी आहात तुम्ही असे मी नक्कीच म्हणेन. असो आपल्याशी संवाद साधला गेला याचा आंनद आहेच _/\_

विनिता००२'s picture

17 Jul 2019 - 2:04 pm | विनिता००२

लुसीफरची कथा वाचून हस्तर आठवला :)

शशिकांत ओक's picture

9 Sep 2019 - 11:51 pm | शशिकांत ओक

आपले लंबे चौडे लेखन पाहून निशा आली...!
इथे एक एक ओळ लिहायला कटकट वाटते...
छान आपल्या टंकणकलेला दाद दिली पाहिजे...
...
सुपरनॅचरल या विषयावरील फँटसी लेखमाला वाचून वाटले की आपणास प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे नाव नक्कीच माहिती असेल. नसेल तर त्यांचे सुपरनॅचरल विषयावरील लेखन जरूर वाचा... भानामती हे त्यांचे स्पेशलायझेशन आहे...!