मुक्त कविता

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
16 May 2016 - 11:44 am

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.

ठयरे हुए पानी मे
किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक
होता है रे बाबा तेरा मारना!!

eggsअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीइशाराकखगकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीनागद्वारफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.लावणीवाङ्मयशेतीविठोबासांत्वनाभयानकहास्यकरुणअद्भुतरससंस्कृतीकलाधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताबालगीतमुक्तकविडंबनभाषाव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासभूगोलक्रीडाकृष्णमुर्तीराशीशिक्षणमौजमजाछायाचित्रणरेखाटन

पहायचं होत ग तुला एक नजर...!!!

kunal lade's picture
kunal lade in जे न देखे रवी...
11 May 2016 - 11:44 pm

तिच्या भावाच्या लग्नात हे घडल होत....!!!!!

पहायचं होत ग तुला एक नजर
त्यासाठीच आलो होतो उन्हात फरफटत
पण नशीब खोट नाही होता आल हजर....
म्हणून परत तुझ्या घरी आलो
पण तू निघालीसाच नाही बाहेर....
म्हणून मित्रांच्या घोळक्यात पुन्हा शिरलो
आणि तुझा भाऊ आला समोर....
म्हंटल परत करावा प्रयत्न
म्हणून पोट भारलेल असताना देखील
मुद्दाम पंगतीत घुसलो
आणि जेवण संपल पाहून
स्वतावरच हासत बसलो....
पहायचं होत ग तुला एक नजर
पण नाहीच ग पाहता आल
मग शेवटी काय गेलो बारवर
मारली चार बिअर
आणि झोपलो ढाराढूर....!!!!.

मुक्त कविताकविता

आखाजीना सन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 May 2016 - 12:08 pm

खान्देशी लेकी आखाजीच्या सणाला माहेराला येतात अन काय गीत म्हणतात पहा -

नदीनं पानी वाहे झुळूझुळू वाहे झुळूझुळू
चला त्यानामा आंगूळ करू आंगूळ करू

माहेरवास्नी सार्‍या उनात उनात ( उनात = आल्यात)
झोका टांगेल शे दारात

आंबानं पान हिरवंगार
झोका जावूदे जोरदार

गवराई चला ग मांडूया
पुजा तिची करूया

आखाजीना सन शे
माहेराला बरकत दे

माय वं माय वं तुन्ह्या लेकीस्ले
सासर मधार सुख दे

(अहीराणी भाषेवर एवढी हुकूमत नसल्याने चुकभूल द्या घ्या)
- पाभे

मुक्त कविताकविताभाषासमाजजीवनमान

फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
5 May 2016 - 5:00 am

फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?
पण तुझी नव्हे तर अजून कुणाची व्हावी ?
याक्षणी तुझ्या सारखा राजर्षी स्वर्गात
ऐषफर्मावत असेल असेही शक्य नाही
तू ज्या कुंपणावर थांबून रयतेसाठी देशाची राखण केलीस
तेच कुंपण शेत खाते आहे पाहून तू अस्वस्थ होत असशील
कुठेतरी धडपडतही असशील,
काळाने अभिप्रेत नसलेले गूण उधळत ठोके चुकवताना
तुझ्या जैवीक गुणसूत्रांचीही आब नाही राखली
त्याला तू तरी काय करशील?
नैतीकता दूकानातून विकत आणून का कुणाला देता येते ?
न ही जैवीक गुणसूत्रांमधून वाटता येते,

मुक्त कवितावाङ्मयशेतीविठ्ठलशिववंदनावीररसकवितामुक्तक

मन

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
28 Apr 2016 - 5:16 pm

मन धावून धावून जातं
आणि बिलगतं -
पानाफुलांना,
वृक्षवेलींना, रानवाटांना,
डोंगरदऱ्यांना.

मन पंख उघडतं
आणि झेपावतं
त्या सोनेरी उन्हानं भरलेल्या निळ्या आकाशात;
आणि तरंगत, उमलत राहतं
एखाद्या शुभ्र मेघासारखं.

मन चांदण्यात जाऊन बसतं
आणि अबोल रात्रीला पुसतं
तिच्या सौंदर्याचं त्याच्या व्याकुळतेशी असलेलं नातं.

मन वहिवाट सोडतं
आणि निघतं त्या वाटेने
ज्या वाटेवर पथदिवे नाहीत, मैलाचे दगड नाहीत,
दिशा आणि देशांचे फलक नाहीत;
जी वाट अमूर्त आहे, अथांग आहे, असीम आहे - मनासारखीच !

मुक्त कविताकविता

-स

सुधीरन's picture
सुधीरन in जे न देखे रवी...
13 Apr 2016 - 4:36 pm

तुझ्या ओल्या केसांचा गंध
करीत नाही मला धुंद-
शॅम्पू का बरे लावतेस?

तुझे डोळे तसे अगदी
गहिरे वगैरे आहेत-
लेन्सेस का वापरतेस?

तुझ्या ओठांची लाली
थोडी कडू बघ लागते-
लिपस्टिक कसलं लावतेस?

तुझ्या गोब-या गालांना
कुस्करणं मला आवडतं-
त्यांना क्रीम का फासतेस?

कितीदा तुला सांगितले
नटू नकोस उगाचच तू-
अशीच मला आवडतेस!

मुक्त कविताकविता

प्राजक्त

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
5 Apr 2016 - 11:04 am

कसे पारिजातास सांगू सख्यांनो जरा आवरी रे गंधा तुझ्या
सखी मोगरीही धुंदावली बघ विसरून अस्तित्वगंधा तिच्या

नको देखणे ते सडे सोनपुष्पी, नसे रातराणी ध्यानीमनी
प्राजक्त दारी ओघळावा, दरवळ रुजावा मुग्ध मातीतुनी

फुलावे किती सडे मौक्तिकांचे जणू प्रित तुजवर मोगरीची जडे
कधी सांडती आंसवे दोन, पाठी कधी थाप ती कौतुकाची पडे

इथे आज शब्दांत घडे आगळे शिल्प सुखे मोहरे ताज स्वप्नांतला
नसे शाश्वती श्वास कुठवर टिकावा? फुले नित्य प्राजक्त दारातला .

विशाल कुलकर्णी

मुक्त कविताकविता

आम्ही मनमौजी

सुधीरन's picture
सुधीरन in जे न देखे रवी...
2 Apr 2016 - 6:18 pm

आला आला वसंत ऋतु आला
नाचुया खेळूया झूला झुलूया
आम्ही सारे आहो मनमौजी
मजेत आपण सारे फिरुया ।।१।।

कशास बाळगू तमा जगाची
कशास काळजी आज उद्याची
दिवस हा आजचा मजेचा
रात्र ही धुंद नशेची ।।२।।

तरुण आम्ही नव्या युगाचे
भोक्ते सा-या सुखांचे
नका पाडू बंधनात आम्हा
आम्ही चाहते स्वातंत्र्याचे ।।३।।

कमी पडेल धरती ही
थिटे पडेल आकाश ही
मनात आणता आम्ही
रूप पालटू या जगाचे ।।४।।

कविता माझीमुक्त कविताकविता

शक्तिपात

एच्टूओ's picture
एच्टूओ in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 2:57 pm

फार पूर्वी कोणीतरी फेकलेला दगड
डोक्याला लागून झालेली जखम दाखवण्यासाठी
मी डॉक्टरकडे गेल्यावर
अचानकच वाढला माझा मेंदू गाठोड्याएवढा

खदाखदा हसला डॉक्टर
आणि बाहेर घेऊन गेला मला
तोपर्यंत वाढला मेंदू अवाढव्य
जोमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये
हवा भरलेल्या फुग्यासारखा
आभाळभर मेंदूच-
लिबलिबित मासाचा सुरकुत्यांसकट
तरीही जड वाटेना मला.

मुक्त कवितामुक्तक

माहेर वारी

त्रिपुरा's picture
त्रिपुरा in जे न देखे रवी...
29 Mar 2016 - 4:20 pm

पोचता पोचता उंबऱ्याशी माहेरच्या,
मनाच्या अंगणात पडतो आठवणींचा सडा
नव्याने अनुभवताना सवयीची माया
नकळत जातात भिजून, पापण्यांच्या कडा

परत परत लागतात शोधावे,
'माझ्या' कपाटात सजलेले अनोळखी खण
जुनाट फोटोत डोकावणारे सवंगडी
आठवतात नुसतेच बनून 'काही' जण

मायेच्या ऊन ऊन घासांत,
न शोधताच सापडते अमृताची चव
कौतुकानं लावलेल्या वेलीवर जुईच्या,
हवं तेव्हा चमकतं, लबाड दवं

गप्पांच्या फडात लावतात हजेरी,
हव्या - नकोशा नात्यांचे बेमालूम पाश
पायाखालच्या रस्त्यात खुणेला मिळतं,
चिमुकल्या डोळ्यांनी साठवलेलं हक्काचं आकाश

मुक्त कविताकविता