अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)
उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..
संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..
विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...
धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा
मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..
त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..