पुढाऱ्याचे प्रेम
प्रेम या थिम वर एक गद्य-पद्य लिहायचे होते त्यात मी ' पुढाऱ्याचे प्रेम ' वर लिहायचे ठरवले. एक पुढारी आपल्या नाराज झालेल्या बायकोला कसे मनवेल ते बघूया:
अशी का ग प्रिये
तू गरम तव्यावर राहतेस
तुझी माझी कायमची युती
मग कशाला उगाच झेंडे फडकवतेस
जरा मूड मध्ये आलीस
कि जशी पक्षाला मिळतेस
आनि थोडी येउन बिलगलीस
कि मला खुर्चीवानी वाटतेस.....
माझ्याशिवाय तू
जशी अपक्ष उमेदवार
नाही विरोधी पक्षात मान तुला
तू तर फुटलेला आमदार…..