राहून गेले..
तुझ्यासवे अवखळ
बालपणीचे ते क्षण
पुन्हा एकदा
वेचायचे होते
ते क्षण वेचणे
राहून गेले
तुझे जीवनगीत
ऐकत तुझ्या
कुशीत रातभर
जागायचे होते
ते जागणे आता
राहून गेले
तु शिकवलेस
मज चालावयास
तुला आधारासाठी
हात देणे राहून गेले
तुझ्याकडुन अजुन
जगरहाटीचे नियम
शिकायचे होते
पण ते नियम
शिकणे राहून गेले
तुझ्यासोबत अजुन
थोडे जगायचे होते
मनसोक्त बोलायचे होते
चांदण्यात नहायचे होते
तुझ्या कुशीत
झोपायचे होते
तुझ्याकडे हट्ट
करायचे होते
तुझ्या कुशीत
एकदा रडायचे होते
पण पण
ते सारे काही
राहून गेले
तुझ्या आठवणींत
आजी,मी आज
पुन्हा एकदा
हरवुन गेले
तु प्रेमाने मज
सारेकाही दिलेस
तु मात्र एक
संधीही न देता
निघुन गेलीस
तुझ्यासोबतचे ते
गोड क्षण जगायचेत
पुन्हा एकदा
पण तेही तुझ्यासारखेच
अनंतात विरुन गेले..
-दिप्ती भगत
(२९जुलै,२०१९)
प्रतिक्रिया
25 May 2020 - 2:45 pm | गणेशा
निशब्द...
26 May 2020 - 12:17 am | मनिष
सुरेख!!!!!!!!
26 May 2020 - 1:26 pm | कौस्तुभ भोसले
सुंदर
31 May 2020 - 12:34 am | मन्या ऽ
गणेशदा, मनीष, कौस्तुभ खूप खूप धन्यवाद!
वाचकांचे आभार!