नकोच ते युद्ध नको
नकोच ते युद्ध नको
नकोच ते मृत्यू नको
सहन न होणार्या वेदना
नकोच नको
पैशापायी जायी पैसा
युद्धापायी भरडते जनता
भावनेला घालती गोळी
"युद्धच हवे" बोलतो वर नेता
रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो
बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो
घर दार कोसळूनी होते सुने
नशीबी राही केवळ वाट पहाणे
जमावात बातमी युद्धाची ऐकता
विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे
परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता
युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे
- पाषाणभेद
०२/०३/२०२२