(शाक दाट वाटान्याची)

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
10 Mar 2016 - 10:53 am

पैजारबुवा, नीमोतै आणि सध्या अद्रुश्य झालेले/ल्या दमामि येऊन षटकार ठोकून जायच्या आधी दोन रन काढून ठेवते. प्रेरणा द्यायचा कंटाळा आला आहे.

घेतो खीर ओरपून
ही किमया गोडाची
बेल्ट जरा सैलावून
चिंता करतो घेराची

पुरीआड दडती भजी
भय घालती केलरी
डोळे वटारता बायको
देऊ मोत्यांच्या सरी

येता ताटात पुलाव
शोधू काजूचे काप
कसा टाकू शिल्लक
नको माथी पाप

डायट मारती माथी
इथे सारेच पापड*
जो मारतो मिटक्या
त्याला म्हणती खादाड

कशी सरता सरेना
शाक दाट वाटान्याची
गच्च भरल्या पोटाला
ओढ भारी मठ्ठ्याची

*पापड : बारीक या अर्थाने.

vidambanअदभूतअनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीहास्यविडंबन

प्रतिक्रिया

च्यामारी सोताच सोताचे विडंबन !

प्राची अश्विनी's picture

10 Mar 2016 - 10:59 am | प्राची अश्विनी

मस्त!
रच्याकने म्हाळाची आठवण झाली.:)

प्राची अश्विनी's picture

10 Mar 2016 - 11:01 am | प्राची अश्विनी

मस्त!
रच्याकने म्हाळाची आठवण झाली.:)

नीलमोहर's picture

10 Mar 2016 - 11:04 am | नीलमोहर

आधी एवढं सुरेख काव्य लिहायचं आणि वर स्वतःच त्याचं असं भजं करायचं :p

रातराणी's picture

10 Mar 2016 - 11:29 am | रातराणी

दहशत तुमची अजून काय!

नाखु's picture

10 Mar 2016 - 11:35 am | नाखु

म्हंतेत आपलाच पतंग आपणच काटणे.

(दुसर्याला काटण्याचं सुखंही मिळू द्यायच नाही)

या असहिष्णुतेबद्दल कुणीच* पुरस्कार का वापस देईना ते !!!

कुणीच* मध्ये आद्य विडंबनकार अपेक्षीत आहेत.

चांदणे संदीप's picture

10 Mar 2016 - 11:38 am | चांदणे संदीप

=))

सस्नेह's picture

10 Mar 2016 - 3:36 pm | सस्नेह

भजं नव्हे, शाक !

यशोधरा's picture

10 Mar 2016 - 11:17 am | यशोधरा

अर्र, काय हे!

रातराणी's picture

10 Mar 2016 - 11:34 am | रातराणी

यात एक मोठी चूक झाली आहे. शाक शक्यतो पातळ कटाच्या आमटीला म्हणतात. इथे वाटान्याच्या दाट्सर रस्स्याला शाक असं म्हणणं बरोबर नाही. भाजी म्हणाव तर जरा मिळमिलीत वाटतं. हम्म. ही चूक पोटात घ्या मंडळी.

एस's picture

10 Mar 2016 - 12:01 pm | एस

छानेहो.

कंजूस's picture

10 Mar 2016 - 1:00 pm | कंजूस

खाउ पोट फुगेपर्यंत नाही कुणाची भिती.

एक एकटा एकटाच's picture

10 Mar 2016 - 7:21 pm | एक एकटा एकटाच

च्या मायला

लयच भारी

नूतन सावंत's picture

10 Mar 2016 - 9:36 pm | नूतन सावंत

कविता आवडली.वाटाण्याच्या आमटीला सांबार म्हणतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Mar 2016 - 9:26 am | ज्ञानोबाचे पैजार

अरे हे काही बरोबर नाही. मी किती उत्साहाने बाह्या सरसावल्या होत्या.

एकाही बॉल न खेळता रन आउट झाल्यासारखे वाटले.

हे म्हणजे अमिताभ बच्चन सारखे झाले सिनेमाचा हिरो पण तोच आणि कॉमेडियन पण तोच.

हा काव्यिकदहशतवाद आहे.

पैजारबुवा,