काहीच्या काही कविता
नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने !
नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने
नोकरीशी जुंपणेही फिरुनी ते, नव्या दमाने ।
राहीले मनात गाणे, वर बॉसचे जोडे नव्याने,
काय पडलो मी भरीला, बिल्डरांच्या सुक्या दमाने ।
कोणत्या शैय्येवरी असते मजा सांगा गड्यांनो,
छळे इएमाय वेळी-अवेळी, रोजचा नव्या बळाने ।
भूक तगडी पण रोमान्सही, का जमेना रोज आता ?
रेंटातूनी हप्ता वळविणे माथी का, पुन्हा नव्याने ।
तू मला कुरवाळणेही सोडले आहे अताशा,
टेक-होम झाला कमी का? व्हिलनी नव्या लोनाने ।
भाडेकरी मी शोधतो पण, रेंट पाडूनी मागती,
मुजोर कामवालीचाही रेट, वाढतो नव्या दराने ।
कधीतरी.....
उकलत मनाची पाकळी
सांज हळवी होते; कधीतरी.....
भिजवून पापणी ओली
रात्र हळवी होते; कधीतरी.....
चुकवून पाहारे सारे
नजरा-नजर होते; कधीतरी.....
मोडून मनाची दारे,
तिची आठवण
उच ...!
येते;
ऊ...च...!!ऊ...च...!!!
(इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?)
कधीतरी.....
-मुकुंद
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय,
अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.
वेदना जुनीच...,
पावसामुळे पुन्हा फुललेली,
कॉफीच्या वादळासह,
पुन्हा मनात सललेली.
अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,
उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |
गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,
जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
अमिट लक्ष्मणरेखा
वासनामयी डोळ्यांनी
पाहिले तिच्याकडे मी.
नवयौवना कोमलांगी
नोट नवी कोरी
दोन हजाराची.
विरहाच्या अग्नीत
तडफडू लागलो
तरीही
विवश होतो मी
अलंघनीय होती
सुट्ट्या पैश्यांची ती
अमिट लक्ष्मणरेखा.
(काळी असे कुणाची)
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....
काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,
सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,
काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,
परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,
-(पैजारबुवा) आनंदीआनंद
वादळ
जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न
ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं
आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं
मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं
भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा
मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!
(फेंदारलेल्या मिशा....)
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे.
दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते.
मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे.
पाहून स्वप्ने सत्तेची
बोकाळली आहे संराशा१
आता कोठे होऊ लागल्यात
पाठवणी जराश्या
का करीशी भणभण
या वखवखलेल्या सत्ताबाजारात
आता कोठे मिळविल्यात
खुर्द्यात चवल्या जराश्या
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..
ओळखीचं हसून बोलायला हवं..
किती ती धूळ गैरसमजांची,
मनाला स्वच्छ झाडायला हवं..
कुठंतरी आत सलतंय का काही?
समजूतीचं मलम तिथं लावायला हवं..
जे झालं ते झालं, ते होणारच होतं
अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं..
पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय
आनंदानं जीवन आता जगायला हवं..
अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं
एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..
मी बी बियर बार काढीन म्हणतो : सामान्य मानव
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
बियरला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
पिणार्यांच्या मनांत
असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
पिणार्यांना नशा
चढली काय, न चढली काय
पिणार्यांना भरपुर रिचवायची सवयच हाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!