(दाराआडचा कुत्रा)
Amachee preraNA
एक कुत्रा दाराआडुन बघतो आहे बाहेर
किती बाहेर?
स्वतःच्या बाहेर , कुंपणाच्या पार
तिथे एक मांजर बसली आहे स्तब्ध, करत असेल ती कसला विचार?
सकाळी चोरुन प्यायलेल्या दुधाचा, पाठीत बसलेल्या रट्ट्याचा,
की रात्री भेटलेल्या बोक्याचा?
साखळी बांधलेला कुत्रा बाहेर येउ शकत नाही
मग तो अस्वस्थपणे भुंकुन त्याचे अस्तित्व बाहेर कळवतो
ते ऐकुनही मांजर शांतपणे बसुन राहते,
डोळे मिटुन बसुनच राहते