तो नुसता ह्ंसायचा
तो नुसता हंसायचा, फारफार तर खुणा करायचा
तसा कधीचाच येऊन बसला होता,माझ्या साठीनंतर
पण, त्याला घाई नव्हती ,कसली मायाही नव्हती
लहानपणी,तरुणपणीही, कधी दिसला होता
पण तेंव्हा मधेच लुप्त झाला होता
बासष्ठीला हॉस्पिटलातही उशाशीच होता, स्तब्ध पहात होता
मी विचारलं तर ,अजून वेळ आहे म्हणून खुणावत होता
पंचाहत्तरी करायची का बाबा, मुलगा विचारत होता
हा मागे मिष्किलपणे डोळे मिचकावत होता
ऐंशीनंतर जरा धुरकट दिसू लागले होते
तरी हा स्वच्छ दिसत होता
कालांतराने ही गेली तेंव्हा दोन दिवस गायब होता