तोळा तोळा
ओठांवरचे शब्द बोलके
पापण्यांचे खेळ ते बालिश
तुझ्या मिठितले श्वास जिवंत
स्पंदनातुनहि बरसतो आशीष...
ओठांवरचे शब्द बोलके
पापण्यांचे खेळ ते बालिश
तुझ्या मिठितले श्वास जिवंत
स्पंदनातुनहि बरसतो आशीष...
विसरलेल्या आठवणी वा नकळत निसटून गेल्या क्षणांचा मोह कधी परतून एकांतात एखादा विराग सूर छेडून मनाला वाऱ्याबरोबर हलके करेल वा एखाद्या ओल्या कापसाच्या ओझ्याप्रमाणे भारी करेल हे सहसा सामान्य बुद्धीच्या पालिकडे! कदाचित काळाला खुणगाठ बांधता आली असती वा एखादा क्षण मोरपिसाप्रमाणे वा त्या पिंपळाच्या पानाप्रमाणे जीवनाच्या पुस्तकात राखता आला असता तर नक्कीच सुखकर झाले असते.
गावात गेलो की नारायण पेठेतल्या दामले काकांची भेट ठरलेली. दोन दिवसांपूर्वी गेलो तेव्हाही त्यांच्या घरी गेलो. पण त्यांच्याशी बोलणे मात्र शक्य झाले नाही कारण आम्ही बोलायला लागलो की मागून डॉल्बीचा मोठ-मोठ्याने आवाज यायचा.
शेवटी दामले काकांनी मला खुणेनीच बाहेर जाऊया असे म्हटले म्हणून मी दारात जाऊन थांबलो.
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
अस्वीकृती (Disclaimer) 1: या लेखातील काही भाग याअगोदर माझ्या फेसबुक भिंतीवर इंग्रजीत खरडलेला आहे.
अस्वीकृती 2: मी कायदा, मानवाधिकार, कामगार हक्क, लिंगसमानता, राज्यघटना यापैकी कोणत्याही विषयाचा अभ्यासक वा तज्ञ नाही.
अस्वीकृती 3: हा लेख केवळ एक वाचिक विचारच्छल (Loud thinking) म्हणून वाचावा. यातील सर्व मते ही माझीच आहेत, परंतु त्या दगडावरील रेघा नव्हे. सबळ तार्किक प्रतिवाद झाल्यास मी माझी मते प्रांजळपणे बदलतो.
काही महिन्यांपूर्वी आमच्या एका मित्राने दहावीच्या मुलांसाठी करियर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली. मित्राने माध्यमांशी संपर्क साधला आणि सांगितले की आपण येऊन आमचा कार्यक्रम कव्हर करा. पण टीव्हीवाल्यांनी त्याबाबत उत्साह दाखवला नाही. त्यांचे म्हणणे, अशा कार्यक्रमांमधे कुठलाही व्हिज्युअल कंटेंट मिळत नाही. म्हणजेच कॅमेराने टिपावे अशी कुठली गोष्ट सापडत नाही. दुसरा अर्थ कॅमेरा जे टिपेल तेवढेच आम्ही बातमी म्हणून दाखवतो. कार्यक्रमामधे बसून तो समजावून घेऊन, त्याची बातमी लिहीणे जमत नाही.
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या !
चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी....
लिपीबिपीचे बंधन नाही
व्याकरणबिकरण... हे काय असते?
आम्ही बोलतो अनंत बोलीतून ....
कुजबुज जितकी थरथरणारी
तितके भांडण कडकडणारे
कठोरतेचा शीण आम्हाला
मवाळतेचा शाप तसाही
पण बोली आमची जपून ठेवतो....
अर्थाचा पण अनर्थ करू....
खिल्ली तुमची सहज उडवू
निरर्थाला अर्थ देऊ...
पण तुटका संसार नेटका करू....
बंगाली बाबा
रोज पेपरात, लोकलट्रेनमधे अशा बंगाली बाबूंच्या कडून वशीकरण आणि मुठ मारणे वगैरे हातखंडे वापरून जनतेला त्यांच्या वैयक्तिक कटकटी, शारीरिक समस्या, सहजासहजी सोडवायची हमी देणार्या छोट्या मोठ्या जाहिराती वाचून आपण सोडून देतो. काहीजण त्यांच्याकडे जाऊन समस्त समस्यांवर तोडगे, तोटके यांवर अवलंबून त्यांच्या आधीन होतात. त्यांना खरोखरच त्या उपायांनी हवा तो परिणाम साधला आला कि नाही याची शहानिशा करता येत नाही...
अशी कामे भरपूर वेळ आणि पैसे खर्च करायला लावणारी असतात हे ओघाने आलेच. असो.
भर दुपारी उन्हाच्या झळया खात एकाच लाइनीत जवळ्जवळ आम्हि ६ जनी बसलो होतो . गावाला एकतर बसण्याची सोय नसते . रस्त्याच्या कडेला येणार्या जाणार्यांकडे बघत बसावच लागतं . पर्याय नसतो . माझ्या शेजारी माझी वहिनी तिच्या बाजुला काकु आणि तिच्या शेजारी तिचीच मावस बहिन . तिने तर दर दोन मिनिटाला पूढे सरकुन सरकुन पार रस्ता गाठत आणला , तरी आम्हि त्याच जागी . अवघडुन गेलो होतो पार , पण काकु काहि केल्या जागची हलेना , एकाच जागी बसुन ढिगारेच्या ढिगारे बनवले तिने . समोर शाडुची माती होती ना , मग काय बसल्या बसल्या टाइमपासच कि .
जी माणसे कुठल्याच
डिजीटल प्रोफाईल मध्ये
नसतात,
त्यांचे जगणे कसे असेल,
हा प्रश्न मला
छळू लागला,
आणि मला माझ्या डिजीटल
विचारांची भिती वाटू लागली...
जी माणसे ऑफलाईन असतात
त्यांचे लाईफ कसे असेल
या प्रश्नाने मला परेशान केले
आणि मला माझ्या
डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली...
बदमाश अँथनी स्मिथ भाग ३.
सुरतच्या बदसूरतीची कहाणी