ऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..
एक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे.
एक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे.
डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची? ह्या संबंधीच चर्चा केल्यास उत्तम.
पुढील भागा पासून आंबा शेती, काजू शेती, आवळा शेती, मत्स्य शेती, मधमाशा पालन असे विषयवार लेख घेवू या.जेणेकरून इतरांना विषयवार लेख शोधायला अडचण येणार नाही.
=====================================
थोडे स्वतः विषयी.
मी मारून मुटकून इंजिनियर झालेलो.म्हणजे ३ वर्षाचा डिप्लोमा करायला ९ वर्षे घेतलेला.(१९८१ ते १९९०)सुदैवाने डिप्लोमा झाल्यावर नौकर्या मिळत गेल्या आणि जसा-जसा अनुभव मिळत गेला तसा-तसा पगार पण वाढत गेला.
नमस्कार,
गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच.
मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो.
सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे. (किंबहूना मला माझ्या शेतीचे आर्थिक नियोजन करतांना ह्यांच्या लेखांचा खूप फायदा झाला आणि पुढे पण होईलच.)
ह्या माहितीमुळेच, मी शेतकरी होवू शकलो.
दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!
स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?
अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते.
कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे. वगैरे.
वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय.
संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली.
आपण जन्माला कोणामुळे आणि कोणाच्या पोटी येऊ, कुठल्या वातावरणातल्या घरात वाढू, कोणत्या समाजात राहून लहानाचे मोठे होऊ, कसे निपजू आणि किती जगू या सगळ्यातल्या काही गोष्टी तरी आपल्या हातात नसतात. आपल्या हातात असत्या तर? या कल्पनेला रंगवताना आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या अवस्थेत आहोत आणि आपली मनस्थिती कशी आहे यानुसार रंगसंगतीत कायम फेरफार होत राहतात.
नुकतंच माझ्या सासर्यांनी (श्री. गजाननराव गोडबोले - आमचे आप्पा) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल.
त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात तेच फक्त लिहिते.