सहज सुचलं म्हणून

कंजूस's picture
कंजूस in जनातलं, मनातलं
20 Dec 2024 - 12:13 pm

सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.

* आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो. खरडफळ्यावर चर्चा लांबल्या तर इथे टाकता येतील.
_______________________________________________

* कालपासून एक पुस्तक वाचत आहे. # शेक्सपीअरची शोकनाट्ये - लेखक परशुराम देशपांडे. काॅन्टिनेण्टल प्रकाशन. आतापर्यंत शेक्सपिअरचे सुबोध केलेले लेखन असलेली इंग्रजी पुस्तके वाचली पण काही कळले नव्हते ते आता यातून कळायला लागले. पहिल्या चाळीस पानांच्या प्रकरणात शोकांतिका लेखनाचे विश्लेषण आहे. ते समजलं. एकूण चांगलं पुस्तक आहे.

कढीतली भजी :- या प्रकारातली पाककृती https://youtu.be/FU2JCUT-7bw?si=IkPFb2ZC9RXKU0eM
या विडिओतल्या कृतीप्रमाणे करून पाहिली. बरोबर झाली. ही भजी कढीतही टाकता येतील.( मेथीना गोटानी कढी - मेथीच्या भाजीची कढी.)आता थंडीत बाजारात मेथी येत आहे. खरं म्हणजे मेथा. खरी कसुरी मेथी क्वचितच येते. ती पराठ्यातही घालता येते. कमी कडू असते आणि हलका पोपटी रंग असतो.

वावरकलासंगीतपाकक्रियाइतिहासवाङ्मयभाषासमाजजीवनमानतंत्रआरोग्यउपाहारपारंपरिक पाककृतीपौष्टिक पदार्थभाजीमराठी पाककृतीराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलविज्ञानशेतीअर्थकारणअर्थव्यवहारशिक्षणमौजमजाछायाचित्रणप्रकटनविचारप्रतिसादआस्वादमाध्यमवेधबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

प्रतिक्रिया

येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

मुक्त विहारि's picture

22 Dec 2024 - 10:42 am | मुक्त विहारि

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

कंजूस's picture

22 Dec 2024 - 6:27 pm | कंजूस

क्यूं
भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट ?

मुक्त विहारि's picture

23 Dec 2024 - 8:15 am | मुक्त विहारि

त्यामुळे सक्तीची विश्रांती....

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Dec 2024 - 10:47 am | चंद्रसूर्यकुमार

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

पुणे बुक फेस्टिवल २०२४
अ
आ
१४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.
आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं.

पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो.

ई
उ
क
च
थ

रामचंद्र's picture

23 Dec 2024 - 10:05 pm | रामचंद्र

वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे.
बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

सहमत आहे...

जुइ's picture

27 Dec 2024 - 5:11 am | जुइ

बूक फेस्टिवलचा फेरफटका आणि खरेदी आवडली! मुलांसाठीपण अनेक पर्याय होते हेही छानच. पावभाजी उपहारगृहाची नोंद घेतली आहे.

अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस)

फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत.

स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)

माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.

खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;)
होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

मुक्त विहारि's picture

23 Dec 2024 - 8:20 am | मुक्त विहारि

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

आणि

डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

कर्नलतपस्वी's picture

23 Dec 2024 - 9:41 am | कर्नलतपस्वी

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात.

मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2024 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण दुवा.

-दिलीप बिरुटे

चंद्रसूर्यकुमार's picture

23 Dec 2024 - 10:49 am | चंद्रसूर्यकुमार

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

कर्नलतपस्वी's picture

23 Dec 2024 - 11:47 am | कर्नलतपस्वी

होळी, वजा तीस तापमान.

शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली.

व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून.
दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये.

अर्थात माझे मत.

कंजूस's picture

23 Dec 2024 - 12:21 pm | कंजूस

बरोबर.

रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

कर्नलतपस्वी's picture

23 Dec 2024 - 5:26 pm | कर्नलतपस्वी

ये इंतजार गलत है के शाम हो जाये
जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये
मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब
बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये

हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो
पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

कर्नलतपस्वी's picture

23 Dec 2024 - 5:45 pm | कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है
अंगुरके दामाद को बस इसकी लत है
इसके साथ कुछ गम गलत करता है
तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर...
वो उसके साथ कुछ पल बिताता है

सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस's picture

23 Dec 2024 - 12:39 pm | कंजूस

आशिष बुक स्टॉल
छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये.

यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात.

तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात.

आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

मुक्त विहारि's picture

23 Dec 2024 - 6:30 pm | मुक्त विहारि

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत.

डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत.

मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात.

त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे....

कालाय तस्मै नमः....

गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन

गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल.
धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे.
मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले.

गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते.

कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात.

कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0

गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

गोरगावलेकर's picture

27 Dec 2024 - 12:16 pm | गोरगावलेकर

गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत.

धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .
दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते.

वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता.

नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे.

बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

कंजूस's picture

27 Dec 2024 - 2:58 pm | कंजूस

सहमत.

खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."

काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..."

कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."

"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."

सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... "

काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..."

😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ

गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश!

असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Dec 2024 - 11:02 am | चंद्रसूर्यकुमार

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते.

टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

पुण्यातल्या पुस्तक महोत्सवात माझी चार पुस्तके होती
तीन मराठी आणि एक इंग्रजी
हेडविग मिडीया प्रकाशनाचा स्टॉल होता

श्रीरंग_जोशी's picture

29 Dec 2024 - 1:44 am | श्रीरंग_जोशी

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे.
शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो.

६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा.

या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही.
उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे.

काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात.
चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला.

इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले.
.......
वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या.
१.
https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2
२.
https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM
दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे.
पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण
हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही.
युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

कंजूस's picture

29 Dec 2024 - 3:53 pm | कंजूस

मराठी किंवा कुणीही.

आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस's picture

29 Dec 2024 - 3:53 pm | कंजूस

दुरुस्ती मराठीxxxx. हरारी

कंजूस's picture

31 Dec 2024 - 8:43 pm | कंजूस

पहिला काचेचा पूल

काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले.

hindustan times बातमी